मरणोत्तर देहदान संकल्प काय आहे, आणि तो कोण करू शकतो? याचा त्या व्यक्तीला काय फायदा?
मरणोत्तर देहदान संकल्प काय आहे, आणि तो कोण करू शकतो? याचा त्या व्यक्तीला काय फायदा?
देहदान केल्यानंतर श्राद्धविधीही अवश्य करावा. श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम् | जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय, त्यामुळे निधन पावलेल्या व्यक्तीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देहदान केले असले तरी श्राध्द अवश्य करावे.
राजा हर्षवर्धन आपली संपत्ती गरजूना देत असे. राजा दिलीपाने आपला देहच सिंहाच्या भुकेसाठी दिला होता. शिबी राजाने कबुतराच्या प्राणासाठी आपला देह देवू केला. अशी आपली प्राचीन दानपरंपरा.या परंपरेत विनोबांनी भूदान, श्रमदान याची भर घालून कालोचित दान प्रकारांची ग्वाहीच दिली आहे.
) एखाद्या व्यक्तिने मरणोत्तर देहदान केल्यास, त्याच्या मॄत शरीराचा उपयोग वैद्यकीय विद्यार्थांना शिक्षणासाठी होतो.
२) बेवारस मॄतदेह पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत सडू लागतात. त्यांच्यावर कोणतीही प्रक्रिया नंतर करता येत नाही आणि त्यामुळे ते विद्यार्थांना अभ्यासासाठी निरूपयोगी ठरतात.
३) मॄत्युपश्चात नेत्रदान, त्वचादान आणि देहदान करता येते.
४) नेत्रदान मॄत्युनंतर २ तासांच्या आत आणि देहदान ६ - ७ तासांच्या आत करावे लागते.
५) मॄत्युनंतर मॄताच्या देहावर वारसाचा अधिकार असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तिने देहदानचा फॉर्म भरुन सुध्दा जर आयत्या वेळी वारसाने नेत्रदान अथवा देहदानाला नकार दिल्यास कयद्याने तो गुन्हा होत नाही.
६) त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तिने देहदानाचा फॉर्म भरलेला नसेल पण वारसाची जर इच्छा असेल तर मॄताचे नेत्रदान / देहदान होऊ शकते. (अर्थात वारसाला त्याकरता ऑफेडेव्हिट मात्र करावे लागते. मधल्या वेळात देह खराब होऊ नये म्हणून पैसे भरून शवागारात ठेवण्याची यातायात करावी लागते, त्यापेक्षा स्वतःहून फॉर्म भरलेला केव्हाही चांगला.)
७) ब-याच आजारी स्थितीतला किंव्हा संसर्गजन्य रोग झालेला देह स्विकारला जात नाही. उदा. काविळ, एड्स, कॉलरा, गँगरीन वगैरे.
नगरपालिकेकडून मॄत्युचा दाखला हवा असल्यास सरकार मान्य वैद्यकीय महाविद्यालयालाच देह द्यावा.
मरणोत्तर देहदान संकल्प:
मरणोत्तर देहदान म्हणजे मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी दान करणे. यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीररचना आणि शरीरक्रिया यांचा अभ्यास करण्याची संधी मिळते. तसेच, डॉक्टरांना नवीन शस्त्रक्रिया तंत्रांचा सराव करता येतो आणि संशोधकांना विविध रोगांवर उपाय शोधता येतात.
देहदान कोण करू शकतो?
१८ वर्षांवरील कोणताही व्यक्ती देहदान करू शकतो. यासाठी, व्यक्ती जिवंत असताना देहदान करण्याचा संकल्प अर्ज भरून नोंदणी करू शकते.
याचा त्या व्यक्तीला काय फायदा?
मृत्यूनंतर देहदान केल्याने त्या व्यक्तीला कोणताही प्रत्यक्ष फायदा होत नाही. परंतु, यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी मदत होते आणि अनेक लोकांचे जीव वाचू शकतात. देहदान हे एक महान कार्य आहे, ज्यामुळे मृत्यूनंतरही आपण समाजासाठी उपयोगी ठरू शकतो.
अधिक माहितीसाठी काही उपयुक्त लिंक्स: