ग्रंथ आणि ग्रंथालय अध्यात्म देव भगवत गीता

भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहे काय आणि ते गीतेत काय सांगतात?

2 उत्तरे
2 answers

भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहे काय आणि ते गीतेत काय सांगतात?

5
भागवत पुराणाने कृष्णाला विष्णूस्वरूप मानले आहे.महाभारत काळात जो कृष्ण यादवांचा नेता आणि पांडवांचा हितकर्ता अशा मानवी रूपगुणात दिसला, तोच पुढे मानवांचा उपास्यदेव बनला.कृष्ण हा यादवांच्या सात्वत कुळात जन्मला होता त्यांनीच त्याला उपास्य दैवत मानले.कालिया नागाला त्याने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला. महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्र हे एकूण एकशेआठ वर्षांचे असल्याचे सांगितले आहे. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचेअविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम म्हणजेच कर्म केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी कर्म केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतेचा अभ्यास करून, गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
उत्तर लिहिले · 22/4/2018
कर्म · 26630
0

भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहेत की नाही, हा एक गहन आध्यात्मिक प्रश्न आहे. यावर विविध मते आणि श्रद्धा आहेत.

काही लोकांचे मत:
  • भगवतगीतेनुसार, श्रीकृष्ण हे स्वतःच 'परम सत्य' किंवा 'परमात्मा' आहेत. त्यांनी स्वतःला अनेक ठिकाणी 'अहम्' (मी) म्हणून संबोधले आहे, जे त्यांच्या परमत्वाचे द्योतक आहे.
  • वैष्णव संप्रदायांमध्ये, श्रीकृष्ण हे विष्णूंचे पूर्ण अवतार मानले जातात आणि त्यामुळे ते परमात्मा आहेत.
​काही लोकांचे मत:
  • काही विचारवंत श्रीकृष्ण हे एक महान योगी, तत्त्वज्ञानी आणि मार्गदर्शक मानतात. ते त्यांना ऐतिहासिक व्यक्तिमत्व मानून 'परमात्मा' या दृष्टीने पाहत नाहीत.

गीतेत श्रीकृष्ण काय सांगतात:

  • कर्मयोग: कर्म करा, फळाची अपेक्षा न करता. (कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन). स्रोत
  • भक्तियोग: अनन्य भक्तीने मला प्राप्त करा. (मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा). स्रोत
  • ज्ञानयोग: आत्मज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळवा. (ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः). स्रोत
  • स्थितप्रज्ञता: सुख-दुःखात सम राहणारा स्थिर बुद्धीचा मनुष्य बना. (दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः). स्रोत
  • ईश्वर सर्वव्यापी: ईश्वर सर्वत्र आहे आणि तो सर्वांमध्ये वास करतो. (ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति). स्रोत

Disclaimer: ही माहिती विविध स्त्रोतांवर आधारित आहे आणि यावर अंतिम मत देणे शक्य नाही.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1020

Related Questions

माळकरी माणसाने नॉनव्हेज हॉटेल मध्ये जॉब करावा का?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?
गोसावी लागणे म्हणजे काय?
आपले शरीर पंचतत्त्वांनी बनले असेल, तर आपली ओळख काय? आपण कोण आहोत?
ब्रह्मचर्य पालन केल्यावर नेमके काय फायदे होतात?
ब्रह्मचर्य पालन म्हणजे नेमके काय करावे?
जो व्यक्ती मनोभावे पूजा करतो, दानधर्म करतो, सरळमार्गी राहतो, भविष्याबद्दल विचार न करता दुसर्‍यांसाठी खिसा रिकामा करतो, तर त्याच्याच वाटेला दुःख आणि अडचणी का येतात?