3 उत्तरे
3
answers
गुढीपाडवा सण कधीपासून सुरू झाला, त्याचा इतिहास काय आहे?
5
Answer link
गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा हे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे, नववर्षाचा पहिला दिवस अर्थात वर्षात !या दिवशी शालिवाहन संवत्सर बदलते. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. चैत्र हा हिदू पंचांगाप्रमाणे, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला सुरू होतो.
शालिवाहन राजाने (सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी) ‘शक’ आक्रमकांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी (चैत्र शुद्ध प्रतिपदा) नवीन शक सुरु केला. या वर्षी या शकाचे १९३९ वे वर्ष सुरु होईल. हे संवत्सर “हेमलम्बी” आहे. (एकूण संवत्सर ६० असून हे ३१ वे संवत्सर आहे)
या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतांत चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो
गुढींचा सांस्कृतिक इतिहास
डॉ. बिद्युत लता रे यांच्या मतानुसार ओरिसा राज्याच्या आदिवासींमध्ये खंबेश्वरी देवीची पूजा हा काठी पूजेचा प्रचलित प्रकार असून खंबेश्वरीची पूजा अर्वाचीन काळात हिंदू धर्मात उत्क्रांत झालेल्या मूर्तिपूजांपेक्षा प्राचीन असावी. महाभारताच्या आदिपर्वात(१.६३) पुरुवंशाचा चेदीदेशचा राजा इंद्रदेवाच्या सन्मानार्थ शक्रोत्सव नावाने सजवलेल्या काठीचे पूजन करत असण्याचा उल्लेख येतो. महाभारतातच खिलपर्वात श्रीकृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला आपल्या संवगड्यांना देतो. महाभारतातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.
शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंश, भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‘ नाटकांमधून येतात.
श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.
महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ
इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये “….
तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें :
मग तेंही सडासंमार्जन करवीलें :
चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली :
उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :… ”
असा उल्लेख येतो.
संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये
“अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं
। सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥”
“ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥”;
“माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥” असे उल्लेख येतात.
संत नामदेव (इ.स. १२७० – जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष – इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात.
संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात-
“टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
१६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात. आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्हणणें असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन असावे.
या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे.
गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरुप
चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.
गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून, त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी परिधान करतात, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर (सहसा तांब्या-पितळ्याच्या नाहीतर चांदीचे/कास्याचा) धातूचे भांडे/तांब्या/गडू/फुलपात्र बसवले जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढतात.गुढी नंतर पाटावर उभी केली जाते.
तयार केलेले गुढी दारांत/उंच गच्चीवर/गॅलरीत लावातात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता लावतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून. उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात.
दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नव वर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते. गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी हे स्वागताचे प्रतीक समजले जाते. गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो. विविध वस्तूंची खरेदी या मुहूर्तावर करण्याचा प्रघात आहे
डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक -संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते.सर्जनाला मिळणा-या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात. प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. नंतर पूजा करून गुढी उभारली जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे.
ह्या चैत्र महिन्यांत जर आपण सभोवतालच्या सृष्टीच अवलोकन केलं तर असं लक्षात येते की, शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव पालवीने फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल ही कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सु-स्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचे, नव चैतन्याचे, नव सृष्टीचे स्वागत दारी गुढी लावून करायचे हा पण त्या मागचा एक उद्देश आहे.
गुढी पाडव्याचे दिवशी वर्षारंभ होतो म्हणून त्या दिवशी पंचांग पूजन करून त्यातील नव संवत्सर फल वाचले जाते. चैत्र प्रतिपदा ह दिवस साडेतीन मुहूर्तातला एक म्हणून ह्या दिवसाला महत्त्व आहे. ह्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ इ. गोष्टी केल्या जातात.
संदर्भ

0
Answer link
गुढीपाडवा का साजरा केला जातो?
गुढी ही विजयाची व समृद्धीचे प्रतीक म्हणून मानले जाते. प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवास भोगून तसेच लंकापती रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले, म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.
अधिक सविस्तर माहितीसाठी खालील वेबसाईटला नक्की भेट द्या:
https://www.marathibhashan.com/2021/04/gudi-padwa-information-in-marathi-and.html
0
Answer link
गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात आणि वसंत ऋतूची चाहूल देतो.
गुढीपाडव्याचा इतिहास:
-
पौराणिक कथा:
-
असे मानले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्यामुळे या दिवसाला नवसंवत्सराची सुरुवात मानले जाते.
-
या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्यावतार घेतला, त्यामुळे हा दिवस शुभ मानला जातो.
-
रामayana नुसार, याच दिवशी प्रभू राम १४ वर्षांचा वनवास संपवून அயோध्येला परतले.
-
-
शालिवाहन शक:
-
शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीच्या सैनिकांमध्ये जीव ओतून शक राजाला हरवले. या विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन शक सुरू झाले, जो गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू होतो. यूट्यूब व्हिडिओ
-
गुढीपाडवा हा नवीन सुरुवात, समृद्धी आणि विजय यांचा सण आहे.