3 उत्तरे
3 answers

कांजण्या झाल्यावर उपाय काय करावे?

4

अंतिमत: प्रतिबंध होण्याजोगा रोग!कांजण्या हा अत्यंत संसर्गजन्य रोग असून त्यांचा प्रादुर्भाव हा मुख्यत्वेकरून हार्पिस झोस्टर या अतिसूक्ष्म जीवाणूमुळे होत असतो.या विषाणुचा प्रसार खोकताना किंवा शिंकताना बाहेर उडणार्या श्लेश्मल द्रावाच्या हवेतून वहन होणार्या जलकणांपासून एका व्यक्तिकडून दुसर्या व्यक्तिपर्यंत अगदी सहजपणे होत असतो. तसेच याचा प्रसार व्हॅरिसेला किंवा हार्पिस झोस्टर (नागीण) या रोगाच्या जंतुंशी थेट संपर्कात आल्याने सुध्दा होत असतो. या विषाणूंची अंडी उबण्याचा कालावधी दोन ते तीन आठवड्यांचा असतो. अगदी पुरळ उठण्याच्या आधीसुध्दा काही दिवसात अंडी उबवीत असलेल्या व्यक्तिद्वारे या विषाणूंचे प्रसार अगदी सहजपणे होत असते. जंतुसंसर्ग झालेल्या व्यक्ति पाणथळ फोडांवरील खपल्या संपूर्ण धरेपर्यंत संसर्गजन्य राहतात.हे विषाणू शरीरात सुप्तपणे वास्तव्य करून राहतात. कालांतराने हे विषाणू पुन्हा सक्रिय होतात आणि त्यापासून हार्पिस झोस्टर (नागीण) या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. या रोगाच्या विषाणूंचे संवाहन आणि प्रसार फक्त मानवाकडून होत असल्याचे ज्ञात आहे.कांजण्या येण्याचे प्रकार संपूर्ण वर्षभरात केव्हाही उद्‌भवू शकतात. परंतू या रोगाची साथ मात्र कित्येक अप्रतिक्षम व्यक्तिच्या थेट सहवासात आलेल्या संवाहकाच्या माध्यमातून होत असते.(उदा. कुटुंबे, शाळा, प्रसुती गृहे, कार्यालये इत्यादी) म्हणून जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तिला कांजण्या आल्यास त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तिंना संसर्ग होण्याची अत्याधिक शक्यता असते.1. लक्षणेलहान मुलांमधे खालील लक्षणे दिसतातथकवाडोकेदुखीतापप्रौढांमध्ये ही लक्षणे जास्त गंभीर स्वरूपाचीअसतातचिडखोरपणाडोकेदुखीभूक मंदावतेसांधेदुखीस्नायुमध्ये वेदनाउच्च आणि दीर्घ मुदतीचा तापही लक्षणे साधारणपणे त्वचेवर लालसर रंगाचा पुरळ उठण्यापूर्वी २४ ते ३६ तास आधी घडू लागतात.कांजण्याचे स्वभावविशिष्ट लक्षण म्हणजे खाजणारा पुरळ धडावर येण्यास सुरूवात होऊन तो हळुहळू चेहर्यावर आणी त्यानंतर डोक्याची कातडी, तोंड आणि कानापर्यंत पसरत जातो. बहुतांशी मुलांच्या बाबतीत २५०-५०० क्षते पडूनत्यावर चार ते पाच दिवसांनी खपली धरू लागते आणि त्या खपल्या दोन ते तीन आठवड्यांपर्यंत तशाच राहतात. यावेळी सुटणार्या तीव्र खाजेचा मुलांना अतिशय त्रास होतो आणि त्यांना ताप, सर्दी, मळमळ आणि वांत्या यांचाही त्रास जाणवू लागतो.त्वचेवर जवळ जवळ २५०-५०० फोड उठतात. प्रौढांमधील या फोडांचे व्रण अधिक खोल आणि जास्त प्रमाणात असतात. तसेच यामधे आरोग्यविषयक समस्या वाढण्याची शक्यता १० ते १५ पटीने जास्त व अधीक गंभीर असते.2. कांजिण्यांवरील उपचारकांजिण्यांचा सामना करताना फोडांच्या जागेवर येणा-या खाजेवर व तापावर नियंत्रण ठेवणे हे एक महत्वाचे आव्हानच असते. कोमट पाण्याने आंघॊळ करताना अंगाला लावण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा डाळीचे पिठ वापरावे. हे उपायकारक व फायदेशिर असते. थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा थंड वातावरणाने खाज वाढण्याची शक्यता अधिक असते.खाजखुजलीवर उपाय म्हणून डिफेंहिड्रामाईन(बेनाड्रील) किंवा हायड्रोक्सिझेन (ऍटारॅक्स) सारख्या गुणकारी औषधांचा वापर केला जाऊ शकतो. त्या त्या परिस्थितीशी अनुकुल असणारी गुणकारी लोशनही आपण वापरु शकतो. पण लहान मुलांनकडून तोंडावाटे डिफेंहिड्रामाईन(बेनाड्रील) व लोशनचा अतिसेवन किंवा अतिवापर होणार नाही याची दक्षता घेणे फार महत्वाचे आहे. स्टेरॉईडचा समावेश असलेल्या औषधांचा वापर करु नये.लहान व तरुण मुलांसाठी ऍसप्रिन य औषधाचा वापर टाळावा कारण त्यामुळे Reye's syndrome सारखा जीवनाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता काही प्रमाणात असते. तापावर नियंत्रण आणण्यासाठी ऍसेटामाय्नोफेन औषधाचा वापर करावा. घातक आजार टाळण्यासाठी आय्ब्रुफेनचा वापर टाळावा. कांजिण्या या आजारात त्वचेला वारंवार खाज येत असते अशावेळेस हाताच्या बोटांची नखे कापावी किंवा हातमोजे वापरावे जेणेकरुन त्वचेला ईजा होणार नाही. तोंडातील जखमासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. शरिरास थंड असणा-या द्रव पदार्थाचे सेवन करावे व गरम, तिखट आणि आंबट पदार्थ (संत्र्याचा रस) टाळावेत.हात वारंवार धुवावे व शरिरास स्वच्छ ठेवावे जेणेकरुन संसर्ग होणार नाही. जर शरिराला हानीकारक असलेल्या किटाणुंचा संसर्ग झाला असेलआणि तो वाढून ताप पुन्हा येत असेल तर डॉक्टरांना त्वरीत दाखवावे. लहान मुलांना कांजिण्या झाल्या असतील त कुटुंबातील इतर सदस्यांना दक्षता घेण्याबद्दल सांगायला विसरु नका.त्वचेला चरे पडणे किंवा संसर्ग होणे आयुष्यभराचे दुखणे ठरु शकते. डॉक्टरांना जाऊ दाखवणे गरजेचे नाही हा दृष्टिकोन पुढे आपल्याला पेचात अडकवू शकतो.ऍसिक्लोविर (झोविरॅक्स), हे संसर्ग रोखणारे औषध आहे. त्वचेला चरे पडण्याच्या पहिल्या दिवसापासून वापरल्याने उपयोगी ठरु शकते. लहान मुलांना या औषधाच्या वपराची आवशक्ता नसते. हे औषध बराच वाढलेल्या आजारासाठी दिले जाते. कारण कांजिण्या हा संसर्गजन्य रोग आहे. अशा संसर्गजन्य वातावरणाचा प्रभाव कमी होईपर्यंत लहान मुलांना शाळापेक्षा घरातच शक्यतो ठेवावे.3. कांजिण्यांपासूनबचाव.वॅक्सिनपद्धतीनेकांजिण्यापासून बचाव केला जाऊ शकतो (हे राष्टीय आरोग्य व जनता आरोग्य समुहांनी प्रमाणित केले आहे).लहान व तरुण मुलांसाठी: १२ ते १८ महिन्याच्या मुलांपासून १२ वर्षाच्या सुदृढ बालकांवर (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर) वॅक्सिनपद्धतीनेउपचार केले जाऊ शकतात. १३ वर्षे व त्याहुन अधिक वयाच्या बालकांना (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर)चार ते पाच आठवडे वॅक्सिनच्या औषधाच्या दोन मात्रा दिल्या जातात. वॅक्सिनेशन नंतर रोग प्रतिकार शक्तीची पुर्ण कल्पना येत नाही. पुन्हा दिलेल्या वॅक्सिनेशनमुळे पौढत्वाकडे वाटचाल करणा-या मुलांमधे रोग प्रतिकार शक्ती वाढते असे मानले जाते.पौढत्वासाठी: वरिसेल्लिया वॅक्सिन औषधाच्या दोन मात्रा चार ते आठ आठवड्यांसाठी सुदृढ पौढांना प्रमाणित केल्या जातात. सामाजिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, दिवसा काळजी घेणारे कर्मचारी विद्यालयाचे कर्मचारी, एकत्रित निवासकरणा-यांना व संसर्ग होईल अशा जागेत काम करणा-यांना वॅक्सिनेशनसाठी प्रवृत्त करण्यात आले आहे.ज्या पौढांना आपल्या रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती नाही अशांसाठी रक्ताचे परिक्षण व निदान करणा-या पद्धती उपलब्ध आहेत. रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती असणे फार गरजेचे असते.वॅक्सिन ह्या पद्धतीची घातक आजारापासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनाने निर्मिती करण्यात आलेली आहे आणि हीपद्धत खुपच प्रभावी आहे. वॅक्सिनपद्धतीचावापर केल्यानंतर क्वचितच कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते. कधी कधी वॅक्सिनपद्धतीनेसुद्धा कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते.वॅक्सिनचा प्रॉफेलॅक्सिस झाल्यानंतरही बचावासाठी वापर केला जाऊ शकतो. त्याची लक्षणे दिसायला लागल्यानंतर तिन दिवसात द्यायला हवे. तसेच लक्षणे दिसल्यानंतर चार दिवसात VZIG दिले जाऊ शकते जे अधिक संसर्गापासून बचाव करते.हे स्थायी संरक्षण देणारे औषध आहे. म्हणूनच काही काळाने पण वेळीच त्याव्यक्तीची आजारातून सुटका होणे गरजेचे आहे.4. प्रतिबंधसंसर्ग झालेल्या व्यक्तिला पुरळ दिसू लागल्या क्षणापासून ते अगदी खपल्या धरेपर्यंत इतरांपासून दूर ठेवा. दुर्दैवाने कांजण्याचे जंतू पुरळ स्पष्ट दिसू लागण्याच्या आधीच एक दोनदिवस संसर्गजन्य असतात. म्हणूनच त्यांचा प्रसार होण्याला प्रतिबंध करणे कठीण आहे.
*_♤ माहिती  सेवा ग्रूप पेठवड़गाव ♤_*
तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी कांजण्यांचा प्रतिबंध करणे का महत्वाचे आहे?प्रथम, लहान मुलांना जडणार्या कांजण्या या रोगाच्या परिणांमाकडे रूग्णाकडून किंवा त्याच्या कुटुंबियाकडून फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्राकृतिक दृष्ट्या कांजिण्या हा रोग रूग्णांसाठी अतिशय त्रासदायकअसतो आणि दीर्घकालीन कुरूपता जडण्याची किंवा गंभीर अगदी प्राणघातक ही दुष्परिणाम उद्‌भवण्याची शक्यता असते.दुसरे म्हणजे कांजण्या झालेल्या मुलांकडे लक्षदेण्यासाठी पालकांना घरीच रहावे लागल्याने किंवा कामावर जाणा-या लोकांना कांजण्यामुळे रजा घ्यावी लागल्याने वेतन बुडून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. कधी कधी आधी ठरविलेल्या सुट्‌टीतील सहलीच्या वेळी किंवा परिक्षेसारख्या कसोटीच्या वेळी मुलांना कांजण्या येऊन त्यांचे नुकसान होण्याची शक्यताअसते. खास करून कांजण्या झालेल्या व्यक्ति, मुले, तरूण किंवा प्रौढ कुणीही असली तरी कांजण्या आल्यानंतर त्यातून पुढील रोगसंबंधित समस्या निर्माण झाल्यास अशा व्यक्तीला इस्पितळात दाखल करावे लागल्याने वैद्यकीय खर्चात बरीच वाढ होते. तथापि, कांजण्यांना प्रतिबंध करण्याविषयी एक चांगली बातमी आली आहे.अगदी प्रथमच कांजण्या या रोगाचा भार प्रतिबंधीत करणारे इंजेक्शन विकसीत करण्यात आले आहे. या इंजेक्शनमुळे कांजण्या रोगाला प्रतिबंध केला जाण्याबरोबर मुले, तरूण आणि प्रौढांमध्ये दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारक्षमताही निर्माण केली जाते. कांजण्याचा प्रतिबंध होऊ शकतो. आजच आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या.कुणाला धोका आहे?पूर्वी कधीही कांजण्या न आलेल्या व्यक्तीला यापासून धोका आहे. अगदी, लहान मुले, तरूण आणि प्रौढांनाही हा रोग जडण्याची शक्यता आहे. केवळ बालपणातील रोग अशी समजूत असली तरी अलिकडील संशोधनाने दाखवून दिले आहे की तरूण आणि प्रौढांनाही हा रोग मोठ्या प्रमाणावर जडत आहे आणि त्यांच्या साठी हा रोग अधिक गंभीर स्वरूपाचा तसेच अधिक प्रमाणावर आरोग्य विषयक समस्या वाढविणारा असल्याचे आढळून आले आहे.

1
कांजिण्यांवरील उपचार

कांजिण्यांचा सामना करताना फोडांच्या जागेवर येणा-या खाजेवर व तापावर नियंत्रण ठेवणे हे एक महत्वाचे आव्हानच असते. कोमट पाण्याने आंघॊळ करताना अंगाला लावण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा डाळीचे पिठ वापरावे. हे उपायकारक व फायदेशिर असते. थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा थंड वातावरणाने खाज वाढण्याची शक्यता अधिक असते. 

खाजखुजलीवर उपाय म्हणून डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) किंवा हायड्रोक्सिझेन (ऍटारॅक्स) सारख्या गुणकारी औषधांचा वापर केला जाऊ शकतो. त्या त्या परिस्थितीशी अनुकुल असणारी गुणकारी लोशनही आपण वापरु शकतो. पण लहान मुलांनकडून तोंडावाटे डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) व लोशनचा अतिसेवन किंवा अतिवापर होणार नाही याची दक्षता घेणे फार महत्वाचे आहे. स्टेरॉईडचा समावेश असलेल्या औषधांचा वापर करु नये. 

लहान व तरुण मुलांसाठी ऍसप्रिन य औषधाचा वापर टाळावा कारण त्यामुळे Reye's syndrome सारखा जीवनाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता काही प्रमाणात असते. तापावर नियंत्रण आणण्यासाठी ऍसेटामाय्नोफेन औषधाचा वापर करावा. घातक आजार टाळण्यासाठी आय्ब्रुफेनचा वापर टाळावा. कांजिण्या या आजारात त्वचेला वारंवार खाज येत असते अशावेळेस हाताच्या बोटांची नखे कापावी किंवा हातमोजे वापरावे जेणेकरुन त्वचेला ईजा होणार नाही. तोंडातील जखमासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. शरिरास थंड असणा-या द्रव पदार्थाचे सेवन करावे व गरम, तिखट आणि आंबट पदार्थ (संत्र्याचा रस) टाळावेत. 

हात वारंवार धुवावे व शरिरास स्वच्छ ठेवावे जेणेकरुन संसर्ग होणार नाही. जर शरिराला हानीकारक असलेल्या किटाणुंचा संसर्ग झाला असेल आणि तो वाढून ताप पुन्हा येत असेल तर डॉक्टरांना त्वरीत दाखवावे. लहान मुलांना कांजिण्या झाल्या असतील त कुटुंबातील इतर सदस्यांना दक्षता घेण्याबद्दल सांगायला विसरु नका. 

त्वचेला चरे पडणे किंवा संसर्ग होणे आयुष्यभराचे दुखणे ठरु शकते. डॉक्टरांना जाऊ दाखवणे गरजेचे नाही हा दृष्टिकोन पुढे आपल्याला पेचात अडकवू शकतो. 

ऍसिक्लोविर (झोविरॅक्स), हे संसर्ग रोखणारे औषध आहे. त्वचेला चरे पडण्याच्या पहिल्या दिवसापासून वापरल्याने उपयोगी ठरु शकते. लहान मुलांना या औषधाच्या वपराची आवशक्ता नसते. हे औषध बराच वाढलेल्या आजारासाठी दिले जाते. कारण कांजिण्या हा संसर्गजन्य रोग आहे. अशा संसर्गजन्य वातावरणाचा प्रभाव कमी होईपर्यंत लहान मुलांना शाळापेक्षा घरातच शक्यतो ठेवावे.

कांजिण्यांपासून बचाव. 
वॅक्सिनपद्धतीने कांजिण्यापासून बचाव केला जाऊ शकतो (हे राष्टीय आरोग्य व जनता आरोग्य समुहांनी प्रमाणित केले आहे).

लहान व तरुण मुलांसाठी: १२ ते १८ महिन्याच्या मुलांपासून १२ वर्षाच्या सुदृढ बालकांवर (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर) वॅक्सिनपद्धतीने उपचार केले जाऊ शकतात. १३ वर्षे व त्याहुन अधिक वयाच्या बालकांना (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर)चार ते पाच आठवडे वॅक्सिनच्या औषधाच्या दोन मात्रा दिल्या जातात. वॅक्सिनेशन नंतर रोग प्रतिकार शक्तीची पुर्ण कल्पना येत नाही. पुन्हा दिलेल्या वॅक्सिनेशनमुळे पौढत्वाकडे वाटचाल करणा-या मुलांमधे रोग प्रतिकार शक्ती वाढते असे मानले जाते.
उत्तर लिहिले · 19/4/2018
कर्म · 1935
0

कांजण्या (Chickenpox) झाल्यावर आराम मिळवण्यासाठी काही उपाय:

  • पुरेशी विश्रांती: शरीराला आराम मिळणे खूप महत्त्वाचे आहे.
  • खाज कमी करण्यासाठी:
    • कॅलामाइन लोशन (Calamine lotion) लावा.
    • कोमट पाण्याने स्नान करा.
    • ओटमील बाथ (Oatmeal bath) घ्या.
  • पुरेसे पाणी प्या: डिहायड्रेशन (Dehydration) टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.
  • मऊ आणि सैल कपडे घाला: त्वचेला आराम मिळण्यासाठी सैल कपडे घाला.
  • नाخنं कापा: खाजवल्याने जखम होऊ नये म्हणून नखे कापा.
  • डॉक्टरांचा सल्ला: डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्या.

टीप: हा सल्ला केवळ माहितीसाठी आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5400

Related Questions

लहान मुलाचे केस वाढवण्यासाठी काय करावे?
निर्भरणीकरणाची कारणे स्पष्ट करा?
भारतातील औद्योगिक चिकित्सा करा भाषाची?
योग साधनेसाठी नैसर्गिक औषधी वनस्पतींचे महत्त्व?
योग साधनेसाठी नैसार्गिक ओषधी वनस्पतींचे?
योग जीवनशैली म्हणजे काय?
फास्ट फुडचे परिणाम?