राजकारण व्यक्तिमत्व हिंदु धर्म सामाजिक न्याय

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या 22 प्रतिज्ञांमध्ये देवांचा विरोध का केला आहे?

2 उत्तरे
2 answers

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या 22 प्रतिज्ञांमध्ये देवांचा विरोध का केला आहे?

32
का केलं ते त्यांनाच ठाऊक, कारण त्याचा लढा होता तेढ निर्माण करणाऱ्या समाजाशी, त्यांनी विरोध केला धर्म आणि लोकं मानत असलेल्या देवतांना ...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञा तेव्हा घेतल्या जेव्हा धर्मपरिवर्तन केले. त्या वेळी हिंदू धर्मामध्ये अनेक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी होत्या त्यांचा त्यांनी विरोध केला.

चला मान्य आहे हे सर्व, पण मग मला सांगा, दुसऱ्या धर्माचा अनादर करणे गरजेच आहे का? समाजाचा विकास हा धर्म रोखतो, की त्या धर्मामध्ये लोक तयार करत असलेल्या प्रथा?

त्यांचं एकोणीसाव प्रतिज्ञा-
"मैं हिंदू धर्म का त्याग करता हूँ जो मानवता के लिए हानिकारक है और उन्नति और मानवता के विकास में बाधक है क्योंकि यह असमानता पर आधारित है, और स्व-धर्मं के रूप में बौद्ध धर्म को अपनाता हूँ"

हिंदू धर्म हा मानवतेसाठी हानिकारक आहे, विकासामध्ये बाधा आहे हे खरंच योग्य वाटत का? गीता, या मध्ये अस काय आहे जे मानवतेला हानिकारक आहे? कोणताही धर्म इतर धर्मावर आक्षेप करत नाही. त्यांचा विरोध हा हिंदू च्या नावावर जगत असलेल्या, चुकीचे आचरण आणणार्या लोकांवर आहे मग एखाद्या धर्माला, त्या मधील श्रद्धेला अस हानिकारक वैगरे बोलणं खरंच योग्य आहे का? कोणतं देव आपल्याला चुकीचं वागायला शिकवतो, ज्याचं ते विरोध करतात? शांतपणे धर्मपरिवर्तन करू शकत नव्हते का?

मी जर आज धर्म परिवर्तन करायला गेलो, आणि केलंही, मग मला माझ्या आधी च्या किंवा दुसऱ्या कोणत्या धर्माबद्दल वाईट बोलण्याचा हक्क मिळतो का? मुळीच नाही.

एखाद्या धर्म, त्या मधील देवतांबद्दल श्रद्धेला अपशब्द वापरण्याचा आपल्याला हक्क नाही असं मला वाटत, आणि गरजेचं ही नाही.
हिंदू जनतेचा विरोध करा, त्यानी इतर जाती धर्माना कमी लेखल, तर मग हिंदू देवतांचा काय आलाय संबंध??

बाबासाहेब तिथे चुकले होते, खोटं वाटत? मग इतर धर्माचा एरिया मध्ये जाऊन त्यातील देवतांना काहीतरी म्हणा मग कळेल. धर्मपरिवर्तन करायचं होतं, मग तेवढंच करायचं होतं, शांताताप्रिय गौतम बुद्धांना तरी अस इतर धर्माबद्दल बोलणं आवडलं असत का?

आणि देव नाही हे तुम्ही आम्ही सगळे जाणतो, म्हणून देव नाही देव नाही बोंबलत सुटणं योग्य आहे का? जे काय मानता ते माना, जो धर्म हवा तो स्वीकारा पण आपलं ते बाळ, दुसऱ्याच कारट कशासाठी??? मी हिंदू आहे, म्हणून मी विकासामध्ये बाधा निर्माण करतोय का? माझा धर्म हानिकारक आहे का? नाही म्हणजे त्यांनी धर्माला विरोध करणे योग्य नव्हते, त्या लोकांना विरोध करणे गरजेचे होते.

(मला नक्की काय सांगायचं आहे ते पूर्ण उत्तर समजलं तरच कळेल, ज्यांना विरोध करायचं आहे त्यांनी उत्तर नावडले करून, व हिंदू मध्ये देव नाही वैगरे वैगरे काय प्रतिज्ञा करायची आहे ती करावी)
उत्तर लिहिले · 21/4/2018
कर्म · 85195
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या 22 प्रतिज्ञांमध्ये देवांचा विरोध खालील कारणांमुळे केला आहे:

  1. जातिव्यवस्थेचे उच्चाटन:

    हिंदू देव-देवतांच्या परंपरेने जातिव्यवस्थेला खतपाणी घातले, असे आंबेडकरांचे मत होते. त्यामुळे, त्यांनी या देवांना नाकारून जातिभेद निर्मूलनाचे ध्येय ठेवले.

  2. समानता आणि सामाजिक न्याय:

    हिंदू धर्मातील रूढीवादी विचारसरणीमुळे समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित होत नाही, असे त्यांचे मत होते. त्यामुळे, त्यांनी देवांना नाकारून सर्वांना समान संधी मिळावी, असा विचार मांडला.

  3. Buddhanusaran (बुद्धानुसरण):

    बौद्ध धर्मात देव आणि कर्मकांड यांना महत्त्व नाही. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारून लोकांना त्या मार्गावर चालण्यास प्रोत्साहित केले, ज्यामुळे ते अंधश्रद्धा आणि कर्मकांडांपासून दूर राहू शकतील.

  4. वैज्ञानिक दृष्टिकोन:

    आंबेडकरांनी लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्यास सांगितले. त्यांनी देवांवर श्रद्धा ठेवण्याऐवजी सत्य आणि तर्कावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला.

या प्रतिज्ञांद्वारे, आंबेडकरांनी लोकांना नवीन विचारसरणी स्वीकारण्यास आणि एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यास प्रवृत्त केले.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5400

Related Questions

नरेंद्र मोदी यांचा जन्म केव्हा झाला?
दबाव गटाचे पाच प्रकार लिहा?
राज ठाकरे यांच्या रॅलींना मोठी गर्दी जमते, मग लोक त्यांना मत का देत नाहीत?
राज ठाकरे प्रत्येकाला आवडतात पण त्यांचा पक्ष निवडून का येतं नाही?
राज ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी होते, पण लोक मनसेला मत का देत नाहीत?
काही नेत्यांच्या सभांना हजारोंची गर्दी होते, पण ते निवडणूक जिंकत नाहीत?
मराठी माणूस देशाचा पंतप्रधान का होऊ शकला नाही?