औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय आरोग्य

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल?

4 उत्तरे
4 answers

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल?

12

🏵 *उन्हाळ्यात तुम्ही स्वतःची कशी काळजी घ्याल?*

👉🏻 सद्ध्याचे तापमान चाळीशी गाठतंय, तर पुढचे महिने कसे असतील याची काळजी सगळ्यांना लागलीय.

📌 *_उन्हाळ्यात प्रत्येकानं आपापली काळजी कशी घ्यायची, यासाठी काही टीप्स_*

1. दुपारी 12 ते 3 यावेळेत उन्हात फिरू नका

2. चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स, दारू पिऊ नका

3. तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या

4. प्रवास करताना सोबत पाणी घ्या

5. ओआरएस, घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादी पेय प्या

6. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका

7. उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करा

8. सौम्य रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा

9. पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा

10. पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुलं, पाळीव प्राण्यांना सोडू नका

11. अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

12. जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसं पाणी द्या..
उत्तर लिहिले · 9/4/2018
कर्म · 115390
3
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे काही शारिरीक त्रास उद्भवतात.हे त्रास होऊ नयेत म्हणून उन्हाळ्यात पाणी जास्त प्यावे.शक्यतो फ्रीजमधील थंड पाण्याऐवजी माठातील पाणी प्यावे.किवा साधे पाणी प्यावे.पाण्याखेरीज इतर द्रव पदार्थसुद्धा प्यावेत.उनहातून घरात आल्यावर पाच मिनिटानंतर पाणी प्यावे.पाणी उभ्याने व घाईघाईत पिण्याऐवजी बसून घोट घेत घेत प्यावे.उन्हाळ्यात चक्कर येण्याची शक्यता असल्याने डोक्यावर टोपी घालून किंवा छत्री घेऊन बाहेर पडावे.सोबत पाणी व कांदादेखील बाळगावा.( ज्यांना उन सहन होत नाही त्यांच्यासाठी ही सूचना आहे).घराबाहेर मोकळी जागा असेल तर पाण्याचा शिडकावा मारावा.उनहाळ्यात दूध एरवीपैक्षा जास्त वेळा तापवावे म्हणजे दूध नासण्याची शक्यता कमी होते.उन्हाळ्यात अन्नपदार्थ नासण्याची शक्यता असल्याने ते लवकर संपवावेत किंवा फ्रिजमधे ठेवावेत व गरज असेल तेव्हा वापरायला घ्यावेत.कपडे सैलसर वापरावेत.गडद रंगाऐवजी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.वाळा घातलेले पाणी प्यावे.दारे व खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावावेत.लहान मुलांची काळजी जास्त घ्यावी.
उत्तर लिहिले · 9/4/2018
कर्म · 91065
0
उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • भरपूर पाणी प्या: उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते. त्यामुळे दिवसभरात नियमितपणे पाणी पित राहा.

    स्रोत: NHS Eatwell Guide

  • हलका आहार घ्या: उन्हाळ्यात पचनास जड असणारे पदार्थ टाळा आणि फळे, भाज्या, आणि पातळ पदार्थांचा आहारात समावेश करा.

    स्रोत: Mayo Clinic Nutrition and Healthy Eating

  • उन्हात जाणे टाळा: शक्यतोवर दुपारच्या वेळेत (12 ते 3) उन्हात जाणे टाळा.

    स्रोत: CDC Sun Safety

  • सनस्क्रीन वापरा: उन्हात जाणे गरजेचे असल्यास, त्वचेला सनबर्नपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन लोशनचा वापर करा.

    स्रोत: American Academy of Dermatology - Sunscreen 101

  • सुती कपडे वापरा: उन्हाळ्यात शक्यतोवर सुती आणि हलक्या रंगाचे कपडे वापरा. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.
  • पुरेशी झोप घ्या: उन्हाळ्यात शरीराला विश्रांती मिळणे आवश्यक आहे, त्यामुळे रात्री 7-8 तास झोप घ्या.
  • व्यायाम: नियमित व्यायाम करा, परंतु तो जास्त वेळ न करता सकाळी किंवा संध्याकाळी करा.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 940

Related Questions

केसतोडा यावर औषध कोणते?
ऍसिडिटीवर घरगुती उपाय?
छातीत जळजळ होत असेल तर सोपे घरगुती उपाय काय आहेत?
गोठलेला कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणता आहे?
मला हाताला गजकर्णाचे चट्टे उठले आहेत, तर यावर कोणता घरगुती उपाय आहे का?
कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता करता येईल?
कोणत्या अवकाशयानाने पहिल्यांदा मानवाला चंद्रावर सोडले उत्तर दाखवा?