2 उत्तरे
2
answers
NA44 आणि NA45 म्हणजे काय?
9
Answer link
जाहिरात विभाग : एनए-४४, एनए-४५, एनए-४७ ब म्हणजे काय?- जोड-१
औरंगाबाद परिसरात सिडको मान्यताप्राप्त हा आणखी एक निकष लावण्यात येतो. औरंगाबाद, नांदेड-वाघाळा महापालिकांच्या हद्दीबाहेर ग्रामीण भागात असलेल्या; पण या महापालिकांच्या विस्तारात समाविष्ट होणार्या गावांच्या रेखांकनाच्या मंजुरीचे अधिकार नगररचना उपसंचालकांऐवजी सिडकोला देण्यात आले आहेत. सिडको (सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) ही जागतिक दर्जाची संस्था आहे. जागतिक पातळीवरील निविदांसाठी ते पात्र आहेत. नागरी विकासातील सिडकोचा अनुभव लक्षात घेऊन नियोजन व अंमलबजावणीसाठी शासन त्यांची सेवा घेते. या दोन मनपा क्षेत्रांच्या हद्दीबाहेरील ठराविक गावांसाठी सिडको नोटिफाईड एरिया जाहीर झाला आहे. या भागाच्या एनए-४४ साठी सिडकोची मान्यता आवश्यक असते.

एनए-४५ अर्थात कलम ४५
काही जाहिरातींमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेली जमीन एनए-४५ असल्याचे नमूद केलेले असते. ही अक्षरश: धूळफेक आहे. खुल्या कृषी क्षेत्राचा बेकायदेशीररीत्या, सक्षम यंत्रणेकडून अकृषक आदेश न घेता निवासी, व्यापारी, औद्योगिक वापर लक्षात आल्यानंतर यासंदर्भात तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडून पंचनामा करून तहसीलदार/नायब तहसीलदार यांनी कलम ४५ जारी केलेली ती नोटीस असते. अवैध वापराबद्दल केलेली ही दंडात्मक कारवाई असते. या नोटिशीपासून ६ महिन्यांच्या आत सक्षम यंत्रणेकडून संबंधितांनी ठोठावलेला दंड भरून अकृषक आदेश मिळविणे यानुसार आवश्यक असते. उदाहरण द्यायचे, तर लायसन्स नसल्याबद्दल ट्राफिक पोलिसांनी केलेला दंड हा दंड असतो. ते लायसन्स नसते. त्यानंतर आरटीओत जाऊन लायसन्स मिळविणे आवश्यक असते, तसेच या एनए-४५ चे असते.
एनए-४७ बी अर्थात कलम ४७
खुल्या जागेवर अकृषक आदेश न मिळविता बांधकाम केलेले असल्यास ते बांधकाम नियमित करून घेण्यासाठी आणि त्या जागेचे अकृषक आदेश मिळविण्यासाठी या कलमांतर्गत आदेश मिळविता येतो. कलम ४५ अंतर्गत नोटीस बजावण्यात येते आणि कलम ४७ ब अंतर्गत संबंधित व्यक्ती स्वत:हून अकृषक आदेश मिळविते.
हे आदेश मिळविताना मुळात ती जमीन नगररचनाकारांच्या अथवा सिडकोच्या त्या विशिष्ट झोनमध्ये असणे आव्श्यक असते. यासंदर्भात अकृषक आदेश एन- ४७ ब असाच असतो, तो एनए-४४ असा मिळत नाही.
जमिनीचा सात-बारा जोडून रीतसर अर्ज दिल्यास आपल्याला हव्या त्या प्रॉपर्टीच्या विषयीची यासंदर्भातील माहिती उपसंचालक कार्यालय, नगररचना विभाग, मिल कॉर्नर, औरंगाबाद येथे मिळू शकते.
सदर माहिती लोकमत सौजन्याने घेतली गेली आहे...
धन्यवाद...
0
Answer link
NA44 आणि NA45 हे दोन प्रयोग आहेत जे CERN (युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च) मधील सुपर प्रोटॉन सिंक्रोट्रॉन (SPS) येथे केले गेले.
NA44:
- NA44 प्रयोग हा लहान-कोन हॅड्रॉन स्पेक्ट्रोमीटर होता.
- या प्रयोगाचा उद्देश हा जड आयन टक्करमध्ये उत्पादित कणांचा अभ्यास करणे हा होता.
- NA44 ने कण उत्पादन दर, त्यांची गती आणि वस्तुमानाचे वितरण यांसारख्या गोष्टींचे मापन केले.
NA45:
- NA45 प्रयोग, ज्याला CERES (Cerenkov Ring Spectrometer) असेही म्हणतात, हा इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन जोड्यांच्या अभ्यासासाठी बनवलेला होता.
- या प्रयोगाचा उद्देश क्वार्क-ग्लूऑन प्लाझ्मा (quark-gluon plasma) नावाच्या पदार्थाच्या स्थितीचा शोध घेणे हा होता, जी जड आयन टক্কरांमध्ये तयार होते.
- NA45 ने कमी वस्तुमानांच्या डायलेप्टॉन (dilepton) उत्पादनाचे मापन केले.
हे दोन्ही प्रयोग उच्च-ऊर्जा भौतिकशास्त्रातील मूलभूत संशोधन होते, ज्यांनी जड आयन टক্কरांच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.