4 उत्तरे
4 answers

माझी लवकर टक्कल पडली आहे, काय करावे?

17
_*🙇‍♀ केस गळत आहेत, टक्कल पडतंय मग हे उपाय करा*_
---------------------  ------------------
🙇‍♀ केस गळत आहेत, टक्कल पडतंय आणि अनेक उपाय करूनही फायदा मिळत नाहीये तर हे तेल आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. याने टक्कल पडलेल्या जागेवरही नवे केस येतील आणि केस दाट होतील. हे तेल नियमितपणे केसांना लावल्याने, केसांचे गळणे कमी होईल. याव्यतिरिक्त केसांमध्ये दाटपणा येईल.

💆‍♀ *हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला 5 वस्तूंची गरज आहे ज्या सहजपणे उपलब्ध असतात.*

1. लसणाच्या पाकळ्या: 6 ते 7
2. ताजा चिरलेला आवळा: 2 ते 3
3. चिरलेला कांदा: 1 लहान
4. एरंडेल तेल: 3 चमचे
5. नारळाचे तेल: 4 चमचे

💁‍♀ *कृती* - सर्वात आधी एका वाटीत नारळाचे तेल आणि एरंडेल तेल एकत्र मिसळून घ्या. आता यात कापलेला लसूण, कांदा आणि आवळा टाका. हे मिश्रण मंद आचेवर 5 मिनिट शिजवून घ्या. आता आचेवर काढून किमान 1 तास हे मिश्रण असंच राहू घ्या.

------------------------
तुमचे केस गळत असतील आणि तुम्हांला टक्कल पडत असेल तर घाबरू नका. तुम्हाला आम्ही असे काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल.

१. तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा
२. ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.
३. केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको.
४. पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी गरम करून लावल्यास लाभ होतो.
५. तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.
६. कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.
7. शिर्षासन करा.शिर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.
8. मुल्तानी माती लावा. केसांचं टेकश्चर चांगलं होण्यास मदत होते. केसांची चमक वाढते.
9. आवळा आणि शिकाकायी लोखंडाच्या कढईत भिजत घाला. दोन दिवसांनी ते काढूण वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेंहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा.
10. कंडिशनिंग आणि डैंड्रफ दूर करण्यासाठी दही लावा.
11. खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. चांगले प्रोड्क्टस वापरा.
12. बाबा रामदेवच्या म्हणण्यानुसार हातांची नखे एकमेकांवर घासा.
13. व्हिटॅमिन ई गोळ्या घेऊ शकता. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
14. केस कधी कधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात.

15. डोकंवर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघु नका ओल्या कपड्याने तो पुसून टाका.
16. अळशीच्या बिया खा.
17. गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो डोक्यावर ठेवा.
18. केसांमधून सतत हात फिरवू नये.
19. केसांना नेहमी  फणीने विंचरले पाहीजे.
20. जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.
उत्तर लिहिले · 14/9/2018
कर्म · 569265
14
✍️✍️प्रथम कारणे जाणून घेऊ
केस गळतीची ढोबळ कारणे✔️

* एखादे मोठे आजारपण किंवा मोठ्या ऑपरेशननंतर.
* तणाव व काळजीमुळे.
* हार्मोनलसंबंधी समस्या उदा. थायराइड
* काही औषधांमुळेसुद्धा केसांच्या गळण्यात वाढ होते जसे : रक्त पातळ करणारे औषध, जादा व्हिटॅमिन 'अ' घेतल्याने. कुटुंब नियोजनाच्या गोळ्या घेतल्याने.
* संक्रमणामुळे.
* रसायन इत्यादीच्या प्रयोगामुळे - ब्लीचिंग, डायचे जास्त केल्याने केस कमजोर होतात व त्यांची गळती सुरू होते.
* आहारात प्रोटिन कमी घेणे.

केस गळतीची मुख्य कारणे :✔️
*एंड्रोक्वेनिक एलोपीसिया : 95 टक्के लोकांच्या केस गळण्याचे मुख्य कारण या प्रकारचे असते. पुरुष व महिलांमध्ये सामान्यपणे हा त्रास आढळतो. या प्रकारचे केसांचे गळणे पुरुष हार्मोन व आनुवंशिकतेमुळे होते.

*एलोपीसिया एरियाटा :या प्रकारच्या केसांच्या गळतीत कुठल्याही भागातील केस गळू लागतात व तेवढ्या भागात टक्कल पडते. हे एखाद्या शिक्क्याच्या आकाराचे किंवा मोठा असू शकतो. हा आजार शरीरामध्ये होणार्‍या बदलामुळे होतो. ह्या आजारात डोक्याचे, भुवई किंवा दाढी यापैकी कुठल्याही भागातील केस गळायला लागतात.

*सिकासिट्रियल एलोपीसिया :या प्रकारच्या केस गळतीमध्ये टक्कल पडलेल्या जागेवर खाज, दुखणे सूजसुद्धा येते. ज्या जागेवर टक्कल पडली असेल त्या जागेवर परत केस येत नाही.

केस ओढल्यामुळे गळणे :
* या आजारात लोक आपल्या हाताने केस ओढतात किंवा सतत केस विंचरत राहतात, अशा व्यक्तींना हे समजावून सांगावे लागते.
* फंगस - हा आजार फंगसाच्या संक्रमणामुळे होतो. यामुळे प्रभावित झालेल्या जागेवर खाज सुटते व तेवढी जागा लाल होते. याचा उपचार अँटी फंगल औषधांनी केला जातो.

केसांची गळती थांबविण्यासाठी उपचार :
* केसांची गळती थांबविण्यासाठी औषध दिवसातून 2 वेळा लावावे. हे औषध पुरुष व स्त्री दोघही लावू शकतात.
* ज्या जागेवर टक्कल पडले असेल तिथे कॉर्टिझोनचे इंजेक्शन द्यायला पाहिजे.
* केस गळण्याचा योग्य उपचार म्हणजे खाण्यात प्रोटिनाचे प्रमाण वाढविणे.
,〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉
केस गळती थांबवण्याचे उपाय 🙄

रोज बदामाच्या तेलाने केसांची चांगली मालिश करून बेसनाने केस धुवावेत.
* दही, लिंबू किंवा आवळ्याचा रस बेसनात मिसळून तयार झालेल्या पेस्टने केस धुवावेत.
* केस धुतल्यानंतर टर्किश टॉवेल गरम पाण्यात भिजवून त्याने केस बांधून गरम पाण्याची वाफ द्यावी.
* रात्री झोपण्याच्या आधी केसांना लिंबूच्या रसाने मालिश करावी.
* त्रिफळा चुर्णाचे सेवन करावे व त्याने आठवड्यातून एकदा केस धुवावेत.
* शरीरावरील अतिरिक्त चरबी घालवण्यासाठी अचानक जेवण बंद अथवा कमी केल्याचा केसांवर प्रतिकूल परिणाम जाणवतो.
* केसांचे धुळ मातीपासून संरक्षण करा, अधुनमधुन केसांवर कंगवा फिरवत रहा.
* गाजर बारीक करून त्याचा लेप लावल्याने केस तुटणे थांबते.
* केस विरळ आहेत आणि ते वारंवार गळतात. अशी स्थिती असल्यास केस मोकळे करून दररोज सकाळी खुल्या हवेत फिरायला गेले पाहिजे.
* आवळा चुर्ण लिंबाच्या रसात मिसळून तयार झालेला लेप केसांना लावल्याने केस काळे, मुलायम व मजबूत होतात.
* लिंबू तसेच बोराच्या पानांचा लेप लावल्याने नवीन केस उगवतात व केस लांब होतात.
* रात्री केसांना आवळ्याचा रस लावावा. तसेच कच्चा कोबी, कांदा व कच्चा पालक खावा.
* मेथीचे दाणे बारीक करून त्याचे चुर्ण केसांना लावल्याने केस गळणे थांबते.
* दररोज मानेचे व्यायाम केले पाहिजेत.
* केस दिवसभरातून किमान दोन वेळा तरी विंचरले पाहिजेत.
* आवळा, चमेली यांचे तेल केसांना लावले पाहिजे.
* दररोज पौष्टीक आहार घ्यावा. त्यात सुका मेवा, जाम, पपई, आंबा, संत्री, गाजर, आवळा, पालक, कोबी आदी क्षारयुक्त फळभाज्यांचा त्यात समावेश असावा.
* केस नेहमी स्वच्छ ठेवा. केस धुण्यासाठी केमिकलयुक्त उत्पादने वापरण्यापेक्षा नैसगिक उत्पादने वापरणे उत्तम.✔️✔️✔️
उत्तर लिहिले · 25/3/2018
कर्म · 26630
0

टक्कल पडणे ही एक सामान्य समस्या आहे, आणि त्यावर उपाय अनेक आहेत. खाली काही उपाय दिले आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात:

उपाय:

  1. आहार:

    • प्रथिने (proteins) युक्त आहार घ्या.
    • लोह (iron) आणि जस्त (zinc) भरपूर असलेले पदार्थ खा.
    • व्हिटॅमिन (vitamins) आणि खनिजे (minerals) असलेले अन्न खा.
  2. तेल:

    • नियमितपणे तेल लावा आणि मसाज करा.
    • आवळा तेल, बदाम तेल, किंवा नारळ तेल वापरू शकता.
  3. औषधे:

    • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मिनोक्सिडिल (Minoxidil) किंवा फिनास्टराइड (Finasteride) सारखी औषधे वापरा.
  4. केसांची काळजी:

    • केसांना नियमितपणे शॅम्पू करा.
    • गरम पाण्याने केस धुणे टाळा.
    • केसांना जास्त जोर देऊन बांधू नका.
  5. तणाव कमी करा:

    • तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.
    • पुरेशी झोप घ्या.
  6. नैसर्गिक उपाय:

    • कोरफड (Aloe vera) जेल केसांना लावा.
    • मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी केसांना लावा.
    • कांद्याचा रस केसांना लावा.

डॉक्टरांचा सल्ला:

जर टक्कल पडण्याची समस्या गंभीर असेल, तर त्वचा रोग तज्ञाचा (dermatologist) सल्ला घ्या.

टीप: कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5280

Related Questions

निर्भरणीकरणाची कारणे स्पष्ट करा?
भारतातील औद्योगिक चिकित्सा करा भाषाची?
योग साधनेसाठी नैसर्गिक औषधी वनस्पतींचे महत्त्व?
योग साधनेसाठी नैसार्गिक ओषधी वनस्पतींचे?
योग जीवनशैली म्हणजे काय?
फास्ट फुडचे परिणाम?
खालील विधाने वाचुन त्यातील योग्य उत्तराची निवड करा. Assertion (A)दीर्घकालीन ताण मानसिक विकाराना कारणीभूत ठरू शकतो.(R)ताणामुळे शरीरातील हामोनल संतुलन बिघडते.a?