शब्दाचा अर्थ प्रक्रिया

फेरफार नोंदीविषयी सविस्तर माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

फेरफार नोंदीविषयी सविस्तर माहिती मिळेल का?

7
फेरफार नोंद व प्रमाणित नोंद

शेत जमीन किंवा इतर जमीन एकाद्या व्यक्तीकडे जमीन खरेदी करून किंवा इतर कारणाने येते.अशी प्राप्त झालेली जमीन आपल्या मालकीची आहे यासाठी त्याचे रीतसर नोंद होणे गरजेचे आहे.त्यासाठी ती जमीन आपल्या कडे कश्या पद्धतीने आली आहे हे दर्शवणारे पुरावे सादर करावे लागतात त्या कागदपत्रांच्या आधाराने सर्वप्रथम फेरफार नोंद लिहिली जाते.व ती प्रमाणित आहे किंवा नाही हे तपासण्याची प्रक्रिया सुरु होते.

फेरफार नोंद व प्रमाणित नोंद यामधील काही महत्वाच्या बाबी खाली आहेत :-

१. फेरफार मधील नोंदी मंजूर किंवा नामंजूर करण्याचं अधिकार तलाठी यांना नाही. ते फक्त नोंद करून घेतात.

२. फेरफार नोंदी मंडल अधिकारी किंवा सर्कल अधिकारी प्रमाणित करीत असतात. 

3. मंजूर अथवा नामंजूर झालेल्या नोंदी मध्ये कसलाही बदल करण्याचा अधिकार तलाठी व मंडल अधिकारी यांना नाही.

४. अशा मंजूर अथवा नामंजूर नोंदी विरुद्ध बाजू मांडण्यासाठी संबंधित प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करावी लागते.

५. फेरफार नोंद झाल्यानंतर लगेचच त्याची नोंद ७/१२ वर येते .

६. ७/१२ वरील मालकी हक्काचा उल्लेख हा फेरफार नोंदीत असतो. 

७. कायद्याने प्रमाणित नोंद चुकीची आहे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ती खरी मानण्यात येते.

८. जमिनीच्या अधिकारात होणाऱ्या बदलानुसार त्याच क्रमवारीत त्याच्या नोंदी होत असतात. 

९. ७/१२ वरील झालेला बदल कसा झाला आहे याची गेल्या १०० वर्षातील माहिती फेरफार नोंद वाचल्यावर समजू शकते.

१०. फेरफार वरून खातेदाराच्या मालकीच्या एकूण जमिनी बाबत माहिती मिळते.

११. फेरफारसाठी आसामीवार खतावणी, ८ अ चा उतारा, जमाबंदी पत्रक असेही म्हणतात. ८ अ वर खातेदाराच्या नावावर असलेल्या सर्व जमिनींच्या गटांची,त्याचा जमीन महसूल व इतर कर याची माहिती मिळते.

१२. ८ अ हा गाव नमुना म्हणजे जमिनीची नोंद वही असून या नमुन्यात खातेदाराने धारण केलेल्या सर्व जमिनीची नोंद केली जाते.

_________

💐 फेरफार नोंदीतील चुकांची दुरुस्ती

फेरफार मध्ये झालेल्या चुकांमुळे सातबारा वर तशीच नोंद ओढली जाते.

फेरफारमधील चुकांची दुरुस्ती संबंधीत माहिती :-

१.लेखनातील चुका व त्याची दुरुस्ती :- 

हमखासपणे नावात चुका होतात. एखादा गट नंबर वगळला जातो. अशा प्रकरणी महसूल खात्याने नव्याने नोंद घेण्याची आवश्यकता नसते. लेखन प्रमादानातील चूक दुरुस्त करतेवेळी खातेदाराने थेट संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करावा. त्यांना कलम 155 महाराष्ट्र महसूल अधिनियमाखाली संबंधित रेकॉर्ड दुरुस्त करून घेण्याचे अधिकार असतात. ज्या प्रकरणात महसूल खात्याची चूक असते; अशा केसेसमध्ये तहसीलदार निर्णय घेऊन चूक दुरुस्ती करून घेऊ शकतात. मात्र योग्य ती कार्यवाही करावी; असा आदेश खालील महसूल कर्मचाऱ्यांना देऊ नये तर जमीन महसूल कायद्यातील संबंधित तरतुदीखाली चूक दुरुस्त व्हावी असे आदेश द्यावेत. 

२. हक्काबाबत होणाऱ्या चुका व त्याची दुरुस्ती:-

जमिनीच्या मालकी हक्क ,कुल ,वारसा, उत्तराधिकारी इत्यादी हक्कांमध्ये आपल्याला स्थान देण्यात आले नाही असे वाटणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या पुराव्याच्या आधारे आपणास सादर बाबत हक्क आहे. हे मांडण्यासाठी फेरफार नोंदी विरुद्ध रीतसर अपील किंवा फेर तपासणी केली पाहिजे.

जमीन व्यवहाराच्या बाबतीत फेरफारमध्ये झालेल्या चुका व त्याची दुरुस्ती बाबत :-

पूर्वी झालेल्या नोंदीमध्ये दुरुस्ती संबंधी नोंदणी दुबार होणे कामी अपील करावी लागते. असा अर्ज केल्यानंतर फार तपासणी केली जाते व नंतरच दुरुस्ती संबंधी निर्णय घेण्यात येतो. शेतकरी तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल करतात व फेरफार नोंदीमध्ये दुरुस्तीचा आग्रह धरतात परंतु त्यासाठी कार्यालयीन प्रक्रिया पार पदवी लागते जरी चूक असेल तरीसुद्धा.

______________________

💐 चुकीची नोंद होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी

चुकीच्या नोंदी होऊ नये यासाठी शेतकऱ्याने आपला सातभारा वेळोवेळी नीट तपासून पाहावा व चूक असेल तर तलाठ्याला दाखवणे. 

१. पीक पाहणीच्या काळात, जमीन मालक सोडून, दुसर्याि कोणाचेही नांव वहिवाटदार सदरी थेट दाखल करण्याचे अधिकार तलाठयांना नाहीत. त्यामुळे जमीन मालक सोडून अन्य व्यक्ती वहिवाटीचा दावा करीत असेल तर फक्त अहवाल पाठविण्याची जबाबदारी गाव कामगार तलाठयाची आहे. त्यानंतर रितसर चौकशी करुन वहिवाटदार सदरी कोणाचे नांव लावावे याचा आदेश तहसलिदार यांच्याकडूनच दिला जाते.

२. पीक पहाणीच्या काळात, शेतातील पीके व त्यांचे क्षेत्र तसेच झाडे यांची नोंद ७/१२ वर करणे.

३. आपल्या शेतात किती क्षेत्रावर आपण कोणते पीक घेतले आहे व त्याची अचूकपणे ७/१२ वर नोंद झाली आहे काय? याची खात्री प्रत्येक शेतकर्यातने केली पाहजे. तसेच फळझाडांच्या नोंदीदेखील ७/१२ वर करुन घेतल्या पाहिजेत.

४. एखाद्या महत्वाच्या विषयासंबंधीची चर्चा गावामध्ये असेल त्यावेळी शेतकर्यां नी त्या विषयासंबंधीची माहिती, गावी करण्यांत आलेले प्रसिध्दीकरण वाचून घेतली पाहिजे. उदा. मतदार यादीवर जर हरकती मागविल्या असतील तर आपल्या घरातील सर्वांची नांवे नोदवली आहेत काय? हे बघणे शेतकर्यांणच्या हिताचे आहे.

५. नवीन शर्तीच्या जमीनीचे हस्तांतरण झालेले आढळल्यास त्याचा अहवाल तहसिलदार यांचेकडे पाठविणे.

६. संबंधीत शेतकर्यांरनी याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन, संबंधीत वरिष्ठ अधिकार्यां कडे कामकाज चालविले पाहिजे. नवी शर्तीच्या जमीनीचे बेकायदेशीर हस्तांतर होणार नाही, हे बघण्याची जबाबदारी तलाठयांवर आहे. असे हस्तांतर कायदेशीर करण्याचे अधिकार तलाठयाचे नाहीत. त्यामुळे त्याबाबत तलाठयांकडे 

आग्रह धरु नये.

७. जेव्हा गावात नवीन शिधापत्रिका दिल्या जातात तेव्हा घरातील सर्व व्यक्तींची नोंद आवश्यकपणे त्यावर केली पाहिजे.

८. पीक पाहणी व नोंदणी कालावधीत जातीने शेत हजार राहावे.

९. शेजारच्या शेतकर्यादने मोजणीचा दगड हलविला किंवा काढून टाकला तर मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांना ताबडतोब लेखी अर्ज देता येईल.

१०. कॅनॉल, पाझर तलाव, स्मशानभूमी, गावठाण वाढ, रस्ता अशा सार्वजनिक कामास जमीन संपादन केली जाते. त्यावेळी शेतकर्यााने जागेवर उपस्थित राहणे, नक्की कोणत्या बाजूची जमीन संपादनास विचारात घेतली आहे. हे जाणून घेतले पाहिजे. आपण गैरहजर राहिलो तर सरकारला जमीन घेता येणार नाही, असा एक मोठा गैरसमज शेतकर्यांलमध्ये आढळून येतो. वास्तविक समक्ष उपस्थित राहून किती जमीन व कोणत्या बाजूची घेतली जाते हे कळू शकते. शिवाय भूसंपादनाची अंतिम अधिसूचना प्रसिध्द होण्यापूर्वी योग्य ती हरकत शेतकरी मांडू शकतो. समक्ष उपस्थित राहिल्यास अनेकवेळा जमीनीची प्रत व भूसंपादनाचे क्षेत्र याबाबत तडजोडीतून काही मार्ग निघू शकेल. उदा. जर रस्त्यासाठी काळया जमीनीतून, विहिरी जवळून, घराशेजारुन किंवा जमीनीचे तुकडे करुन क्षेत्र घेतले जात असेल तर त्याऐवजी शेजारच्या मुरमाड जमीनीतून, विहिरी पासून अंतरावर, घरापासून लांब किंवा बांधावरुन किंवा तुकडे होणार नाही अशारितीने रस्ता सूचविता येईल व आपल्या हक्काचे संरक्षण करता येईल.

_____________________

💐 फेरफारासाठी महत्वाच्या नोंदवह्या

कलाम १५६ मध्ये ग्राम्पातली वरील महसुली लेखांकन महसुली लेखे व कार्यपद्धती एकीकरण समितीने तयार केलेल्या मार्गदर्शक नियमावली खंड ४ प्रमाणे सध्या गाव पातळीवर महसुली हिशोब व अभीलेख नोंदीची कार्यपध्द्ती अवलंबली जाते.

गाव नमुना नं. २: या नोंदवहीत गावातील सर्व बिनशेती जमिनींची माहिती असते. 

गाव नमुना नं. ३ : या नोंदवहीत दुमाला जमिनींची म्हणजेच देवस्थानसाठी असलेल्या जमिनींची नोंद मिळते. 

गाव नमुना नं. ४ : या नोंदवहीत गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते. 

गाव नमुना नं. ५ : या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावचा महसूल, जिल्हा परिषद कर, शिक्षण कर वगैरेची माहिती मिळते. 

गाव नमुना नं. ६ : म्हणजेच हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार नोंदवही, यात जमिनीचा सर्व फेरफार व्यवहार, खरेदी - विक्री, वारस, तारीख, खरेदी रकमा व संबंधित माहिती तपशिलासह मिळते. 

गाव नमुना नं. ६ अ : फेरफारास हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती या नोंदवहीत मिळते. 

गाव नमुना नं. ६ क : या नोंदवहीत मयत वारस नोंदीची माहिती मिळते. 

गाव नमुना नं. ६ ड : या नोंदवहीत जमिनीचे पोटहिस्से वाटणी, भूसंपादन यांची माहिती मिळते. 

गाव नमुना नं. ७ : या नोंदवहीत जमीनमालकाचे नाव, क्षेत्र, गट नंबर, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, पोटखराबा, आकार यांची माहिती शेताच्या स्थानिक नावासहित असते. 

गाव नमुना नं. ७ अ : या नोंदवहीत (७/१२ उतारा) कूळ वहिवाटीची माहिती मिळते, जसे कुळाचे नाव, आकारलेला कर, खंड याबाबतची माहिती मिळते. 

गाव नमुना नं. ८ अ : खाते उतारा, या नोंदवहीत खातेदाराचा खाते नं., एकूण जमिनीचे गट नंबर / सर्व्हे नंबरसहित क्षेत्र आकारणी, खातेदाराच्या नावासहित आढळते. 

गाव नमुना नं. ८ ब, क, ड : या नोंदवहीत गावातील जमिनीच्या जमीन महसुलीची, थकबाकीची, ............आकारपड जमिनीची नोंद मिळते. 

गाव नमुना नं. ९ अ : शासनास दिलेल्या करांची व त्या संबंधित पावत्यांची माहिती मिळते. 

गाव नमुना नं. १० : जमिनीच्या एकूण जमा महसुलाची नोंद मिळते. 

गाव नमुना नं. ११ : गटाप्रमाणे किंवा सर्व्हे नंबरप्रमाणे पीकपाणी, झाडांची माहिती मिळते. 

गाव नमुना नं. १२ व १५ : पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था, कसण्याची पद्धत, कोणाच्या नावे पीक पाहणी आहे, याचा तपशील रीत-१, रीत-२, रीत-३ म्हणजे स्वतः अंगमेहनतीने शेत कसणे, मजुरांकरवी शेत कसणे, इतरांकडून कसून घेणे याचा अंतर्भाव होतो. 

गाव नमुना नं. १३ : या नोंदवहीत गावची लोकसंख्या, गावातील जनावरे यांचा तपशील, संख्या याची माहिती असते. 

गाव नमुना नं. १४ : स्वतः मालकाशिवाय इतर कोणी शेत कसत असल्यास कसणाऱ्याच्या नावाचा उल्लेख या नोंदवहीत फॉर्म नं. १४ द्वारे आढळतो. 

गाव नमुना नं. १६ : या नोंदवहीत माहिती पुस्तके, आकारणी याची माहिती मिळते. 

गाव नमुना नं. १८ : मंडल अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या पत्रव्यवहाराची माहिती मिळते. 

गाव नमुना नं. १९ : या नोंदवहीत सरकारी मालमत्तेची माहिती मिळते. 

गाव नमुना नं. २० : पोस्ट, तिकिटे, आवक - जावक यांची नोंद वही. 

गाव नमुना नं. २१ : मंडल अधिकारी यांनी केलेल्या कामाची नोंद वही.

___________________

💐 फेरफारासाठी आवश्यक बाबी

जमीनीबाबतच्या अधिकारामध्ये जसजसा बदल होतो त्याप्रमाणे अनुक्रमाने या नोंदी घेतल्या जातात. शेतकर्यांअच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा गाव नमुना असून त्याबाबत योग्य ती दक्षता व काळजी त्या त्या वेळी न घेतल्यामुळे अनेकांच्या जीवनात फेरफार घडवून आणलेली हीच ती फेरफार नोंदवही आहे.

नोंदीतील तपशिल कसा लिहीतात :

स्तंभ-१ : या स्तंभामध्ये फेरफार नोंदीचा अनुक्रमांक लिहीला जातो.

स्तंभ-२ : या स्तंभामध्ये हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकाराचे स्वरुप लिहीले जाते. यामध्ये फेरफाराचा दिनांक, सूचना मिळाल्याचा दिनांक, व्यवहाराचे स्वरुप, संबंधीत खातेदारांची नांवे, व्यवहाराचा दिनांक, मोबदला रक्कम इत्यादी तपशिल असतो.

स्तंभ-३ : जमीनीचा व्यवहार ज्या गट नंबर किंवा सर्वे नंबरशी संबंधीत आहे, त्याचा नंबर लिहीला जातो.

स्तंभ-४ : अशाप्रकारे केलेल्या फेरफाराबद्दल संबंधीतांना नोटीस देऊन, चौकशी करुन व केलेला फेरफार बरोबर करण्यांत आला आहे याबद्दल स्वत:ची खात्री करुन प्रमाणन अधिकारी (बहुदा मंडल अधिकारी) स्तंभ-४ मध्ये योग्य तो आदेश देतात व पदनाम लिहून स्वाक्षरी करतात.

नोंदी कोणाकडून होतात? 

राज्यभर या नोंदी तलाठी मंजूर करतात असाही एक गैरसमज आहे. फेर फार नोंदी या फक्त तलाठयाकडून लिहील्या जातात. त्या मंजूर किंवा नामंजूर करण्याचा कोणताही अधिकार तलाठयास नाही.

नोंदीची मंजूरी :

नोंदी या मंडल अधिकारी किंवा सर्कल भाऊसाो हे प्रमाणित करतात. कोणतीही नोंद एकदा मंजूर किंवा नामंजूर झाल्यानंतर या नोंदीमध्ये बदल करावयाचा तलाठयास किंवा मंडल अधिकार्यांोना कसलाही अधिकार नसतो.

_____________

💐  फेरफार नोंदविण्याची कार्यपध्द्ती

७/१२ वर कोणताही हक्क नोंदवण्यापूर्वी फेरफार नोंद केली जाते. गावदप्तरी याला गाव नमुना नं.६ - फेरफाराची नोंदवही असे म्हणतात. अनेक ठिकाणी हा नमुना ड म्हणून तर काही ठिकाणी नोंदीचा उतारा म्हणून प्रसिध्द आहे. फेरफाराची नोंदवही ही वास्तविक फेरफाराची दैनंदिनी आहे. जमीनीबाबतच्या अधिकारामध्ये जसजसा बदल होतो त्याप्रमाणे अनुक्रमाने या नोंदी घेतल्या जातात. शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा गाव नमुना असून त्याबाबत योग्य ती दक्षता व काळजी त्या त्या वेळी न घेतल्यामुळे अनेकांच्या जीवनात फेरफार घडवून आणलेली हीच ती फेरफार नोंदवही आहे.

कायदा : भारतीय नोंदणी कायदा कलम १७; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनायम १९६६, कलम १४९ क १५०;

मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२. 

फेरफार नोंद प्रमाणित करण्यासाठी कार्यपद्धती - 

महसूल नियमावली क्र. १७, महसूल कायदा कलम १५० (४) दर्शविल्याप्रमाणे विवादग्रस्त प्रकरणाच्या नोंदवहीत नोंदलेल्या विवादाचा निर्णय करण्यासाठी व फेरफाराच्या नोंदवहीत नोंदलेल्या विवादाचा निवाडा करण्यासाठी व त्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यापूर्वी आणि फेरफाराच्या नोंदवहीत नोंदी प्रमाणित करण्यापूर्वी मंडल अधिकारी नमुना क्र. ११ तलाठ्याला कळवील अशी माहिती मिळाल्यानंतर अशा नोंदीत १५ दिवस अगोदर तलाठी हितसंबंधीय व्यक्तींना नमुना नं. १२ मध्ये नोटिसा देईल आणि विवादाचा निवाडा करण्यासाठी किंवा नोंदी प्रमाणित करण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी त्यासारखेस व वेळेस उपस्थित राहण्यास फर्मावतील. विवादाचा निवाडा करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेस व ठिकाणी ............प्रमाजन अधिकारी / मंडल अधिकारी नोंदीविषयी उपस्थित व्यक्तीच्या समक्ष वाचून दाखवतील. अशा नोंदीचा अचूकपणा सर्व उपस्थित व्यक्तींनी कबूल केला असेल तर, इतर कोणतीही कायदेशीर अडचण नसेल तर नोंद प्रमाणित करण्यात येईल. नोंदीतील चूक कुणाही संबंधित व्यक्तीच्या किंवा महसूल अधिकाऱ्याच्या निदर्शनात आल्यावर तत्काळ दुरुस्ती केली जाईल; मात्र नोंदीसाठी आवश्यक दस्तात काही चुका आढळल्यास योग्य त्या कायदेशीर तरतुदीनुसार दस्त दुरुस्त झाल्यानंतरच नोंद दुरुस्त केली जाईल.

________________

उत्तर लिहिले · 22/3/2018
कर्म · 26630
0
div > फेरफार नोंद (Mutation Entry) जमिनीच्याrecords मध्ये केला जाणारा एक महत्वाचा बदल आहे. यात जमिनीच्या मालकी हक्कामध्ये होणारे बदल, जमिनीवरील अधिकार, দায়ित्वे, तसेच जमिनीच्या वापरात होणारे बदल नोंदवले जातात. फेरफार नोंद म्हणजे काय? जेंव्हा जमिनीच्या मालकीमध्ये बदल होतो, उदाहरणार्थ, खरेदी, वारसा हक्काने, दान, विभाजन किंवा इतर कोणत्याही प्रकारे, तेव्हा त्या बदलाची नोंद सरकारी दफ्तरी करणे आवश्यक असते. या बदलाची नोंद करण्यासाठी ‘फेरफार’ अर्ज दाखल केला जातो. फेरफार नोंद ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, ज्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कामध्ये झालेले बदल अधिकृतपणे नोंदवले जातात. फेरफार कधी दाखल करावा लागतो? खालील परिस्थितीत फेरफार दाखल करणे आवश्यक आहे: * खरेदी-विक्री: जमीन खरेदी किंवा विक्री केल्यास. * वारसा हक्क: वारसा हक्काने जमीन मिळाल्यास. * दान: जमीन दान केल्यास किंवा स्वीकारल्यास. * विभाजन: जमिनीचे तुकडे झाल्यास. * गहाण: जमीन गहाण ठेवल्यास किंवा गहाणखत रद्द झाल्यास. * আদালতের आदेश: न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या मालकी हक्कात बदल झाल्यास. फेरफार नोंदणीची प्रक्रिया: फेरफार नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे: * अर्ज दाखल करणे: फेरफार करण्यासाठी तहसील कार्यालयात किंवा संबंधित भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दाखल करावा लागतो. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. * कागदपत्रांची तपासणी: अर्ज दाखल केल्यानंतर, संबंधित अधिकारी कागदपत्रांची तपासणी करतात. * नोटीस: कागदपत्रे तपासल्यानंतर, अधिकारी संबंधित व्यक्तींना नोटीस पाठवतात, ज्यामध्ये फेरफारावर आक्षेप घेण्यासाठी संधी दिली जाते. * चौकशी: जर कोणाने आक्षेप घेतला, तर त्या आक्षेपाची चौकशी केली जाते. * नोंदणी: चौकशीनंतर, जर कोणताही आक्षेप नसेल किंवा आक्षेप निकाली काढला गेला असेल, तर फेरफार नोंद मंजूर केली जाते आणि जमिनीच्या record मध्ये नोंदवली जाते. आवश्यक कागदपत्रे: फेरफार अर्जासोबत खालील कागदपत्रे आवश्यक असू शकतात: * खरेदीखत (Sale Deed). * वारसा दाखला (Succession Certificate). * दानपत्र (Gift Deed). * विभाजनपत्र (Partition Deed). * गहाणखत (Mortgage Deed). * আদালতের आदेश (Court Order). * ओळखपत्र (Identity Proof). * पत्त्याचा पुरावा (Address Proof). * जमिनीची कागदपत्रे (Land Documents). फेरफारचे महत्व: फेरफार नोंदणीचे महत्व खालीलप्रमाणे आहे: * कायदेशीर मान्यता: फेरफार नोंदणीमुळे जमिनीच्या मालकी हक्काला कायदेशीर मान्यता मिळते. * मालमत्तेचे संरक्षण: यामुळे मालमत्तेचे संरक्षण होते आणि वादविवाद टाळता येतात. * सरकारी योजनांचा लाभ: सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फेरफार नोंदणी आवश्यक असते. * Bank कर्ज: जमिनीवर Bank कर्ज घेण्यासाठी फेरफार नोंदणी आवश्यक आहे. Online फेरफार: आता काही राज्यांमध्ये फेरफार नोंदणी Online पद्धतीने देखील करता येते. यासाठी शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर (Website) जाऊन Online अर्ज करता येतो. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती मिळू शकेल. https://bhulekh.mahabhumi.gov.in/
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

उत्पादन म्हणजे काय ?
नियुक्ति म्हणजे काय?
भाववाढ ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?
ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?