3 उत्तरे
3 answers

कंपवात या आजारावरील उपाय कोणते?

1
  हा आजार सर्दी ताप सारखा नाही. रोगीची परिस्थिती न जाऊन घेता कोणी यावर उपाय नाही सांगू शकणार. शारीरिक समस्यांची गंभीरता लक्ष्यात घ्यावी. असे प्रश्न ऑनलाईन न विचारता प्रत्येक्ष कोणी यावर इलाज करू शकते किव्हा आजार बरा करायला एखादया संस्थेची मदत मिळू शकते का हे ऑनलाईन विचारता येईल.
काही जण ऑनलाईन उपचाराच्या शोधात असतात जेव्हा की शारीरिक/मानसिक आजार यावर उपचार त्या रोग्याची आधीची स्तिथी आणि आत्ताची स्तिथी तसेच त्याला कोणत्या गोष्टीची  ऍलर्जी तर नाही ना हे पाहून त्याची जीवन शैली पाहून मगच करता येतो.
ऑनलाईन केवळ एक अंदाज बांधता येतो की आजार कोणता असू शकतो, कोणत्या डॉक्टरकडे गेल्यास यावर योग्य उपचार होऊ शकता. असे रोगी न तपासता उपचार ऑनलाईन नाही करता येत.
तरी जर कोणी रोगीची परिस्थिती न पाहता योग्य उपाय सांगू शकेल तर त्याला चमत्कार म्हणता येईल.
  कदाचित काही लोकांना हे उत्तर आवडणार नाही पण सत्य परिस्थिती हीच आहे. पैसे वाचवायच्या नादात किव्हा दुसरा जोड उपचार करावा म्हणून ऑनलाईन प्रश्न विचारतात.(डॉक्टरने औषध दिलेय तरी अजून काही घरगुती उपाय.असे जोड उपचार देखील प्रत्येकवेळी कोणताही दुष्परिणाम न होता लागू पडतील याची काही खात्री नाही)
  कृपया जीवाशी खेळू नये कोणतेही उपाय योग्य रीतीने करावे.
उत्तर लिहिले · 14/3/2018
कर्म · 28020
1
आपल्याला ' कंपवात ' या आजाराची
पुढील माहिती वरुन दिशा समजेल ..!

उत्तर लिहिले · 14/3/2018
कर्म · 6440
0
कंपवात (Parkinson's disease) हा एक असा आजार आहे, ज्यामुळे शरीराची हालचाल मंदावते आणि कंप निर्माण होतो. या आजारावर अनेक उपाय उपलब्ध आहेत, ज्यामुळे लक्षणे कमी करता येतात.
उपचार आणि उपाय:
  1. औषधोपचार:

    डॉक्टर पार्किन्सनच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे देऊ शकतात. लेव्होडोपा (Levodopa) हे सामान्यतः वापरले जाणारे औषध आहे, जे मेंदूतील डोपामाइनची पातळी वाढवते.

  2. शस्त्रक्रिया:

    डीप ब्रेन स्टिम्युलेशन (Deep Brain Stimulation - DBS) शस्त्रक्रिया काही रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते. यात मेंदूमध्ये इलेक्ट्रोड लावले जातात, ज्यामुळे हालचाल सुधारते.

  3. जीवनशैलीतील बदल:
    • व्यायाम:

      नियमित व्यायाम करणे, जसे चालणे, पोहणे किंवा योग करणे फायदेशीर आहे.

    • आहार:

      समतोल आहार घ्या आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.

    • Physiotherapy (physiotherapy):

      शारीरिक थेरपीमुळे स्नायूंची ताकद आणि लवचिकता सुधारते.

  4. घरगुती उपाय:
    • मालिश:

      शरीराला नियमित तेल मालिश केल्याने स्नायूंना आराम मिळतो.

    • गरम पाण्याचे स्नान:

      गरम पाण्याने स्नान केल्याने स्नायू शिथिल होतात आणि वेदना कमी होते.

इतर माहिती:
  • पार्किन्सन आजाराच्या उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक व्यक्तीसाठी उपचार योजना वेगळी असू शकते, त्यामुळे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी उपयोगी दुवे:
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1440

Related Questions

डांग्या खोकला कसा बरा होईल?
कोरोनावर उपचार मोफत केला जातो असे मी ऐकले आहे, अर्थात सरकारी दवाखान्यात. कृपया सविस्तर माहितीची अपेक्षा आहे?
कोरोनावर इलाज नाही, मग पेशंट बरे कसे झाले?