भूगोल खगोलशास्त्र खगोलीय पिंड

चंद्र तारा आहे की ग्रह?

3 उत्तरे
3 answers

चंद्र तारा आहे की ग्रह?

6
चंद्र हा तारा पण नाही आणि ग्रह पण नाही कारण,तारा असण्यासाठी त्याला स्वतःचा प्रकाश असावा लागतो,जो चंद्रा कडे नाही.आपल्याला चंद्र प्रकाशमान दिसतो तो सूर्याचा प्रकाश परावर्तित केलेला असतो.आणि
         राहिला प्रश्न ग्रह म्हणून पण ग्रह हे एखाद्या ताऱ्या भोवती फिरत असतात,पण चंद्र हा पृथ्वी म्हणजे एका ग्रह भोवती फिरतो म्हणून तो एक उपग्रह आहे..
उत्तर लिहिले · 3/3/2018
कर्म · 22090
6
   चंद्र हा तारा ही नाही आणि ग्रह सुद्धा नाही. चंद्र पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे.
उत्तर लिहिले · 12/7/2020
कर्म · 13290
0

चंद्र तारा नसून तो पृथ्वीचा उपग्रह आहे.

तारे: तारे हे स्वतःच्या तेजाने चमकणारे आकाशीय पिंड आहेत. त्यांच्यामध्ये अणुभट्ट्या (nuclear reactors) चालू असतात, ज्यामुळे ते प्रकाश आणि उष्णता उत्सर्जित करतात.

ग्रह: ग्रह हे तारेभोवती फिरणारे आकाशीय पिंड आहेत, ज्यांच्यामध्ये स्वतःचा प्रकाश नसतो. ते ताऱ्यांच्या प्रकाशाने प्रकाशित होतात.

चंद्र स्वतःच्या तेजाने चमकत नाही, तर तो सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो. तो पृथ्वीभोवती फिरतो, त्यामुळे चंद्र ग्रह आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

नैसर्गिक क्रिस्टल म्हणजे काय?
धूमकेतू ला इंग्रजीत काय म्हणतात?
नेपच्यून ग्रह आहे का?
प्लुटो ग्रह आहे का?
आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो ते थोडक्यात लिहा?
सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
सूर्यग्रहण व चंद्रग्रहण लागणे म्हणजे काय?