पैसा उपजीविका अर्थशास्त्र

अशिक्षित/अल्पशिक्षित व्यक्तींनी उदरनिर्वाहासाठी काय केले पाहिजे?

3 उत्तरे
3 answers

अशिक्षित/अल्पशिक्षित व्यक्तींनी उदरनिर्वाहासाठी काय केले पाहिजे?

12
शिक्षित असलेले तरुणाई देखील बेरोजगार आहेतच... अशिक्षित असो वा सुशिक्षित... आजच्या तरुणाई ने व्यवसाय करावा... व्यवसाय कोणता करावा?... हे त्या व्यक्तिवर आणि त्याच्या राहण्याच्या ठिकानावर अवलंबून असते... आपण राहतो त्या ठिकाणी, शहरात अधिक मागणी कोणत्या वस्तु साठी असते, कोणत्या वस्तु अधिक विकल्या जातात...
व्यवसाय कोणताही असो ..., हा शून्य पैशात उभा करता येत नाही... पण साठवनी, जमा केलेले , पैसे व्यवसायसाठी लावू शकता... तत्पूर्वी व्यवसाय बाबतीत सखोल अभ्यास करणे गरजेचे ठरते...
आपल्या गावातील शेती मध्ये जर आपण विकास केला तर भरपूर नफा मिळू शकतो...
जीवनात करण्यासारखे खुप काय असते...?
पण विचार करण्या आधीच नकारात्मक दृष्टीने जेव्हा पाहतो तेव्हा चांगले विचार सुद्धा दुरावतो.., सकारात्मक दृष्टी आत्मसात करा... त्याला कोणते पैसे द्यावे नाही लागत...
जर परिक्षेला बसलेला विद्यार्थी हा फक्त ५०% काढणारा असेल आणि त्याने सकारत्मकतेने विचार केला की मला १००% मिळणार... १००% मिळणार नाहित परंतु मला भेटतील असा दृढ़ विश्वास ठेवून आनंदी राहिला तर त्याला किमान ७१% मिळाले... हे सुद्धा त्यांच्यासाठी अनपेक्षित होतेच की...!
अश्या प्रकारे तुम्ही सकारात्मक रहा... कारण सकारत्मक मुळे आपल्याला चांगले करण्याची ऊर्जा मिळते...
धन्यवाद...!
उत्तर लिहिले · 1/3/2018
कर्म · 458560
12
पैसा कमवायला शिक्षण आवश्यक असते असे काही नाही. करण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. घरोघरी वर्तमानपत्र टाकू शकतो. कोणत्या दुकानात काम करू शकतो. वॉचमन म्हणून काम करू शकतो. बर्‍याच घरात वृद्ध आजारी असतात त्यांना मदतनीस म्हणून काम करू शकतो. चहाचा गाडा घालू शकतो. इडली वडा वगैरे करून विकू शकतो. अशी खूप कामे आहेत. कोणतेही काम कमी दर्जाचे आहे असे नाही. आपला चरितार्थ झाला म्हणजे काम झाले.
उत्तर लिहिले · 1/3/2018
कर्म · 7355
0

अशिक्षित किंवा अल्पशिक्षित व्यक्तींसाठी उदरनिर्वाहाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

शारीरिक श्रम आणि मॅन्युअल कामे:

  • बांधकाम मजूर
  • शेती आणि फळबाग कामे
  • सफाई कामगार
  • घरेलू कामगार (घरकाम, वाहन चालक)
  • हमाल

छोटे व्यवसाय:

  • भाजीपाला आणि फळ विक्रेता
  • चहाची टपरी किंवा खाद्यपदार्थांचे स्टॉल
  • किराणा दुकान
  • कपडे किंवा खेळणी विक्री
  • गाडी दुरुस्ती किंवा सायकल दुरुस्तीचे दुकान

हस्तकला आणि कौशल्ये:

  • विणकाम आणि शिवणकाम
  • लाकडी वस्तू बनवणे
  • मातीची भांडी बनवणे
  • अगरबत्ती किंवा मेणबत्ती बनवणे
  • घर सजावटीच्या वस्तू बनवणे

सेवा क्षेत्र:

  • सुरक्षा रक्षक
  • वेटर
  • हेल्पर
  • डिलिव्हरी बॉय

इतर पर्याय:

  • पशुपालन आणि कुक्कुटपालन
  • मत्स्यपालन
  • ड्रायव्हिंग

याव्यतिरिक्त, अनेक सरकारी आणि गैर-सरकारी संस्था कौशल्य विकास कार्यक्रम (Skill Development Programs) चालवतात, ज्यात प्रशिक्षण घेऊन तुम्ही चांगली नोकरी मिळवू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

उदाहरणार्थ:

  • प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY)
  • महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS)
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1440

Related Questions

प्रदेशानुसार व गरजेप्रमाणे उपजीविकेच्या साधनांमध्ये फरक पडतो असे तुम्हाला वाटते का?
पुण्यात मेसचा रेट काय आहे?
लॉजिंग आणि बोर्डिंग मध्ये काय फरक आहे?
मासेमारी चे उत्तर?