बातम्या घोटाळा अर्थशास्त्र

नीरव मोदी बद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

नीरव मोदी बद्दल माहिती मिळेल का?

4
नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. 

47 वर्षीय  नीरवचे वडील देखील हिरेव्यापारीच होते.  नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला.  नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.

उत्तर लिहिले · 25/2/2018
कर्म · 210095
0
नीरव मोदी बद्दल माहिती

नीरव मोदी एक भारतीय हिरे व्यापारी आहे जो पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) सुमारे १४,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सहभागामुळे प्रसिद्ध आहे.

लवकरचे जीवन आणि शिक्षण: नीरव मोदी यांचा जन्म गुजरातमध्ये झाला. त्यांनी अमेरिकेमध्ये शिक्षण घेतले.

करिअर: १९९९ मध्ये त्यांनी फायरस्टोन डायमंड्समध्ये काम सुरु केले. २०१० मध्ये, नीरव मोदीने स्वतःचा हिऱ्यांचा व्यवसाय 'नीरव मोदी' या नावाने सुरू केला. त्यांचे बुटीक भारत आणि परदेशात अनेक ठिकाणी आहेत.

घोटाळा: २०१८ मध्ये, नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांनी पंजाब नॅशनल बँकेतून बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) वापरून हजारो कोटी रुपये काढले.

सध्याची स्थिती: नीरव मोदीला यूकेमध्ये अटक करण्यात आली आहे आणि तो भारताला प्रत्यार्पणाच्या विरोधात लढत आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

दसादशे पाच टक्के दराने 16000 रुपयांचे मुद्दलाचे दोन वर्ष आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
दसादशे पाच टक्के दराने १६०० रुपये मुद्दलाचे दोन वर्षे आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
चक्रवाढ व्याजाचे सूत्र काय आहे?
महेशच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे, तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के आहे?
माझी पत्नी १३००० रुपये कमावते आणि माझा खर्च मी स्वतः कमावतो. मला कोणतेही व्यसन नाही. ५ लोकांचे कुटुंब आहे, त्यामुळे शिल्लक काहीच रहात नाही. मी आजारी आहे, पण माझा खर्च मी स्वतः कमावतो. पत्नी घरखर्च चालवते.
१९७० साली ४०० रुपये कर्ज घेतले, तर ते आज २०२५ मध्ये किती होईल?
मी खूप कर्ज काढले आहे का?