Topic icon

घोटाळा

0

महेश मोतेवार प्रकरण हे एक गुंतागुंतीचे प्रकरण आहे, ज्यामुळे ते घडले त्यावेळेस ते खूप चर्चेत आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश मोतेवार हे एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यात सामील होते. त्यांच्यावर अनेक कंपन्यांकडून पैसे घेऊन ते परत न देण्याचा आरोप आहे. ह्या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आणि त्यामुळे खळबळ उडाली.

या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी, सरकारने एक विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे, जे या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करून अधिकृत बातम्या वाचू शकता:

उत्तर लिहिले · 8/3/2025
कर्म · 980
1
घाबरण्यासारखे काही नाही, तुम्ही शॉपिंग केली नसेल आणि तुम्हाला मेसेज आला असेल, तर ज्यांनी कोणी शॉपिंग केली असेल त्यांनी तुमचा नंबर दिला असेल किंवा बिलिंग वाल्याने चुकून तुमचा नंबर टाकला असेल.
उत्तर लिहिले · 31/1/2020
कर्म · 9405
0
एअरक्राफ्ट डेटा एंट्रीच्या कामात फ्रॉड (Fraud) होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:
  • नोकरीची जाहिरात: जाहिरात देणारी कंपनी खरी आहे का, हे तपासा.
  • भरण्याची फी: जर कंपनी डेटा एंट्रीसाठी पैसे भरण्यास सांगत असेल, तर ती फ्रॉड असण्याची शक्यता आहे.
  • ॲग्रीमेंट (Agreement): कामाच्या करारावर सही करण्यापूर्वी नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.
  • प्रशिक्षण: व्यवस्थित प्रशिक्षण दिले जात आहे का आणि त्यांच्या प्रशिक्षणाची पद्धत काय आहे, हे तपासा.
  • संपर्क: कंपनीचा पत्ता आणि संपर्क क्रमांक तपासा.
फ्रॉड टाळण्यासाठी, व्यवस्थित संशोधन करणे आणि जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980
2
जर तुमचे मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल, तर तुमच्या खात्यातून झालेल्या कपातीचा त्यावर एक एस एम एस येतो. त्यावर जर ते ट्रांझेक्शन तुम्ही केलेले नसेल, तर खाली एक हेल्पलाईन नंबर दिलेला असतो. त्यावर तुम्ही कॉल करा.
जसे,
Acct XX805 debited with INR 500.00 on 10-May-19.Info: NFS*MPZ01978*.Avbl Bal:INR 12,485.88.Call 18002662 for dispute or SMS BLOCK 805 to 9215676766
जर तुम्हाला वरील प्रमाणे मेसेज प्राप्त झाला, तर तो एस एम एस जतन करून ठेवा व याबद्दलची माहिती तुमच्या बँकेला द्या. यासाठी तुम्ही वरीलप्रमाणे कॉल अथवा एस एम एस करू शकता.
उत्तर लिहिले · 11/5/2019
कर्म · 569225
0

मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकत नाही की मिंटप्रो (Mintpro) कंपनी फ्रॉड आहे की नाही. मी तुम्हाला याबद्दल काही माहिती देऊ शकेन, जी तुम्हाला तुमचा निर्णय घेण्यासाठी मदत करेल:

  • मिंटप्रो काय करते: मिंटप्रो ही एक ऑनलाइन ब्रोकरेज कंपनी आहे जी शेअर्स, कमोडिटीज आणि इतर वित्तीय उत्पादने खरेदी-विक्री करण्याची सुविधा देते.
  • गुंतवणूकदारांच्या तक्रारी: काही गुंतवणूकदारांनी मिंटप्रोच्या विरोधात फसवणूक, पैसे काढण्यात समस्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
  • नियामक प्राधिकरणांची भूमिका: भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) आणि इतर नियामक संस्थांनी मिंटप्रोच्या कामकाजावर लक्ष ठेवले आहे आणि काही अनियमितता आढळल्यास कारवाई देखील केली आहे.
  • कंपनीची बाजू: मिंटप्रोने नेहमीच आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे आणि ते कायद्याचे पालन करत असल्याचे म्हटले आहे.

माझा सल्ला:

  • मिंटप्रोमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, कंपनीबद्दल संपूर्ण माहिती मिळवा.
  • SEBI आणि इतर नियामक संस्थांच्या वेबसाइट्सवर कंपनीबद्दल काही तक्रारी आहेत का ते तपासा.
  • गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.
  • तुम्ही कोणत्याही फसवणुकीला बळी पडल्यास, त्वरित पोलिसात आणि SEBI कडे तक्रार करा.

Disclaimer: कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या स्तरावर संपूर्ण संशोधन करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980
4
नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. 

47 वर्षीय  नीरवचे वडील देखील हिरेव्यापारीच होते.  नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला.  नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.

उत्तर लिहिले · 25/2/2018
कर्म · 210095
4

लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवणारा चारा घोटाळा नेमका काय आहे आणि तो नेमका कोणी उघडकीस आणला आहे ? याची माहिती जगाला होणे गरजेचे आहे कारण आरोपी समजतात पण आरोपींना उघडकीस आणणारे तपास अधिकारी कोण याचाच कोणाला पत्ता लागत नाही. हे सगळे प्रकरण सीबीआयचे तपासाधिकारी राकेश अस्थाना यांनी उघडकीस आणले आहे. अस्थाना हे पोलीस आयुक्त या पदावर काम करीत होते. ते १९८४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. १९९४ साली ते बिहारात (आता झारखंडात) असलेल्या धनबाद येथे बदलून गेले. तेव्हा त्यांच्यावर या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे देण्यात आली. या प्रकरणात १९९६ साली आरोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि २००२ पर्यंत अस्थाना या प्रकरणाशी संबंधित होते. त्यांच्या सहकार्‍यांनी फारच चिकाटीने काम केले म्हणून आज एवढे लोक दानाला गेले आहेत. या प्रकरणात अनेक धेंडे गुंतलेली असल्याने या लोकांवर सतत दबाव येत गेला पण त्यांनी कसल्याही दबावाला जुमानायचे नाही असे ठरवले म्हणून या शिक्षा होत आहेत. अस्थाना यांनी लालूंना १९९७ साली आणि नंतर एकदा अटक केली. त्यांच्यासारख्या बड्या नेत्याला अटक करू नये यासाठी त्यांना काही धमक्यांचे फोन आले पण यातल्या कोणाच्याही फोनला त्यांनी दाद दिली नाही म्हणून आज हा दिवस दिसत आहे.

सरकारी अधिकार्‍यांनी आपले कर्तव्य नीट पार पाडले आणि त्यांनी कसल्याही आमिषाला विशेषत: पुढार्‍यांकडून दाखवण्यात येणार्‍या आमिषाला बळी पडायचे नाही असे ठरवले तर देशात भ्रष्टाचार कमी होईल असे आपल्याला या उदाहरहणावरून वाटते असे अस्थाना म्हणाले. या प्रकरणातल्या अधिकार्‍यांनी आपले कर्तव्य नीट बजाचले असते तर हा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालाच नसता असाही विश्‍वास अस्थाना यांनी व्यक्त केला. त्यांनी हे प्रकरण थोडक्यात नेमके काय आहे हे सांगितले. यात काही बड्या सरकारी अधिकार्‍यांनी पुढार्‍यांच्या मूक संमतीने सरकारी तिजोरीतले करोडो रुपये ओरबाडून घेतले आहेत. या प्रकरणात बिहारच्या पशु संवर्धन खात्याला काही पुरवठा करणार्‍या कंपन्यांपासून सुरूवात होते. या लोकांनी जनावरांना लागणारे खाद्य, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी लागणारी उपकरणे पुरवण्याची कंत्राटे घेतली होती. निविदा सूचनेत दाखवलेला माला पुरवलाच जात नसे. तो ठरावापेक्षा कमी प्रमाणात पुरवला जात असे पण सरकारी कर्मचारी तो माल मिळाला आहे असे प्रमाणपत्र देत असत.

शंभर रुपयांचा माल पुरवण्याचे कंत्राट असे पण प्रत्यक्षात तीस किंवा चाळीस रुपयांचाच माल पुरवला जात असे आणि अधिकारी १०० रुपयांचा माल मिळाला असल्याचे लिहून देत असत.६० ते ७० रुपयांचा मालाचे पैसे सगळे मिळून वाटून घेत असत. काही वेळा तर काही वस्तू पुरवायच्या असत. प्रत्यक्षात तो पुरवला जात नसतानाही पुरवला असे लिहून दिले जात असे. माल न देताच तो केवळ कागदोपत्री मिळाला असे दाखवले जात असे. त्यासाठी आवश्यक असे अनुदान मंजूर केले जात असे. ते मंजूर करणारांनाही आपण करतो आहोत ते खोटे आहे हे कळत असे पण ते मंजुुरी देत असत कारण त्यांच्यावर नेत्यांचा तसा दबाव येत असे. अशी खोटी मंजुरी दिलेली बिले चाइबासा आणि धनबाद या जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयातून उचलली जात असत. असे कोट्यवधी रुपयांचे अनुदान उचलले गेले. ही जनतेच्या पैशाची सरळ सरळ लूट होती. ही रक्कम ९५० कोटी रुपये एवढी होती. या प्रकरणात अनुदान उचलताना चेकवरच्या रकमा वाढवण्यात आल्या असल्याचेही लक्षात आले आहेे. १००, ००० (म्हणजे एक लाख) रुपयाचे बिल असेल तर त्यावर दोन शून्ये वाढवून त्याला एक कोटी रुपये केले जात असे आणि अशी बिले उचलली गेली आहेत. अनुदान लाखाचे आणि प्रत्यक्षात उचल मात्र कोटीची केलेली हा प्रकार मग उघड व्हायला लागला.

या प्रकरणात ५०० लोक गुंतलेले होते. पण त्यातले १५ ते २० लोकच मूळ स्थानी सार्‍या भ्रष्टाचाराचे नियंत्रण करीत होते. त्यात लालूप्रसा यादव होते. ते याच काळात मुख्यमंत्री होते. त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून अनेकांना अटक होण्यापासून वाचवले आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून काही रकमा घेतल्या. या काळात झालेल्या उलाढाली आणि लालू प्रसाद यांच्या खर्चात याच काळात झालेली वाढ यांची संगती लागली आहे. त्यांच्या राहणीमानात वाढ झाली आणि तिनेच त्यांना अडचणीत आणले. पोलीस अधिकार्‍यांनी या प्रकरणातल्या आरोपींच्या खात्यातून काढल्या गेलेल्या रकमांच्या तारखा आणि लालूप्रसाद यादव यांच्या खात्यात त्याच दिवसांत झालेली स्पष्ट न करता झालेली वाढ यांचा संबंध जोडून पाहण्यात आला आहे. या काळात लालूच्या मुलांनी अचानकपणे विमान प्रवास सुरू केला. त्यांची तिकिंटे याच आरोपींनी काढलेली असत. पशुपालन विभागाच्या रांची विभागाचा विभागीय अधिकार शाम बिहारी हा या रॅकेटचा प्रमुख होता. तो सर्वांना पैसे पुरवत असे. त्याला नोकरी संपताच राजकारणात शिरायचे होते. या प्रकरणात नितीशकुमार यांचा मात्र काहीही वाटा दिसून आला नाही.

उत्तर लिहिले · 5/1/2018
कर्म · 22090