पैसा प्रवास आंतरराष्ट्रीय संबंध आंतरराष्ट्रीय व्यवहार अर्थशास्त्र

कोणत्या देशात भारतीयांना व्हिसा लागत नाही आणि भारतीय रुपयाचे मूल्य कोणत्या अन्य देशातील चलनापेक्षा जास्त आहे?

2 उत्तरे
2 answers

कोणत्या देशात भारतीयांना व्हिसा लागत नाही आणि भारतीय रुपयाचे मूल्य कोणत्या अन्य देशातील चलनापेक्षा जास्त आहे?

2
परदेशप्रवास म्हटलं की सगळ्यांत आवश्यक गोष्ट म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसा. व्हिसाचा विचार करता देशांची विभागणी तीन गटांमध्ये करता येते. एक म्हणजे असे देश जिथे प्रवासाला जाण्यापूर्वी तुमच्याकडे व्हिसा असणं गरजेचं आहे. दुसरा गट अशा देशांचा करता येतो जिथे गेल्यानंतर तुम्हाला व्हिसा मिळतो. तिसरा गट व्हिसा-मुक्त देशांचा. म्हणजे या तिसऱ्या प्रकारच्या देशांमध्ये प्रवासाला जाताना व्हिसाची गरज नाही.

व्हिसा फ्री देश

1. इंडोनेशिया- इंडोनेशियामध्ये ज्या 169 देशांचे प्रवासी व्हिसाशिवाय प्रवेश करु शकतात त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. अर्थात या व्हिसा फ्री प्रवासासाठीही अर्थातच काही नियमही आहेत. पर्यटकांसाठी असलेली ही व्हिसा-फ्री सुविधा 30 दिवसांसाठीच आहे. आणि त्याला कोणतीही मुदतवाढ मिळत नाही. तुम्ही पर्यटन, कौटुंबिक भेटी, काही सोशल गॅदरिंग, कला आणि सांस्कृतिक अभ्यासाठी, एखाद्या सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच सरकारी कामासाठी आला असाल, तर तुम्हाला या टूरिस्ट व्हिसा फ्री फॅसिलिटीचा लाभ घेता येऊ शकतो.

2. मालदीव- सुंदर समुद्रकिनारे आणि आलिशान हॉटेल्ससाठी प्रसिद्ध असलेलं मालदीव हे अनेक भारतीयांसाठी फेव्हरेट हनीमून डेस्टिनेशन ठरत आहे. मालदीवच्या इमिग्रेशन नियमांच्या चौकटीत राहून तुम्ही इथे व्हिसा-फ्री जाण्याचा आनंद घेऊ शकता.

3. मकाऊ- कॅसिनो आणि शॉपिंग मॉल्सची रेलचेल असलेले मकाऊ हे पूर्वेचं लास वेगास म्हणून ओळखलं जातं. भारत मकाऊसाठी व्हिसा आणि एन्ट्री परमिट फ्री यादीमध्ये येतो. व्हिसा नसला तरी जाताना जवळ कोणती कागदपत्रं बाळगायची हे तुम्हाला मकाऊ सरकारच्या मकाऊ इमिग्रेशन सव्हिसेस आॅफ पब्लिक सिक्युरिटी पोलिस फोर्सच्या वेबसाइटला भेट दिल्यानंतर लक्षात येईल. पर्यटकांसाठी आकर्षण असणारे हे देश उदाहरण म्हणून दिले आहेत.

शिवाय 28 देश भारतीयांना प्रवेशानंतर व्हिसा देतात. (व्हिसा आॅन अरायव्हल). त्यांपैकी काही फिरायला जाण्याच्या दृष्टीनं सुंदर असे देश म्हणजे थायलंड, सेशेल्स, जॉर्डन. परदेशी फिरायला जाताना व्हिसासंबंधीच्या अजूनही काही बारीक-सारीक गोष्टी माहित करु न घ्या. म्हणजे तुम्हाला कागदपत्रांच्या माहितीसाठी दुसऱ्यावर विसंबून रहावं लागणार नाही.

भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरात मोजल्यास जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.. भारतीय रुपया हा नेपाळ  आणि भूतान ह्या शेजारील देशांमध्ये कायदेशीर चलन म्हणून स्वीकारला जातो. नेपाळ आणि भूतान या देशांनी त्यांचे चलन भारतीय रुपयाला जोडले आहे. विविध देशातील भारतीय रुपयाचे मूल्य पहायचे असल्यास खलील लिंकवर जा
https://hi.coinmill.com/EUR_INR.html
उत्तर लिहिले · 23/2/2018
कर्म · 210095
0

भारतीयांना व्हिसा न लागणारे देश:

  • नेपाळ
  • भूतान
  • मालदीव
  • मॉरिशस
  • सर्बिया
  • इंडोनेशिया
  • फिजी
  • बार्बाडोस
  • एल साल्वाडोर
  • गॅम्बिया
  • हैती
  • जमैका
  • सेनेगल

भारतीय रुपयाचे मूल्य जास्त असलेले देश:

  • व्हिएतनाम (डोंग)
  • इंडोनेशिया (रुपिया)
  • कंबोडिया (रियल)
  • लाओस (किप)
  • पराग्वे (गुआरानी)
  • सिएरा लिओन (लियोन)
  • उझबेकिस्तान (सोम)
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

पेपल वरून बँक मध्ये पैसे टाकायचे आहे, माहिती द्या?
अनलिमिट पैसे पाठवण्यासाठी कोणते ॲप आहे का?
परदेशात नोकरी करत असतानाचा पगार किंवा काही रक्कम घरातील कोणत्याही सदस्याच्या बँक खात्यावर परदेशातूनच ट्रान्सफर करता येते का? व त्यासाठी टॅक्स किती भरावा लागतो?