औषधे आणि आरोग्य
रक्त गट
जीवशास्त्र
मानवी आरोग्य
माणसाला डास चावणे हे त्याच्या रक्तगटावर अवलंबून असते का, म्हणजे अमुक एका रक्तगटाच्या माणसाला कमी डास चावतात तर अमुक रक्तगटाच्या माणसाला जास्त प्रमाणात डास चावतात असं काही असतं का?
3 उत्तरे
3
answers
माणसाला डास चावणे हे त्याच्या रक्तगटावर अवलंबून असते का, म्हणजे अमुक एका रक्तगटाच्या माणसाला कमी डास चावतात तर अमुक रक्तगटाच्या माणसाला जास्त प्रमाणात डास चावतात असं काही असतं का?
4
Answer link
*सध्याचा कडक उन्हाळा लोक दिवसभर कसेबसे सहन करतात. सायंकाळ होताच थंड वार्याची झुळूक मनाला थंडावा देऊन जाते. मात्र, डासांमुळे खुल्या जागेत, मोकळ्या वातावरणात आपण जास्त वेळ बसू शकत नाही. तसेच जोपर्यंत पंख्याची घरघर सुरू आहे तोपर्यंत आपण घरात बसू शकतो. मात्र, वीजप्रवाह खंडित होताच पुन्हा आपण घामोघाम होतो. वीज गेल्यानंतरच खरेतर डासांना रक्त प्राशन करण्याची संधी मिळते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? हे डास लोकांना कमी-अधिक प्रमाणात चावतात.*
काही लोकांना डास मोठ्या, तर काहींना कमी प्रमाणात चावतात. डास असे का करतात? यासंदर्भात संशोधकांनी नुकतेच एक संशोधन केले. या संशोधनातील निष्कर्ष सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे ठरले.
संशोधकांनी वेगवेगळ्या रक्तगटाच्या लोकांचे गट तयार केले. यामध्ये असे सिद्ध झाले की, ज्या लोकांचा रक्तगट ‘ओ’ होता, त्यांचा डासांनी अनेकवेळा चावा घेऊन त्यांचे रक्त प्राशन केले होते. मात्र, ज्यांचा रक्तगट ‘ए’ आणि ‘बी’ होता त्यांचा या डासांनी एकदाच चावा घेतला होता. विशेष म्हणजे, हे संशोधन अनेकवेळा करण्यात आले. मात्र, प्रत्येकवेळी त्याचा निष्कर्ष एकच राहिला. म्हणजेच या संशोधनातील ठोस निष्कर्ष म्हणजे ज्या लोकांचा रक्तगट ‘ओ’ आहे त्यांचे रक्त डासांना फार आवडते, म्हणूनच ते या लोकांचा चावा घेऊन रक्त प्राशन करतात. तर ए आणि बी गटाचे रक्त या डासांना तितकेसे आवडत नाही. यामुळे या रक्तगटांच्या लोकांना डास जास्त प्रमाणात चावत नाहीत.
0
Answer link
माझ्या मते तसे काही नाही. डासांना कर्तव्य रक्ताशी असते, रक्तगटाशी त्यांना काही घेणेदेणे नसते. नवजात बालकापासून ते जख्खड म्हाताऱ्यापर्यंत डास कोणाचेही रक्त पितो व रक्त पिताना तो रक्तगटाची चव बघत बसत नाही. काटकुळ्या माणसापासून ते लठ्ठ माणसांपर्यंत सर्वांचे रक्त पितो.
0
Answer link
होय, माणसाला डास चावणे हे रक्तगटावर अवलंबून असू शकते. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की 'ओ' रक्तगट असलेल्या व्यक्तींना डास जास्त प्रमाणात चावतात, तर 'ए' रक्तगट असलेल्या व्यक्तींना तुलनेने कमी डास चावतात.
संशोधन काय सांगते:
- एका अभ्यासानुसार, 'ओ' रक्तगट असलेल्या लोकांना 'ए' रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा 83% जास्त डास आकर्षित होतात.
- 'बी' रक्तगट असलेल्या लोकांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु काही अभ्यासांनुसार त्यांना 'ए' रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा जास्त डास चावतात.
यामागील कारण:
- त्वचेवरील रसायनं: डास काही विशिष्ट रसायनांना आकर्षित होतात, जी त्वचा स्त्रावित करते. 'ओ' रक्तगट असलेल्या लोकांच्या त्वचेवर अशी रसायने जास्त प्रमाणात आढळतात, ज्यामुळे डास त्यांना अधिक प्रमाणात चावतात.
- कार्बन डायऑक्साइड: डास कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनाने आकर्षित होतात. त्यामुळे, जास्त श्वासोच्छ्वास घेणाऱ्या लोकांना डास जास्त चावतात.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की रक्तगट हा एकमेव घटक नाही जो डास चावण्यावर परिणाम करतो. इतर घटक, जसे की घाम, शरीराचे तापमान आणि त्वचेवरील जीवाणू देखील डासांना आकर्षित करू शकतात.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:
- WebMD - Are You a Mosquito Magnet?
- National Center for Biotechnology Information (NCBI) - Factors affecting mosquito attraction to human hosts
Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि ती वैद्यकीय सल्ला नाही.