राजकारण भाषण राष्ट्रीय दिवस लिखाण

प्रजासत्ताक दिनासाठी भाषण मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

प्रजासत्ताक दिनासाठी भाषण मिळेल का?

19
■प्रजासत्ताक दिवस :●
हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.

 

हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधान्नांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो.या कार्यक्रमात भारताती सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.ठिकठीकाणी प्रभातफेर्या भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा,आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविनार्यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ हि वाटला जातो. मुले हि आनंदित होतात.

 



शाळांना तोरणे-पताका आपले तिरंगी ध्वज लावली जातात. लहान मोठी मुले तीरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात  घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात.सर्व विध्यार्थी अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण  केले जाते. शाळेतील, एन. सी. सी. व स्काउट चे विध्यार्थी सुंदर संचलन करतात. शाळेतील वाद्य -वृंदा वरही राष्ट्रीय गाणी वाजविली जातात. तसेच मुले मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीते गातात. भाषणे करतात, नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. मुख्याध्यापका कडून गुणी विध्यार्थ्यांचे कौतुक होते व त्यांना सम्मान पत्रे दिली जातात.

 

या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस ! लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस ! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञां केलीच पाहिजे, आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्या मुळे  प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र प्रेम अधिक उसळून, उजळून निघते.

उत्तर लिहिले · 15/1/2018
कर्म · 123540
0
Google kara. Tithe easily midel
Marathi bhashet suddha
उत्तर लिहिले · 15/1/2018
कर्म · 20
0
प्रजासत्ताक दिनासाठी भाषण

प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण

आदरणीय व्यासपीठ,尊敬的各位老师,亲爱的同学们,

आज आपण इथे भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. या दिनी, ज्या थोर पुरुषांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले, त्या सर्वांना मी आदराने स्मरण करतो.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला, परंतु देशाला स्वतःची राज्यघटना नव्हती. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना लागू झाली आणि आपला देश खऱ्या अर्थाने सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य बनला.

राज्यघटनेने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला समानतेने जगण्याचा हक्क आहे. राज्यघटनेमुळे देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व केवळ ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नाही, तर ते आपल्याValues आणि आदर्शांचे स्मरण करणे आहे. आपण आपल्या देशासाठी एकनिष्ठ राहण्याची आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची शपथ घेतली पाहिजे.

आज, आपला देश अनेक क्षेत्रात प्रगती करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आणि अर्थव्यवस्था यांसारख्या क्षेत्रात भारताने मोठी उंची गाठली आहे. पण अजूनही आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत. गरिबी, बेरोजगारी, आणि सामाजिक असमानता यांसारख्या समस्यांवर आपल्याला तोडगा काढायचा आहे.

आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन काम केले, तर आपण निश्चितच एक मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण करू शकतो. जय हिंद!

धन्यवाद!

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

राष्ट्रीय स्फोटक दिवस कधी साजरा केला जातो?
15 ऑगस्टला कोणता दिवस साजरा केला जातो?
26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो?