2 उत्तरे
2
answers
पेशवाईची सुरुवात कशी झाली?
5
Answer link
पेशवे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचे पद - ‘पेशवे’ पेशवे म्हणजे पंतप्रधान. शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकावेळी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान होते. बाळाजी पेशव्यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या दरबारात पेशवे पदावरून वाद वाढू लागले. दरबारातील श्रीपतराव व अष्टप्रधानांनी हे पद (पेशवे) कोकणस्थांमध्ये न देण्याचा आग्रह धरला. पण शाहूमहाराजांनी स्वराज्याचा पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यास पेशवे पद देण्याचे नक्की केले. बाजीरावांना पेशवे पद हे वंश परंपरेतून मिळाले नव्हते तर बाजीराव हा तरुण, युद्धनिपुण होता. तसेच बाळाजी विश्वनाथांबरोबर सतत राहिल्याने बाजीरावांना युद्धाचा तसेच राजकाराणाचा अनुभव प्राप्त झाला होता. म्हणून शाहू महाराजांना तोच पेशवे पदासाठी योग्य वाटला. १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बाजीरांवाना बहाल केली.
0
Answer link
पेशवाईची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाली. त्यांनी इ.स. १६७४ मध्ये अष्टप्रधान मंडळ स्थापन केले, ज्यात 'पेशवा' हे पद होते. पेशवा म्हणजे राजाचा प्रमुख सल्लागार आणि प्रशासकीय अधिकारी.
पेशवाईची उत्क्रांती:
- शिवाजी महाराज: त्यांनी पेशवा पद निर्माण केले, पण ते वंशपरंपरागत नव्हते.
- छत्रपती शाहू महाराज: यांच्या काळात बाळाजी विश्वनाथ भट हे पेशवा झाले (इ.स. १७१३). त्यांनी हे पद वंशपरंपरागत बनवले आणि पेशवाईला एक नवीन राजकीय महत्त्व प्राप्त झाले.
- बाळाजी विश्वनाथ भट: यांनी मराठा साम्राज्याला स्थिरत्व आणि राजकीय धोरण दिले.
पेशवाईचा अर्थ: पेशवा म्हणजे 'प्रमुख' किंवा 'नेता'. ते राजाच्या नंतर सर्वात महत्वाचे व्यक्ती असत आणि राज्याच्या प्रशासकीय, आर्थिक आणि लष्करी कारभारात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.