2 उत्तरे
2
answers
कौषटि म्हणजे काय?
7
Answer link
तुम्हाला कौष्टि म्हणायचे आहे का?... कोष्टी समाजाची एक जात आहे...
कोष्टी:- या जातीची मोठी वस्ती वर्हाड- मध्य प्रांतांत आहे. तेथील मराठी व तेलगू कोष्टी नागपूर व छत्तीसगडांत रहातात. यांची संख्या (१९११) १,५४,५९९ आहे. तेलगू कोष्टय़ांस सालेवार म्हणतात. हे मार्कंडेय ऋषीस आपल्या धंद्याचे ऋषि समजतात. कारण या ऋषीनें कमलतंतूपासून कपडे तयार करून देवांस दिले. यास सूर्याची मुलगी दिली होती. तिजबरोबर भवानी नावाचा राक्षस व एक वाघ आंदण दिला होता. राक्षस फार उन्मत्त झाल्यामुळें ऋषीनें त्यास मारलें. पण वाघ अगदी आज्ञाधारक होता. राक्षसाच्या हाडांपासून ऋषीनें कपडे विणण्याचें सामान तयार केलें अशी आख्यायिका हे लोक आपल्या प्राचीनत्वाबद्दल सांगतात. कोष्टी लोकांची वाघावर फार भक्ती आहे. आजपर्यंत वाघानें एकदेखील कोष्टी मारला नाहीं. वाघ यांस भेटला तर ते मार्कंडेयांच्या स्मरणानें त्याचा शक्तिपात करतात. तेव्हां तो निमूटपणे आपल्या वाटेनें जातो अशी यांची समजूत आहे. लग्नप्रसंगी हे वाघाची मूर्ती संन्निध ठेवतात.
यांच्यातील उपजातींचे निरनिराळे प्रकार आहेत. ते हळबी, लाड, कोष्टी, गधेवाल, देशकर, देवंग, पटवी इत्यादी होत. ओंकुले हे गोलक संततीचे आहे. पूर्वीचे जैन कोष्टी हे आता हिंदू झाले आहेत. साळेवारांत सूतसाळे व पद्मसाळे असे दोन वर्ग आहेत. सगूणसाळे वर्ग हा गोलक आहे.
नागपुराकडे लग्नांत वधूवरांभोवती सणाचा दोरा सातदां गुंडाळतात. वधूची आई वरास ओंवाळते व वराची आई जमिनीवर पाणी टाकते. साळेवारांत लग्न वराच्या घरीं होतें. वधूस मध्यरात्री आणतात. विणकामांतील एका लाकडावर वराचा उजवा व वधूचा डावा पाय ठेवतात व त्याच्यावर कांबळे गुंडाळतात. मध्यें अंतर्पाट धरतात. वधूवर एकमेकांवर पांचदा अक्षता टाकतात व मग दोघे त्या लांकडावर बसतात, म्हणजे लग्नविधी आटपला. विधवांना लग्न करण्यास परवानगी आहे. चांद्यांत विधवा बापाकडे रहात असली तर त्यास ४० रुपये हुंडा द्यावा लागतो. तिच्या पुनर्विवाहाच्या दिवशी तिची ओटी नवरा नारळानें भरतो व तिला कुंकू लावतो. रात्रीं ती नवर्याकडे जाते त्याला ती ओटी देते व त्याच्या पाया पडते. हे लोक होताहोईतोपर्यंत घटस्फोट करीत नाहींत. जितक्या बायका त्यांस मिळतील तितक्या त्यांस हव्याच असतात. हे कधी कधी बायका चोरतात, विकतात व गहाणसुद्धा टाकतात. लिंगायत व कबीरपंथीं लोक प्रेतें पुरतात; इतर दहन करतात. ५ व्या दिवशी विधवेच्या बांगडय़ा फोडून कुंकू पुसतात. मयताच्या मुख्य वारसाच्या डोक्यास ५ व्या दिवशीं जातीचे पंच पागोटें घालतात. हे लोक श्राद्धे करीत नाहीत. अक्षयतृतीयेला मित्रास बोलावतात व त्यास विचारतात की तुम्ही माझे कोण आहात? तो सांगतो की मी तुझा आजा किंवा पणजा आहे. अशा रीतीने मित्रास बोलावून जेवण घालतात. गणपती हा यांचामुख्य देव आहे. कबीरपंथी कोष्टय़ांचा स्वतंत्र पुरोहित असतो. गुरुमुखी म्हणून नागपूरच्या कोष्टय़ांत एक पंथ आहे तें धापेवाडय़ाचे कोळीबाबाचे शिष्य आहेत. ते आपल्या गुरुच्या नावानें घरीएक नारळ देऊन त्याची पूजा करतात. हे आपल्या विणण्याच्या यंत्रास पवित्र समजतात. विटाळशा बायका त्यास शिवत नाहीत. यांपैकी काही लोक मद्यमांस खातात व कांही खात नाहींत. हे लोक ब्राह्मणांस पौरोहित्य देतात. डाक्याची मलमल विणणारे कोष्टी लोक अपवित्र समजले जात नाहींत. ब्राह्मण त्यांच्या हातचें पाणी पितात. नागपूरच्या भागांत हे फार चांगले कपडे विणतात. धोतरें व लुगडीं यांची नागपुरास प्रसिद्धी आहे. गिरण्यांमुळे यांची स्थिती फार खालावली आहे. महाराष्ट्रीय व कर्नाटकी कोष्टय़ांची माहिती ‘देवांग’ या लेखांत सांपडेल. (रसेल व हिरालाल. एन्थोवेन).