2 उत्तरे
2
answers
आळूची शेती कशी करावी?
0
Answer link
बटाटा लागवडी संदर्भातील काही महत्वाच्या पैलूंवर प्रकाशझोत टाकूया.
★जमीन
बटाट्याचे पीक घेण्यासाठी मध्यम प्रतीची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन अधिक चांगली असते.
बटाट्यासाठी चिकण वा पाणथळ जमिनीची निवड करू नये. कारण या जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असते.
जर बटाटा लागवड केलेली जमीन पाणथळ असेल तर लागवड केलेला बटाटा किंवा बटाट्याचे बियाणे लागवडीनंतर ताबडतोब कुजणे किंवा सडण्याची शक्यता असते.
याचा परिणाम उत्पादनावर होतो बटाट्याची उगवण अतिशय कमी होऊन, झाडांची हेक्टरी संख्या कमी मिळते, पर्यायाने उत्पादन घटते.
★पूर्वमशागत
खरिप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर जमिनीची उभी-आडवी नांगरणी करावी.
यानंतर, काही दिवस जमीन उन्हात तापल्यानंतर कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन, ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.
शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी २५ ते ३० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे किंवा खरिपातील हिरवळीचे खत म्हणून ताग किंवा धैंचा जमिनीत गाडणे, रब्बी बटाट्याचे अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने फारच फायद्याचे आढळले आले.
सोयाबीन, मूग, उडीद किंवा बाजरी या पिकानंतर बटाट्याचे पीक घेतल्यास उत्पादन चांगले मिळून जमिनीचा पोत कायम टिकून राहतो.
★बटाटा बेणे
कोणतेही पीक घेताना बियाणाचा दर्जा अत्यंत महत्वाचा असतो. बटाटा बेणे हे कीड व रोगमुक्त असावे.
बेणे बटाटे पूर्ण वाढलेले व त्यावर अंकुर फुगलेले, ठेंगणे, जाड व चांगले पोसलेले कोंब असावेत.
लागवडीसाठी वापरावयाचे बटाटे बेणे हे २५ ते ३० ग्रॅम वजनाचे, पाच सें.मी. व्यासाचे, संपूर्ण (न कापलेले) साधारणतः अंड्याच्या आकाराचे असावे. बटाटे कापून फोडी करताना विळा व तेथील जागा जंतू विरहित करावी.
त्यासाठी विळा/ चाकू मॅन्कोझेबच्या ०.२ टक्का द्रावणात बुडवून वापरावा.
कापलेल्या फोडी कमीत कमी १० ते १२तास सावलीत सुकवून घ्याव्यात व नंतरच लागवडीस वापराव्यात.
एक हेक्टकरसाठी १५-२० क्विंटल बेणे लागते.
हवामान व हंगाम
बटाटा हे पीक राज्यात रब्बी हंगामात अधिक उत्पादन देते असे संशोधनावरून दिसून आले आहे. पीक वाढीच्या काळात दिवसाचे सरासरी तापमान २१ अंश से.पेक्षा कमी असावे.
बटाटा पोसण्यास २० अंश से. तापमान आदर्श असते. जमिनीत योग्य ओलावा व पोषक अन्नघटक असावे.
जमिनीचे तापमान १७ ते २० अंश से. असल्यास बटाटे चांगले पोसतात. यापेक्षा जास्त तापमान पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम करते. त्यामुळे उत्पादन कमी मिळते.
रब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान लागवड करावी. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीच्या थंडीचा बटाटे पोसण्यास चांगला उपयोग होतो व अधिक उत्पादन मिळते.
१५ नोव्हेंबर नंतर बटाटा लागवड केल्यास पीकवाढीच्या काळात तापमान वाढते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिमाण होतो.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆★★★★◆◆◆◆◆◆
■बटाटा लागवड■
बटाटा लागवड ही रब्बी हंगामात ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि खरिपात जून-जुलै महिन्यांत करता येते.
लागवडीसाठी पोयट्याची, मध्यम काळी व निचऱ्याची जमीन लागते.
शेतात सरी-वरंबे तयार करून 45 ु 30 सें.मी. अंतरावर लागवड करावी.
लागवडीसाठी कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी या जातींची निवड करावी.
हेक्टरी 800 ते 1500 किलो बियाणे लागते.
माती परीक्षणानुसार प्रति हेक्टरी लागवडीपूर्वी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद , 120 किलो पालाशची मात्रा द्यावी.
उर्वरित 50 किलो नत्राची मात्रा लागवडीनंतर एक महिन्याने द्यावी. अधिक माहितीसाठी विद्यापीठाशी संपर्क साधावा.
- 02426 - 243861
डॉ. आनंद सोळंके, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

आळूची शेती (Colocasia cultivation) भारतात अनेक ठिकाणी केली जाते. आळूची लागवड करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:
1. हवामान आणि जमीन:
- आळू उष्ण आणि दमट हवामानात चांगले वाढते.
- पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आळूसाठी योग्य असते.
2. लागवडीचा काळ:
- आळूची लागवड साधारणपणे मे-जून महिन्यात करतात.
3. लागवड कशी करावी:
- आळूची लागवड करताना, जमिनीमध्ये 45 x 45 सेंमी अंतरावर खड्डे खोदावेत.
- प्रत्येक खड्ड्यात आळूचे कंद लावावेत.
- कंद लावल्यानंतर खड्ड्यांना मातीने व्यवस्थित झाकावे आणि पाणी द्यावे.
4. खत आणि पाणी व्यवस्थापन:
- आळूच्या चांगल्या वाढीसाठी नियमितपणे पाणी देणे आवश्यक आहे.
- लागवडीच्या वेळी आणि नंतर आवश्यकतेनुसार खत द्यावे.
5. काढणी:
- आळूची पाने आणि कंद लागवडीनंतर साधारणपणे 6-8 महिन्यांनी काढणीसाठी तयार होतात.
आळूची लागवड करण्यापूर्वी कृषी तज्ञांचा सल्ला घेणे उत्तम राहील.