प्रेम
कुटुंब
भविष्य
मानसशास्त्र
प्रेम आणि संबंध
मी माझ्या मामाच्या मुलीवर एकतर्फी खूप प्रेम करतो. म्हणून तिच्या लहान भावाच्या मोबाईलमधून मी तिचा फोटो घेतला, पण नंतर तिच्या भावाने ही गोष्ट तिच्या आईला सांगितली व तिच्या आईने ही गोष्ट सिरीयस न घेता हसण्यावारी घातली. मला भविष्यात माझ्या प्रेमामध्ये काही समस्या तर नाही ना होणार?
6 उत्तरे
6
answers

9
Answer link
मामाच्या मुलीसोबत लग्न करण्यास काही हरकत नसते.
●मामा-मामी ला सरळ तुम्ही सांगू शकता की तुम्हांला (अबक) तुम्हाला आवडते व लग्न करण्याची इच्छा आहे.
●नात्यातील असल्याने मामा-मामी नक्कीच तुमच्या बद्दल सकारात्मक विचार करतील.
व तुमच्या आई-वडिलांना ही याबाबत काही अडचण होणार नाही...तेही आनंदित होतील.
(●बहुतांश आईची इच्छा असते की स्वतःच्या भावाची मुलगी आपली सून असावी.)
●म्हणून सर्वप्रथम तुम्ही मुलीला भेटा व तिच्यामनात काय आहे नेमके ते जाणून घ्या.
व तिचा होकार-साथ मिळवण्याचा प्रयत्न करा....
एकतर्फी प्रेम नका करू...जे आहे ते व्यक्त करा...
(वरील माझं फक्त मत आहे.....शेवटी तुमचा निर्णय !!!! )

4
Answer link
सुरवातीला खात्री करून घे की तुझे तिच्यावर प्रेम आहे की आकर्षण कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला यातला फरक कळत नाही. खात्री यासाठी करायची कारण तुझं जर प्रेम असेल तर भविष्यात काही अडचण नाही येणार. पण जर आकर्षण असेल तर ते कधीतरी कमी होणार आणि तुमच्यात कलह होणार. प्रेम आणि आकर्षण यातला फरक सांगतो तुला जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्ती पासून दुर राहतो तेव्हा जसजसा वेळ जातो. तसतसे प्रेम वाढते आणि आकर्षण कमी होते पण तो दूर राहण्याचा वेळ जास्त हवा नाहीतर दोन दिवस दूर रहायचं आणि ठरवायचे की प्रेम आहे. तर ते कळणार नाही. मग इतके दिवस दूर राहणार तर करायचं काय तिच्याशिवाय असा प्रश्न पडला असेल. तर त्यावेळी तू स्वतःच्या करिअर कडे लक्ष दे. तु म्हणतोस ना की तुझ्या मामीने ती गोष्ट हसण्यावारी नेली सिरियसली नाही घेतली. पण ज्यावेळेस तु तिच्याबद्दल किती सिरीयस आहे हे दाखवशील त्यावेळी तेही तिच्या भविष्याचा सिरीयसली विचार करतील आणि तु तिच्यासाठी योग्य असेल तरच तयार होतील. म्हणुन ती योग्यता मिळवावी लागेल तुला निव्वळ आत्याचा मुलगा आहे या योग्यतेवर कुणी मुलगी देत नसते. म्हणून सर्वकाही तुझ्यावरच अवलंबून आहे. पटलं तर संयम ठेवून करिअर कडे लक्ष दे. एकदा ते झाले तर मामा मामी ला ही आनंद वाटेल तुझं आणि तीच लग्न लावून द्यायला. तुझं प्रेम सफल होण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.👍☺☺☺
0
Answer link
तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, मला काही गोष्टी स्पष्ट करायला आवडतील.
- फोटो काढणे: तुम्ही तुमच्या मामाच्या मुलीच्या भावाच्या मोबाईलमधून तिचा फोटो काढला, हे तिच्या परवानगीशिवाय केले. हे कायद्याने आणि नैतिकतेने योग्य नाही. खासगी आयुष्य आणि गोपनीयतेचा भंग करणे चुकीचे आहे.
- परिस्थिती: तिच्या आईने या गोष्टीला गांभीर्याने घेतले नाही, हे तात्पुरते दिलासादायक असले तरी भविष्यात यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
- प्रेम: एकतर्फी प्रेम असणे स्वाभाविक आहे, पण त्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणे महत्त्वाचे आहे.
भविष्यात येणाऱ्या समस्या:
- गैरसमज: तुमच्या कृतीमुळे तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतो. तुमच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते.
- नाराजी: जरी तिच्या आईने या गोष्टीला गांभीर्याने घेतले नाही, तरी भविष्यात तिला किंवा तिच्या कुटुंबाला या गोष्टीचा राग येऊ शकतो.
- कायदेशीर समस्या: जरी शक्यता कमी असली, तरी परवानगीशिवाय फोटो काढणे हे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते.
उपाय काय?
- माफी मागा: तुमच्या मावशी आणि तिच्या मुलीची माफी मागा. तुमच्या चुकीची जाणीव आहे, हे त्यांना सांगा.
- स्पष्टीकरण द्या: तुम्ही फोटो का काढला, याबद्दल त्यांना स्पष्टीकरण द्या. तुमचा हेतू गैर नव्हता, हे त्यांना पटवून सांगा.
- आदर राखा: तिच्या भावनांचा आदर करा. ती तुमच्या प्रेमाचा स्वीकार करत नसेल, तर तिला त्रास देणे टाळा.
- भविष्यात काळजी घ्या: कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करा. दुसऱ्यांच्या गोपनीयतेचा आदर करा.
काय करू नये?
- तिचा पाठलाग करू नका.
- तिला जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करू नका.
- तिच्यावर भावनिक दबाव टाकू नका.
- अशी कोणतीही गोष्ट करू नका, ज्यामुळे तिला त्रास होईल.
अस्वीकरण: मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) आहे आणि माझा सल्ला व्यावसायिक किंवा कायदेशीर नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ञांची मदत घेऊ शकता.