4 उत्तरे
4
answers
माणुसकी म्हणजे काय?
6
Answer link
■माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात.
★★★★★■■■■■■★★★★★★★
●माणुसकी हा माणसाचा दागिना’ “माणुसकी हे अमुक’ “माणुसकी म्हणजे तमुक’ असे हजारो सुविचार नेहमी कानांवर पडतात. पण नेमकी माणुसकी म्हणजे काय? आपण खरंच माणूस म्हणण्याचा तरी लायकीचे आहोत का? आपल्या अवतीबोवती नक्की माणसंच वावरतायंत ना? असे प्रश्न मला किंवा इतर कोणाही सुजाण माणसाला पडत असतात.
=√ ओशो म्हणायचे – “माणुसकी अशी काही गोष्टच नाही. माणूस आहे. त्याचे गुणदोष आहेत. पण समाज, देश, राष्ट्र या नुसत्या आपण केलेल्या कल्पना आहेत.’
माणसाचा मुखवटा घातलेली हजारो व्यक्तिमत्त्व आहेत, दिसतात. पण कोणी त्याच्या आत धूर्त कोल्हा असतो, विषारी साप असतो, रानटी अस्वल किंवा वाघ असतो. असे विचार रामकृष्ण परमहंस यांनी व्यक्त केले आहेत.
आज धावपळीच्या युगात आपण साधी माणसं तरी उरलो आहोत की नाही याची शंका आहे. रस्त्यावर अपघात घडताना किंवा घडलेला दिसला तरी आपण न थांबता, त्याच्या मदतीला न जाता ऑफीसला उशीर होईल म्हणून पुढं जातो. सिग्नल लागल्यावर भिकारी मुलं दिसली तर त्यांना एखादा रुपया देतो. (पण आज चहाही पाच किंवा दहा रुपये आहे.) शिवाय तो मुलगा, लंगडा किंवा आंधळा भिकारी, गर्भवती स्त्री हे खरे की खोटे याचीही आपण शंका घेतो. अगदी वारकऱ्यांनाही आपण काही देतोच असं नाही. (काही वारकरी तर वारीचे निमित्त करून वर्षभराची तरतूद करून ठेवतात असं मी ऐकलं आहे.)
कधीकाळी रक्तदान करणं, स्वामींच्या किंवा देवाच्या दारात बसलेल्या लोकांना काहीतरी देणं, भूकंप किंवा वृद्धाश्रमातल्या लोकांना जुने फाटके कपडे देणं, गणपती-दहीहंडी, होळी वगैरे वर्गणी मागणाऱ्यांना पन्नास रुपये देणं अशी आपली माणुसकी उरली आहे.
पण अडाण्यांना शिकवणं, वृद्धांना वेळ देणं मनोरंजनाचे पैसे वाचवून ते अनाथ, गरीब मुलांना प्रत्यक्ष देणं हे आपण करू शकतो आणि रामकृष्ण परमहंस म्हणायचे- “त्यांच्यावर दया करणारा तू कोण टिकोजी लागून गेलास? ही तर देवाची सेवा आहे.’ अर्थात त्यातही मेवा खाणारे नेते आणि समाजसेवक आज समाजात वावरत आहेतच. त्यांच्याकडून खोटा लाभ उठवणारे धूर्त कोल्हेही गरीब सशाचं कातडं पांघरून मौजूद आहेत.
एकंदरच या माणुसकीच्या बाजारात माझ्यातला कवी “खरा माणूस’ शोधतो आहे. पण तो शोध कधी पूर्ण होईल असं वाटत नाही•

2
Answer link
माणुसकी हा संस्कार आहे....
मानवाच्या विचार करण्याच्या शक्तीमुळे निर्माण झालेला.
मानवी मनाच्या संवेदनशीलता या गुणधर्मामुळे निर्माण झालेला.
म्हणुन त्याला माणसाने माणुसकी हे नाव दिले.

0
Answer link
माणुसकी म्हणजे लोकांबद्दल प्रेम, दया आणि सहानुभूती दर्शवणे. दुसर्या व्यक्तीला मदत करणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांच्याशी चांगले वागणे म्हणजे माणुसकी.
माणुसकीचे काही पैलू:
- सहानुभूती: दुसर्या व्यक्तीच्या भावना आणि दुःखांबद्दल समजूतदार असणे.
- दया: गरजूंना मदत करणे आणि त्यांच्याबद्दल प्रेमळ असणे.
- समता: सर्व लोकांना समान वागणूक देणे आणि कोणताही भेदभाव न करणे.
- आदर: प्रत्येक व्यक्तीचा मान राखणे आणि त्यांच्या मतांचा आदर करणे.
- मदत: अडचणीत असलेल्या लोकांना शक्य ती मदत करणे.
माणुसकी हा एक महत्त्वाचा गुण आहे जो आपल्याला अधिक चांगले जीवन जगण्यास आणि एक चांगले जग निर्माण करण्यास मदत करतो.