3 उत्तरे
3 answers

दुसऱ्यांशी तुलना करावी का?

3
नक्कीच करावी कारण ह्यातून तुम्ही खूप काही शिकू शकता तुम्ही स्वतःचा कमीपणा घालू शकता
साधे भिकारीकडे पाहिलं तर वाटत देवाने आपल्याला चांगले जीवन दिलंय आपण हे जीवन का व्यर्थ घालावे आणि श्रीमंतकडे पाहिले तर वाटत आपण काय पाप केलंय आपण असे का होऊ शकत नाही आपण आपल्यातला कमीपणा शोधून प्रत्येक पायरी चढत जातो व एकेदिवशी नक्की त्यासारख्या होतो
ह्यातून एकच साध्य होत दुसऱ्याशी तुलना करा नक्कीच यश मिळत
उत्तर लिहिले · 22/12/2017
कर्म · 45560
2
तुलना करणे हा प्रामुख्याने गणितातील वस्तूंविषयीचा संबोध आहे.
         माझ्या माहितीप्रमाणे दोन व्यक्तींमध्ये केव्हाही तुलना न केलेलं चांगले असते. याचे कारण असं आहे की, प्रत्येक व्यक्तीचे एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व त्याच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणानुसार घडत असते. त्याचबरोबर प्रत्येकाला एक विशिष्ट अनुवंशिकता लाभलेली असते. तुलना केल्याने काही वेळा न्यूनगंड येण्याची खूप शक्यता असते. अशी उदाहरणे प्रामुख्याने शालेय जीवनात अधिक पहायला मिळतात. याने 50 टक्के विध्यार्थी या प्रकारच्या तुलनेनेच सामाजिक जीवनात कायमस्वरूपी अपंग झालेले आहेत. आपले आयुष्य जगण्यास असमर्थ ठरलेले आहेत.
            प्रत्येक व्यक्ती जर भिन्न आहे तर यांमध्ये तुलना कशी होऊ शकते. तुलना ही  दोन समान वस्तूमध्ये करता येते, व्यक्तींमध्ये नाही.
उत्तर लिहिले · 22/12/2017
कर्म · 2320
0

दुसऱ्यांशी तुलना करणे योग्य आहे की नाही, हे परिस्थिती आणि तुमच्या ध्येयांवर अवलंबून असते.

तुलना करण्याचे फायदे:
  • प्रेरणा: इतरांकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या जीवनात सुधारणा करू शकतो.
  • ध्येय निश्चिती: आपल्याला काय साध्य करायचे आहे, हे ठरवण्यासाठी मदत करते.
  • आत्म-सुधारणा: आपल्या कमतरता आणि सुधारणा करण्याची क्षेत्रे ओळखता येतात.
तुलना करण्याचे तोटे:
  • नैराश्य: सतत इतरांशी तुलना केल्याने असंतोष आणि नैराश्य येऊ शकते.
  • आत्मविश्वास कमी होणे: स्वतःच्या क्षमतेवर शंका येऊ लागते.
  • अवास्तव अपेक्षा: आपण आपल्यासाठी अवास्तव ध्येये निश्चित करू शकतो.

निष्कर्ष: जर तुम्ही इतरांकडून प्रेरणा घेत असाल आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुलना करणे फायद्याचे ठरू शकते. मात्र, जर तुम्हाला ते नकारात्मक वाटत असेल, तर स्वतःवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

सामाजिककरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे?
आकृती पूर्ण करा: शेजारधर्म - धागा जुळला?
समूह म्हणजे काय? समूहाचे घटक स्पष्ट करा.
विषय मानसशास्त्र प्रश्न समूह म्हणजे काय?
मित्रमैत्रिणींसमोर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज का राहत नाही?
लेखकाला सर्वांनी वेड्यात काढण्याचे तुम्हाला समजलेले कारण सोदाहरण स्पष्ट करा?
केली म्हणून मला शिव्या ठरवण्याचे ते निष्कर्ष कसे स्पष्ट कराल?