स्वमदत स्वभाव मानसशास्त्र व्यक्तिमत्व विकास

मी नेहमी शांत असतो. मला इतरांसारखी मजा मस्ती करायची आहे, पण जमत नाही. माझ्या मनातल्या गोष्टीसुद्धा मी जास्त कोणाला सांगू शकत नाही. मला स्वतःला बदलायचं आहे, काय करू समजत नाही?

3 उत्तरे
3 answers

मी नेहमी शांत असतो. मला इतरांसारखी मजा मस्ती करायची आहे, पण जमत नाही. माझ्या मनातल्या गोष्टीसुद्धा मी जास्त कोणाला सांगू शकत नाही. मला स्वतःला बदलायचं आहे, काय करू समजत नाही?

16
निखिलजी आपले वय नमूद केले असते तर जरा अजुन स्पष्ट कळले असते... कारण दुसऱ्या उत्तर मध्ये सांगितल्याप्रमाणे "मनुष्याचे परिवर्तन हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे"...
तुम्हाला जीवनात आनंद आणायचा आहे पण तो तुम्ही स्वतः थांबवत आहात... शांत असणे हा तुमचा एकप्रकारे चांगलाच गुणधर्म होय... परंतु शांत राहून मनात अस्वस्थता आणणे हा मानसिक त्रास आहे... तुम्हाला इतरांशी बोलवेसे वाटते... गप्पा गोष्टी मध्ये सहभाग घ्यावासा वाटतो... तर मग बोला लोकांशी... चांगले मित्र मैत्रिणी बनवा... एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा... आपले कोणी कौतुक करावे किंवा आपल्याशी नेहमी सतत बोलत रहावे म्हणून तुम्ही समोरच्याला पैसे, एखादी भेटवस्तू, दर वेळेस ट्रीट देणे, त्यांची कामे करणे... अश्या आहारी जाऊ नका... कारण ही सवय तुम्हीच त्यांना लावून दिली जाणार आणि तुमच्या पेक्षा ती व्यक्ती तुमच्या पैशांवर आणि तुमच्या गुलामी वर मैत्री ठेवणार... मित्र मैत्रीण ठेवायचेच असतील तर निःस्वार्थी पणाने ठेवा... अत्यंत गरजेच्या वेळेसच मदत अवश्य करा...
मी तुम्हाला एक पुस्तक घ्यायचे सुचवेन... व्यक्तिमत्त्व विकास(पर्सनल डेवलोपमेंट)...कोणत्याही लेखकाचे हे पुस्तक विकत घ्या... नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल...
आणि तुम्हाला लोकांशी मिसळायचेच असेल तर प्रथम सुरुवात घरातून करा... आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलून पहा...
तुर्तास एवढेच बोलू शकते...
अजुन काही मनात शंका असल्यास कमेंट मध्ये विचारू शकता... मला जमल्यास नक्कीच तुमच्या शंकेचे निरसन करेन... आणि उत्तर एप्स मधील अनेक सदस्य आहेत ...तेहि तुमच्या शंकेचे निरसन करण्यास मदत करतील...
धन्यवाद...!
उत्तर लिहिले · 18/12/2017
कर्म · 458560
14
मित्रा, परिवर्तन निसर्गाचा मुख्य नियम आहे. आपण स्वतः कडे पाहिले असता आपल्या लक्षात येईल की आपला जन्म झाल्या पासून आपण मरेपर्यंत आपल्यामध्ये आपल्या नकळत सतत बदल घडत असतात. पण ते आपल्याला जाणवत नाहीत.
    आपण पाहिलेच असेल पृथ्वीची उत्पत्ती झाल्या पासून ते आतापर्यंत पृथ्वीवर कायम स्थित्यंतरे आणि बदल घडत राहिले आहेत. जिवांच्या बाबतीत म्हणाल तर अगदी सर्वप्रथम पाण्यात तयार झालेल्या जलचर प्राण्यां पासून ते आतापर्यंत च्या विचार करणाऱ्या विकसित मेंदूच्या मानवा पर्यंत.
   म्हणुन बदल हा मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जर तुम्ही स्वतःला परिस्थिती नुसार बदलले नाही तर तुम्ही संपून जाल. तुमच्यात बदल होत असतो हे तुमच्या जिवंत पणाचे लक्षण आहे.
      म्हणुन तुला बदलावेच लागेल. ती काळाची गरज आहे. आता तू शांत आहेस ही फार चांगली गोष्ट आहे. पण त्या गोष्टीचा न्यूनगंड बाळगून गप्प बसणे हे चुकीचे आहे. त्यासाठी तुला तुझे ज्ञान वाढवावे लागेल. कारण ज्ञान आपल्याला प्राण्या पासून माणूस बनविते. आपला जेव्हां जन्म होतो तेव्हा आपण प्राणीच असतो. नंतर आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळे आपण माणूस बनतो.
    ज्ञान वाढविण्यासाठी पुस्तके वाचणे फार गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर पुस्तकांशी आपण मैत्री केली पाहिजे. कारण पुस्तके हे आपले असे मित्र आहेत जे आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत.
त्यांच्या संगती मुळे आपला आत्मविश्वास वाढतो. कारण ज्ञान वाढलेले असते. त्यामुळे चारचौघात वावरण्याचे धाडस वाढते.

पुस्तकामुळे तुझ्या जीवनात फार महत्वाचे बदल घडू शकतात. उदा. शिवचरित्र.  कारण शिवछत्रपती हे स्वतः एक विद्यापीठ आहेत. आयुष्यात संघर्ष कसा करावा आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याचा ते एक उत्तम नमुना आहेत. परिस्थिती नुसार स्वतः मध्ये कसा बदल घडवावा याचेही ते एक उत्तम उदाहरण आहेत.

मराठी साहित्यातील दोन महान लेखक प्र. के. अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकातूनही तुला प्रेरणा मिळू शकते. यांच्या पुस्तकातून तू वक्तृत्व कौशल्य, विनोद बुद्धी, सतत सद्दविवेकबुद्धी जागृत ठेवण्याची कला संपादन करू शकतोस.
  माझ्या स्वतःच्या जीवनात पुस्तकांमुळे फार सकारात्मक बदल घडले आहेत. मी अगोदर फार रागीट होतो. माझ्या डोक्यात कायम विचारांचा गोंधळ उडालेला असायचा. त्यामुळे चारचौघात बोलण्याचे धाडस होत नसे. मला स्वतःचे विचार नव्हते. पण आता सर्व व्यवस्थित.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट देव आणि त्यासारख्या कोणत्याही अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही. विश्वास फक्त स्वतःच्या डोक्यावर ठेवायचा. मग आपल्याला कोणाचीच गरज पडत नाही.
  दुसरी गोष्ट... लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करायचा नाही.




उत्तर लिहिले · 17/12/2017
कर्म · 21970
0
नक्कीच! मला समजतंय की तुम्हाला अधिक आनंदी आणि मनमोकळं व्हायचं आहे. स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी काही गोष्टी करू शकता:

1. लहान सुरुवात करा: एकदम मोठा बदल करण्याऐवजी लहान-लहान गोष्टी करून सुरुवात करा.

  • नवीन छंद जोपासा: चित्रकला, संगीत, नृत्य किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा छंद घ्या.
  • नियम तोडा: कधीतरी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ झोपणे किंवा आवडता पदार्थ खाणे यासारख्या गोष्टी करा.

2. लोकांशी बोला:

  • जवळच्या मित्रांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोला.
  • नवीन लोकांना भेटा: वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्या.

3. स्वतःला व्यक्त करा:

  • डायरी लिहा: आपल्या भावना आणि विचार कागदावर मांडा.
  • कलात्मक गोष्टी करा: गाणे गा, चित्रं काढा किंवा नृत्य करा.

4. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा:

  • चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या: दररोजच्या जीवनातील सकारात्मक गोष्टी शोधा.
  • कृतज्ञता व्यक्त करा: तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभारी राहा.

5. तज्ञांची मदत घ्या: गरज वाटल्यास मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.

टीप: बदल हा हळू हळू होतो, त्यामुळे स्वतःला वेळ द्या आणि धीर धरा.

मला आशा आहे की हे तुम्हाला मदत करेल.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2020

Related Questions

माझे मित्र मला माझ्या रंगावरून वाईट बोलतात आणि त्यामुळे मी स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करतो?
सामाजिक परिपक्वता कशी निर्माण करावी?
हजरजबाबीपणा नसल्यामुळे दुसऱ्यांसमोर कमजोर ठरतो का?
आपण शिस्त का पाळत नाही?
मी एका मुलीवर खूप प्रेम करतो, ती पण माझ्यावर खूप प्रेम करते, पण आमचं बोलणं दोन-तीन महिन्यांनी होतं. मग मला वाटतंय हे सगळं संपून टाकावं, कारण मला तिची सारखी आठवण येते?
दोन-तीन दिवसांपूर्वी एक जण मला खूप वाईट बोलला, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात तेच चालू आहे की तो मला असं का बोलला?
मी समाज किंवा जग बदलण्याचा जसा विचार केला होता, हे जग तसे नाहीये?