2 उत्तरे
2
answers
भांडवल म्हणजे काय?
2
Answer link
भांडवल (Capital) म्हणजे उत्पादित केलेले उत्पादनाचे साधन किंवा भविष्यातील उत्पादन वाढावे म्हणून मानवाने निर्माण केलेली उत्पादन-सामग्री. उद्योगामध्ये वस्तूंची निर्मिती करण्यासाठी भांडवल आवश्यक असते. भौतिक भांडवल (यंत्रसामुग्री, जमीन, इमारत इत्यादी) आणि मानवी भांडवल (सुशिक्षित, प्रशिक्षित व निरोगी मनुष्यबळ).
उद्योगामध्ये प्रथम भांडवल / Capital investment विनियोग करावा लागतो. त्यासाठी पैशाच्या स्वरूपात भांडवल गोळा करावे लागते. हा पैसा ज्यांनी बचत केली असेल, त्यांच्या जवळ उपलब्ध असतो व तो उत्पादनासाठी वापरावयाची कामगिरी उद्योगाचे प्रवर्तक स्वीकारतात. म्हणून काहीजण काही जण गुंतवणूकदाराची तर काही जण कर्जदाराची भूमिका पार पाडतात.
भांडवलाची उपलब्धता : जनतेने बचत केलेला पैसा बँक किंवा इतर गुंतवणुकीच्या मार्गाने आलेला पैसा. उद्योगाच्या नफ्यातून आलेला पैसा आणि सरकारकडून विविध योजनातून आलेला पैसा (करात सूट / सबसिडी / अनुदान).
भांडवलाचे दोन भाग असतात – स्थिर आणि फिरते/खेळते भांडवल. स्थिर भांडवलामध्ये सर्व इमारती, उत्पादनसाधने, यंत्रसामग्री, बंदरबांधणी, विद्युतपुरवठा इत्यादींचा समावेश होतो. फिरते भांडवल म्हणजे उपभोगासाठी तयार होत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंचा-कच्चा माल, अर्धोत्पादित वस्तू तसेच कारखाने आणि वितरक यांच्याजवळील तयार माल यांचा-समावेश होतो. स्थिर भांडवलासाठी करावी लागणारी गुंतवणुक दीर्घमुदती स्वरुपाची असते. त्यासाठी लागणारा पैसा भांडवल बाजारातून (Capital Market) भागभांडवल (Shares) किंवा ऋणपत्रभांडवल (Bonds) म्हणून उभारावा लागतो. काही बँका व दीर्घमुदती अर्थसाहाय्य पुरविणाऱ्या संस्था यांच्याकडूनही कर्जरुपाने मिळणार पैसा स्थिर भांडवलासाठी वापरता येतो. व्यक्तींनी विम्याच्या स्वरुपात विनियोग विश्वस्तांच्या प्रमाणपत्रात गुंतवणुक करुन उभारलेले भाडंवल, विमा कंपन्या व विनियोग विश्वस्त संस्था स्थिर भांडवलासाठी उपलब्ध करुन देऊ शकतात. खेळत्या भांडवलाची गरज भागविण्याची जबाबदारी बहुतांशी बँका व कंपन्या उचलतात. अर्थात अल्पमुदती व दीर्घमुदती भांडवल मिळविण्यासाठी व्याजाचे निरनिराळे दर द्यावे लागतात. हे व्याजाचे दर त्या त्या प्रकारच्या भांडवलाची मागणी व पुरवठा, भांडवल बाजाराची संघटनात्मक कार्यक्षमता आणि अर्थव्यवस्थेची तत्कालीन परिस्थिती इ. घटकांवर अवलंबून असतात.
भांडवल निर्मिती : भविष्यातील गरज भागविण्यासाठी उपयोगी पडेल, अशा साधनसामग्रीच्या साठ्यात भर टाकणे म्हणजे भांडवल निर्मिती होय. देशाच्या आर्थिक विकासाची गती बहुतांशी अंतर्गत भांडवल निर्मितीवर अवलंबून असते. भांडवल निर्मीतीचे प्रमाण राष्ट्रीय उत्पन्नातून होणारी बचत व तिचा विनियोग यांनी ठरविले जाते. बचतीचा उपयोग उत्पादक विनियोगासाठी केल्याने राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी उंचावते. तसेच राष्ट्रिय उत्पन्नाची पातळी वाढली, म्हणजे बचत आणि विनियोग यांचेही प्रमाण वाढते. याउलट, खालावलेली राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी आणि गरिबी यांमुळे हव्या त्या प्रमाणात भांडवल निर्मीती होत नाही; तसेच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत नाही; त्यामुळे आर्थिक मागासलेपणा पुढे चालू राहतो. योग्य अशा उपायांनी या दुष्ट चक्राबाहेर पडल्यानंतरच देशाच्या आर्थिक विकासाला खरी चालना मिळते आणि देशाचे एकंदर राष्ट्रिय आणि दरडोई उत्पन्न वाढत जाते. म्हणूनच देशाच्या आर्थिक विकासकार्यात सुरुवातीच्या भांडवल निर्मितीला फार महत्त्व असते.
0
Answer link
भांडवल (Capital):
अर्थ:
1. अर्थशास्त्रानुसार:
उत्पादन प्रक्रियेत वापरली जाणारी संपत्ती, जी वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी वापरली जाते, तिला भांडवल म्हणतात. हे मनुष्यनिर्मित असते.
2. सामान्य भाषेत:
व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी वापरले जाणारे धन किंवा मालमत्ता म्हणजे भांडवल.
भांडवलाचे प्रकार:
- स्थिर भांडवल: जमीन, इमारत, यंत्रसामग्री इत्यादी.
- खेळते भांडवल: कच्चा माल, रोख रक्कम इत्यादी.
भांडवलाचे महत्त्व:
- उत्पादन वाढवणे.
- रोजगार निर्मिती.
- आर्थिक विकास.