राजकारण पगार राजकारणी कायदे

भारतातील खासदार आणि आमदार यांचे मानधन (पगार) किती असते व त्यांना कोणत्या सोयीसुविधा असतात?

2 उत्तरे
2 answers

भारतातील खासदार आणि आमदार यांचे मानधन (पगार) किती असते व त्यांना कोणत्या सोयीसुविधा असतात?

16
(पुढील माहिती संकलित आहे)

आपल्या देशातील दरवर्षीचे प्रतिव्यक्ती उत्पन्न (per capita income) पाहिले तर ते जवळजवळ 1 लाख रुपये आहे. म्हणजेच साधारणपणे प्रत्येक भारतीय वर्षभरात 1 लाख रुपये कमावतो, परंतु तुम्हाला तुम्हीच निवडलेल्या नेत्याच्या पगाराबाबत माहिती आहे का? जर नाही, तर ही माहिती तुम्हाला चकित करणारी आहे. या लोकप्रतिनिधींना पगाराव्यतिरिक्त एवढे भत्ते मिळतात ज्यांची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. एका खासदाराला दरमहा 1 लाख 40 हजार रुपये फिक्स मिळतात. ज्यावर त्यापेक्षा जास्त भत्ता दिला जातो.
फिक्स पगाराबाबत बोलायचे झाल्यास यात
फिक्स सॅलरी/महिना : 50, 000 +
मतदारसंघ भत्ता/महिना : 45, 000 +
ऑफिस भत्ता/महिना : 45,000 एवढे सगळे जोडलेले असते.
पण यावरही मिळतात एवढे भत्ते...
- पगाराव्यतिरिक्त मिळणाऱ्या भत्त्यांबाबत बोलायचे झाल्यास याची यादी खूप मोठी आहे.
यात डायरेक्ट एरियर (वार्षिक) : 3 लाख 80 हजार रु.,
विमानप्रवास भत्ता (वार्षिक) : 4 लाख 8 हजार रु.,
रेल्वे प्रवास भत्ता (वार्षिक) : 5 हजार रु.,
पाणी भत्ता (वार्षिक) : 4 हजार रु.,
वीज भत्ता (वार्षिक) : 4 लाख रु. यासारखे भत्ते सामील आहेत.
एका खासदाराला पगाराव्यतिरिक्त जवळजवळ 1 लाख 51 हजार 833 रुपये प्रतिमाह म्हणजेच वार्षिक 18 लाख 22 हजार रुपये भत्ते दिले जातात.
मग किती झाला एकूण पगार...
- फिक्स्ड पगार आणि भत्ते जोडले तर एका खासदाराला एका महिन्यात 2,91,833 रुपये पगार मिळतो. म्हणजेच देशाला एक खासदार वार्षिक 35 लाख रुपयांना पडतो.
टॅक्स नाही लागत, वर या सुविधाही फ्री
- सर्वात खास बाब अशी की, एवढ्या पगारावर त्यांना कोणताही टॅक्स लागत नाही. यांना मिळणारे भत्ते अनेक प्रकारचे असतात. ज्यात अनेक सुविधा यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही दिल्या जातात. यात पत्नी वा जोडीदारासाइी 34 मोफत विमानप्रवास, अनलिमिटेड रेल्वेप्रवास आणि संसद अधिवेशनादरम्यान घरापासून ते दिल्लीपर्यंतचे 8 विमानप्रवासही सामील आहेत.
भत्त्यांमध्ये असतात या बाबी...
- भत्त्यांमध्ये जोडलेल्या गोष्टींबाबत बोलायचे झाल्यास एका खासदाराला 50 हजार युनिट मोफत वीज, 1 लाख 70 हजार फ्री कॉल्स, 40 लाख लिटर पाणी, राहण्यासाठी सरकारी बंगला (ज्यात सर्व फर्निचर आणि एअरकंडिशन, शिवाय त्यांचे मेंटेनन्सही फ्री) सामील आहे.
हे तर मिळणारच..
- याशिवाय जे उरते, ते आहे सिक्युरिटी गार्ड्स, आयुष्यभराची पेन्शन, जीवन वीमा आणि सरकारी गाडी, हे सरकारकडून खासदाराला मोफत दिले जाते. आता तुम्ही विचार करत असाल की, हे पुढारी किती आरामात जगत असतील नाही?
पुढच्या स्लाइड्सवर ग्राफिक्समधून पाहा, खासदारांना मिळणारे भत्ते...







उत्तर लिहिले · 24/2/2018
कर्म · 123540
0

भारतातील खासदार (संसद सदस्य) आणि आमदार (विधानसभा सदस्य) यांचे मानधन आणि त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांविषयी माहिती खालीलप्रमाणे आहे:

खासदार (संसद सदस्य) यांचे मानधन आणि सुविधा:

  • मानधन: खासदारांना दरमहा रु. 1,00,000 वेतन मिळते.
  • इतर भत्ते:
    • कार्यालयीन खर्च भत्ता: रु. 70,000 (उदा. स्टेशनरी, पोस्टेज).
    • निवडणूक क्षेत्र भत्ता: रु. 60,000 (मतदारसंघातील कामांसाठी).
    • संसदीय कामकाज भत्ता: रु. 2,000 प्रतिदिन (संसदेच्या कामकाजात भाग घेतल्याबद्दल).
  • निवास: दिल्लीमध्ये निवासस्थान किंवा निवासस्थानासाठी भत्ता मिळतो.
  • प्रवास:
    • विमान आणि रेल्वे प्रवास मोफत.
    • वर्षातून काही विमानांचे मोफत तिकीट कुटुंबीयांसाठी.
  • वैद्यकीय सुविधा: मोफत वैद्यकीय उपचार.
  • पेन्शन: माजी खासदारांना पेन्शनची सुविधा.

आमदार (विधानसभा सदस्य) यांचे मानधन आणि सुविधा:

आमदारांचे मानधन आणि सुविधा राज्य सरकार ठरवते, त्यामुळे ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे असू शकतात. काही राज्यांतील उदाहरण:

  • महाराष्ट्र:
    • मानधन: रु. 2,00,000 प्रति महिना (वेतन आणि इतर भत्ते मिळून).
    • निवास: मुंबईत आमदार निवास किंवा त्यासाठी भत्ता.
    • प्रवास: राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून मोफत प्रवास, रेल्वे प्रवास सवलत.
    • वैद्यकीय सुविधा: शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार.
  • इतर राज्ये: इतर राज्यांमध्येही आमदारांना वेतन, निवास, प्रवास आणि वैद्यकीय सुविधा मिळतात, ज्या राज्यानुसार बदलतात.

अधिक माहितीसाठी आपण संबंधित राज्य विधानमंडळाच्या किंवा भारताच्या संसदेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5220

Related Questions

उपराष्ट्रपती कलम ७०?
उपराष्ट्रपतीचे कलम ६६ काय आहे?
पण मला प्रिन्सिपल एम्प्लॉयर रजिस्टर नंबर कोणाकडून मिळत नाही आहे?
भारतात 75 वर्षानंतर व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते का?
भारतीय संसदीय विधिमंडळाचे महत्त्व स्पष्ट करा?
विधिमंडळ - न्यायमंडळ तणावाची कारणे सांगा?
कायदे मंडळाची कार्ये स्पष्ट करा?