सरकार विमा सरकारी योजना अर्थशास्त्र

LIC म्हणजे काय, ती सरकारी आहे का आणि त्याचे फायदे काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

LIC म्हणजे काय, ती सरकारी आहे का आणि त्याचे फायदे काय आहेत?

3
भारतीय जीवन बीमा निगम( Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.

ब्रीदवाक्य :-ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी के बाद भी

१९५६ साली २४३ विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करून निर्माण केलेल्या एलआयसीचे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे. मुंबईमध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा, ५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आहेत.
  गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. सध्या १३,३७,०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत.
  मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. युलिप, म्युच्युअल फंड, गृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात.
उत्तर लिहिले · 4/12/2017
कर्म · 210095
0

LIC म्हणजे काय:

LIC म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India). ही भारत सरकारची मालकी असलेली भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.

LIC सरकारी आहे का:

होय, LIC ही पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.

LIC चे फायदे:

  • आर्थिक सुरक्षा: LIC पॉलिसीधारकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. पॉलिसी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, LIC त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम देते.
  • गुंतवणुकीचा पर्याय: LIC पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळतो.
  • कर्ज सुविधा: LIC पॉलिसीवर कर्ज उपलब्ध होते.
  • कर लाभ: LIC मध्ये भरलेल्या प्रीमियमवर कर सवलत मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर Rebate चा लाभ मिळवता येतो.
  • विविध योजना: LIC विविध प्रकारच्या विमा योजना पुरवते, जसे की मुदत विमा, बचत विमा, पेन्शन योजना आणि आरोग्य विमा. त्यामुळे लोकांना त्यांच्या गरजेनुसार योजना निवडता येतात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2840

Related Questions

सामान्य कर्जासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?
दरसाल 8% व्याजदराने 3.5 वर्षासाठी 350 रुपयांच्या कर्जाऊ रकमेवर सरळव्याज किती?
दरसाल 8% व्याजदराने 3.5 वर्षांसाठी?
मी एचडीएफसीचा कर्जदार होतो, पण मी ते सेटलमेंट केले. तर मला दुसरी बँक कर्ज देत नाही, काही पर्याय?
आज अडीच लाखाची गरज डाग मोडून सोडवू का कर्ज काढून पाच वर्षांसाठी पूर्ण करू?
अकाउंटच्या एंट्री कशा काढायच्या 12वी?
संस्थेचा वार्षिक हिशोब अनियमित आहे का?