2 उत्तरे
2
answers
युती आणि आघाडी म्हणजे काय?
3
Answer link
@हे उत्तर परिपूर्ण असेल किंवा नसेल पण माझ्या वाचनात आलेले आहे म्हणून येथे देण्याचा एक प्रयत्न)@
विधानसभा, लोकसभा, महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणूका जवळ आल्या की युती आणि आघाडी या दोन शब्दांची कधी नाही तेवढी चर्चा सुरु होते. चर्चेची गुर्हाळं सुरु होतात. युती झाली, युती मोडली, आघाडीत बिघाडी, महायुतीत महाफूट.. यासारख्या मथळ्यांनी रोजचे पेपर भरुन जातात.
युती, आघाडी हे काही भारतीयांना नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक युत्या-आघाड्या अगदी रामायण-महाभारतापासून आपल्याकडे होतच आल्या आहेत.
रामायणात रामाने वानरसेनेबरोबर केली ती युतीच….
महाभारतात श्रीकृष्णाबरोबर पांडवांनी केली तीसुद्धा युतीच….
संगीतक्षेत्रात शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी युती करुनच अनेक चांगल्या गाण्यांना जन्म दिला. आजही अजय-अतुलसारख्या युत्या आपल्या कानांना रिझवत आहेत.
उद्योग-व्यवसायातही अनेक भारतीय कंपन्यांनी परदेशी कंपन्यांशी युती केली. सरकारी “मारुती”ने जपानच्या सुझुकीबरोबर केलेल्या युतीची फळं आपण अजूनही चाखंतोय. व्हिडिओकॉन वगैरेसारखे ब्रॅंड परदेशस्थ कंपन्यांशी युती करुनच मोठे झाले.
औषध निर्मितीतही युत्या आणि आघाड्या आहेत. तशा त्या सगळ्याच क्षेत्रात आहेत. युती आणि आघाडी या शब्दांचा आपल्यावर एवढा पगडा आहे की विमानसेवा, विमाव्यवसाय, वृत्तपत्रे या सगळ्यात सध्या परदेशी कंपन्यांशी युत्या आणि आघाड्या झाल्याच आहेत.
तसं तर बैलगाडीची बैलजोडी ही पण युती आणि घोडागाडी किंवा पूर्वीच्या काळातले राजेमहाराजांच्या रथाचे घोडे हे तर युती-आघाडीचे घटकपक्ष.
निवडणूका आल्या की हे बैल, घोडे इत्यादि चर्चेला बसतात. कोणाला कोणाबरोबर आघाडी करता येईल, कोणाशी युती केली तर सत्ताप्राप्ती होईल याच्यावर खल सुरु होतो. एकमत काही होत नाही.
मग स्वबळ अजमावलं जातं. स्वबळावर निवडणूका लढवल्या जातात. ५-१० वर्षे सत्तेत किंवा विरोधात एकत्र बसूनही निवडणूक काळात एकमेकांची उणीदुणी, उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात. चिखलफेक होते.
सगळं करुन निवडणूक सरते.. निकाल जाहिर होतात… कोणालाच बहुमताचा जादुचा आकडा गाठता येत नाही. मग पंचाईत होते. शेवटी पुन्हा युती आणि आघाडीच कामाला येते.

0
Answer link
युती आणि आघाडी हे दोन शब्द भारतीय राजकारणात अनेकदा वापरले जातात. यांचा अर्थ आणि त्यातील फरक खालीलप्रमाणे:
युती (Alliance):
- युती म्हणजे दोन किंवा अधिक राजकीय पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतात किंवा सरकार स्थापन करतात.
- युती सहसा निवडणुकीपूर्वी जाहीर होते.
- यामध्ये विचारसरणी जुळणाऱ्या पक्षांचा समावेश असतो.
- उदाहरण: भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती.
आघाडी (Front/Coalition):
- आघाडी म्हणजे निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी किंवा विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी एकत्र येणारे पक्ष.
- आघाडी निवडणुकीनंतर तयार होते, जेव्हा कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही.
- आघाडीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊ शकतात.
- उदाहरण: महाविकास आघाडी (शिवसेना UBT, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस).
फरक:
- युती निवडणुकीपूर्वी होते, तर आघाडी निवडणुकीनंतर.
- युतीमध्ये विचारधारेची समानता असण्याची शक्यता असते, तर आघाडीत तशी शक्यता कमी असते.
अधिक माहितीसाठी: