3 उत्तरे
3 answers

गंधक म्हणजे काय?

5
सल्फर यास गंधक असेही संबोधले जाते. रसायनशास्त्राने गंधकाचा मूलद्रव्यात समावेश केलेला आहे. गंधक पिवळ्या रंगाचा असतो. गंधकाला वास येत नाही. घासला तर त्याला घर्षणाने विशिष्ट वास येतो. गंधकाला उष्णता देऊन पातळ केला तर खूप वास दरवळतो आणि ज्वलनाने घाण वास येतो.

गंधक पाण्यामध्ये विरघळत नाही. हवेत जाळला असता निळ्या ज्योतीने जळतो. गंधक ज्वालामुखीच्या प्रदेशात सापडतो. गरम पाण्याच्या झऱ्यांमध्येही गंधकाचा अंश असतो. अशा झऱ्याच्या आसपास निरनिराळ्या धातूंबरोबर संयोग पावलेल्या स्वरूपातही गंधक सापडतो. भारतात बिहार, आंध्र प्रदेश, राजस्थान वगैरे ठिकाणी गंधक सापडतो. हा गंधक त्या त्या धातूच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये वेगळा केला जातो.

दूध, अंडी वगैरे प्राणिज अन्न-द्रव्यांमध्ये तसेच लसूण, मोहरी, कांदा वगैरे वनस्पतीं मध्येही गंधक असतो.

बहुउपयोगित्वामुळे आयुर्वेदातील अनेक औषधांत त्याचा वापर केला जातो. आयुर्वेदात उल्लेखलेली सुवर्णमाक्षिक, हिराकस, मोरचूद, मनःशीळ, हरताळ वगैरे द्रव्ये गंधकसंयोगाने बनलेली असतात.

वापराआधी याची वेगवेगळ्या प्रकारे शुद्धी केली जाते.
उत्तर लिहिले · 13/11/2017
कर्म · 2320
2
अधातु रासायनिक पदार्थ. सल्फर यास गंधक असेही संबोधले जाते. रसायनशास्त्राने गंधकाचा मूलद्रव्यात समावेश केलेला आहे. गंधक पिवळ्या रंगाचा असतो. गंधकाला वास येत नाही. घासला तर त्याला घर्षणाने विशिष्ट वास येतो. गंधकाला उष्णता देऊन पातळ केला तर खूप वास दरवळतो आणि ज्वलनाने घाण वास येतो. गंधक पाण्यामध्ये विरघळत नाही.

(S) (अणुक्रमांक १६) अधातु रासायनिक पदार्थ. सल्फर यास गंधक असेही संबोधले जाते. रसायनशास्त्राने गंधकाचा मूलद्रव्यात समावेश केलेला आहे. गंधक पिवळ्या रंगाचा असतो. गंधकाला वास येत नाही. घासला तर त्याला घर्षणाने विशिष्ट वास येतो. गंधकाला उष्णता देऊन पातळ केला तर खूप वास दरवळतो आणि ज्वलनाने घाण वास येतो.

गंधक पाण्यामध्ये विरघळत नाही. हवेत जाळला असता निळ्या ज्योतीने जळतो. गंधक ज्वालामुखीच्या प्रदेशात सापडतो. गरम पाण्याच्या झऱ्यांमध्येही गंधकाचा अंश असतो. अशा झऱ्याच्या आसपास निरनिराळ्या धातूंबरोबर संयोग पावलेल्या स्वरूपातही गंधक सापडतो. भारतात बिहार, आंध्र प्रदेश, राजस्थान वगैरे ठिकाणी गंधक सापडतो. हा गंधक त्या त्या धातूच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये वेगळा केला जातो.

दूध, अंडी वगैरे प्राणिज अन्न-द्रव्यांमध्ये तसेच लसूण, मोहरी, कांदा वगैरे वनस्पतीं मध्येही गंधक असतो.

बहुउपयोगित्वामुळे आयुर्वेदातील अनेक औषधांत त्याचा वापर केला जातो. आयुर्वेदात उल्लेखलेली सुवर्णमाक्षिक, हिराकस, मोरचूद, मनःशीळ, हरताळ वगैरे द्रव्ये गंधकसंयोगाने बनलेली असतात.

गंधकाचा वापर करण्याआधी वेगवेगळ्या प्रकारे त्याची शुद्धी केली जाते.

सल्फर खनिज

सल्फरचे स्फटिक

उत्तर लिहिले · 7/11/2021
कर्म · 121765
0

गंधक (Sulfur) एक रासायनिक घटक आहे. हे अधातू (nonmetal) असून सामान्य तापमानाला पिवळ्या रंगाच्या घन रूपात आढळते.

गंधकाची काही वैशिष्ट्ये:

  • चिन्ह: S
  • अणु क्रमांक: 16
  • अणु वस्तुमान: 32.066 u
  • इलेक्ट्रॉन संरूपण: [Ne] 3s² 3p⁴

उपयोग:

  • औषधे
  • खते
  • रसायने
  • ज्वालामुखीकरण (rubber vulcanization)
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1820

Related Questions

सोडियम धातू कशामध्ये ठेवतात?
सोडियम कायम रॉकेल मध्ये का ठेवतात?
आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातूंचे गुणधर्म कमी का होत जातात?
सोडियम हा धातू कायम केरोसीनमध्ये का ठेवतात?
मूलद्रव्यांचे प्रकार कोणते?
सोडियम धातूला रॉकेलमध्ये ठेवतात?
2 8 2 असलेल्या मूलद्रव्यांचे गण कोणते?