पक्षी मान्सून पर्यावरण प्राणी प्राणीशास्त्र

पावसाची आतुरतेने वाट पाहणारा पक्षी कोणता?

3 उत्तरे
3 answers

पावसाची आतुरतेने वाट पाहणारा पक्षी कोणता?

9
पावसाची आतुरतेने वाट पाहणारा 'चातक पक्षी'....!!!
पी-पी-पियू,पी-पी-पियू असा धातूसारखा खणखणणारा आवाज कडून एकमेकांचा पाठलाग करणारे चातक भर पावसात बघायला मिळतात. हा पक्षी फक्त पावसाचं पाणी पितो अशी दंतकथा आहे. चातक पावसाळ्यात दिसतो म्हणून ही कथा रचली असावी.प्राचीन आख्यायिकांवर आधारलेल्या भारतीय कवितांमध्ये याचे वैशिष्ट्य, म्हणजे फक्त पावसाच्याच पाण्याच्या थेंबावर तहान भागवणारा पक्षी असे सांगितलेले असते. अर्थात ही एक कविकल्पना आहे. 
उत्तर लिहिले · 30/10/2017
कर्म · 458560
1
चातक पक्षी हा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. तो फक्त पहिल्या पावसाचे पाणी पितो अशी दंतकथा आहे.
उत्तर लिहिले · 30/10/2017
कर्म · 1670
0

चातक नावाचा पक्षी पावसाची आतुरतेने वाट पाहतो.

या पक्ष्याबद्दल अशी धारणा आहे की तो केवळ पावसाचेच पाणी पितो.

वैज्ञानिक नाव: क्लॅमेटर जॅकोबिनस (Clamator jacobinus)

इतर नावे: पपीहा,Rain bird, Jacobin cuckoo

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1780

Related Questions

फुलपाखरू जीवशास्त्राच्या सिद्धांतानुसार उडू शकत नाही? तर मग ते का उडते?
डायनासोरचे हात आखूड का होते?
माकडाला शेपूट का असते?
फरक स्पष्ट करा: फुलपाखरू आणि वटवाघूळ?
रोहित पक्षी कोणत्या घाटात आढळतात?
लांब मान असणारा प्राणी कोणता?
सापांचे वय किती?