मुंबईला बृहन्मुंबई का संबोधतात किंवा काही गावांचा उल्लेख करण्याआधी खुर्द, बुद्रुक का लिहितात? बुद्रुक, खुर्द, मौजे व कसबा म्हणजे काय?
मुंबईला बृहन्मुंबई का संबोधतात किंवा काही गावांचा उल्लेख करण्याआधी खुर्द, बुद्रुक का लिहितात? बुद्रुक, खुर्द, मौजे व कसबा म्हणजे काय?
2) ‘खुर्द’ हा एक फारसी भाषेतला शब्द. याचाअर्थ गांव परंतू लहान गांव. ‘खुर्द’ शब्दाचा आणखी एक अर्थ आहे आणि तो म्हणजे ‘सुटे किंवा किरकोळ पैसे’. मोठ्या गावाच्या शेजारी वसलेली लहान वा किरकोळ वस्ती म्हणजे ‘खुर्द’.
‘बुद्रुक’ हा शब्द ‘बुजुर्ग’ या फारसी शब्दाचा अपभ्रंश असून ‘बुजुर्ग’ म्हणजे मोठा किंवा थोर हे आपल्या सर्वांना माहित आहे..मुख्य किंवा मोठ गांव म्हणजे ‘बुद्रुक’. शेजारी वसलेली किरकोळ वसती म्हणजे ‘खुर्द’..!
मित्रांनो, 'बुद्रुक ‘ आणि ‘ खुर्द ‘ हे शब्द एखाद्या गावाच्या पुढे का लावले जातात , तुम्हाला माहित आहे का ? महाराष्ट्रामध्ये अशी अनेक गावे आणि शहर देखील आहेत जिथे आजही गावातील परिसरांना बुद्रुक आणि खुर्द असे पुढे लावले जाते . आज या नावांची आपल्याला ऐवढी सवय झाली आहे कि हे शब्द नक्की काय अर्थाने आणि का वापरले जातात याचा विचार देखील आपण करत नाही . परंतु या शब्दांनाही इतिहास आहे. अगदी सामान्य असा असला तरी माहित असायलाच हवा असा आहे . म्हणूनच या लेखातून आज आपण हे जाणून घेणार आहोत .

आपल्या आसपास एका तरी परिसरास बुद्रुक आणि खुर्द हे पुढे जोडले असेंन , उदाहरणार्थ बादोले बुद्रुक-बादोले खुर्द,पिंपळगाव बुद्रुक – पिंपळगाव खुर्द , हिंगणे बुद्रुक – हिंगणे खुर्द आणि असे अनेक उदाहरणे आहेत . तर मग हे शब्द नक्की काय अर्थ घेऊन येतात हे प्रथम आपण पाहुयात …
🔍 *बुद्रुक व खुर्द म्हणजे काय ?*
🛑 एखाद्या रस्त्यामुळे, नदी किंवा ओढ्यामुळे गावाचे दोन भाग पडत. ते दोन्ही भाग समान नसल्यामुळे गावाच्या मोठ्या भागाला बुजुर्ग (फारशी अर्थ मोठा) आणि छोट्या भागाला खुर्द (फारशी अर्थ छोटा किंवा खुद्द) म्हटले जाऊ लागले.
🛑 पुढे बुजुर्ग या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो बुद्रुक असा प्रचलित झाला. त्यामुळे आज आपल्याला अनेक गावांच्या नंतर बुद्रुक किंवा खुर्द असे नाव लागलेले दिसून येते.
🛑 शिवकाळापूर्वी महाराष्ट्रात आदिलशाही, मुगलशाही, कुतुबशाही यांचा मोठा अंमल होता. त्यामुळे मराठी भाषेवरही इस्लामी भाषेचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
🗣️ या शासन काळात गावांना बुद्रुक आणि खुर्द अशी नावे देण्यात आली.
अगदी सामान्य भाषेत बुद्रुक आणि खुर्द या शब्दांचा अर्थ जाऊन घ्यायचा झाला , तर याचा अर्थ होतो मोठे आणि लहान . बुद्रुक हा बुजुर्ग या शब्दाचा अपभ्रंश आहे . अर्थात गावाच्या वयाचा नाही तर आकारमानाने लहान आणि मोठे असे याचे विभाजन केले गेले आहे . गावातून वाहणाऱ्या नदीमुळे गावाचे ढोबळ मानाने विभाजन व्हायचे . यामध्ये गावाचा जो भाग आकारमानाने मोठा तो ‘बुजुर्ग ‘ म्हणजेच आता ‘बुद्रुक‘ म्हणून उच्चारला जातो . आणि लहान भाग हा ‘खुर्द‘ म्ह्णून उच्चारला जातो .
आदिलशाही ,कुतुबशाही व मोघल यांच्या अमलात असलेल्या प्रदेशात बुद्रुक व खुर्द हे शब्द वापरले जायचे. हेच आहे या शब्दांचे उगमस्थान . मराठी , उर्दू , फारसी मिश्रित भाषेतून या शब्दांचा उगम झाला . आणि मोघल सत्तेपासून या शब्दांचा वापर होतो आहे .☺
🔍 *मौजे आणि कसबा म्हणजे काय ?*
▪️काही गावांच्या आधी मौजे आणि कसबा अशी नावे लावलेलीही दिसून येतात.
▪️मौजे हा अरबी शब्द असून मौजअ अथवा मौझा या अरबी शब्दावरून हा शब्द आला.
▪️याचा अर्थ गाव असाच होतो. तर कसबा हा शब्द उत्तर अमेरिकेतील Quasah या शब्दावरून आला आहे.
▪️मुघल आक्रमणाच्या काळात हे शब्द भारतात आले. कसबा याचा अर्थ बाजारपेठेचे ठिकाण असा होतो.
▪️हा शब्द महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्यांतही वापरलेला दिसून येतो.
मुंबईला बृहन्मुंबई का म्हणतात?
मुंबई हे शहर अनेक लहान बेटांचे मिळून बनलेले आहे. या बेटांचा एकत्रितपणे विकास झाल्यावर त्याला 'बृहन्मुंबई' असे संबोधले जाऊ लागले. 'बृहत्' म्हणजे मोठे आणि 'मुंबई' हे शहराचे नाव.
गावांचा उल्लेख करण्याआधी खुर्द, बुद्रुक का लिहितात?
जेव्हा एकाच नावाच्या दोन किंवा अधिक गावे असतात, तेव्हा त्या गावांमध्ये फरक करण्यासाठी 'खुर्द' आणि 'बुद्रुक' या शब्दांचा वापर केला जातो.
बुद्रुक, खुर्द, मौजे व कसबा म्हणजे काय?
-
बुद्रुक: बुद्रुक म्हणजे मोठे गाव. जेव्हा दोन गावे एकाच नावाने ओळखली जातात, तेव्हा मोठ्या गावाला बुद्रुक म्हणतात.
-
खुर्द: खुर्द म्हणजे लहान गाव. त्याच नावाच्या दोन गावांमध्ये लहान गावाला खुर्द म्हणतात.
-
मौजे: मौजे म्हणजे गाव. हे गाव प्रशासकीय दृष्ट्या एक स्वतंत्र एकक असते.
-
कसबा: कसबा हे एक प्रकारचे गावच असते, पण ते त्या भागातील मुख्य गाव म्हणून ओळखले जाते. कसब्यात बाजारपेठ आणि इतर महत्वाच्या सुविधा असतात.
अधिक माहितीसाठी: