15 उत्तरे
15 answers

इतिहास म्हणजे काय?

29
💡 _*इतिहास म्हणजे काय?*_

▫ भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे ' इतिहास' होय.
▪ भूतकाळात जे काही घडले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय.
▫ इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे तीन कालखंड पडतात.

👉 _*इतिहासाची आवश्यकता काय आहे?*_

▪  लाखो वर्षात मानव कसा राहिला? त्याचे अन्न कोणते होते? त्याची वस्त्रे कशा प्रकारची होती, या प्रश्नांची उत्तरे इतिहासात अभ्यासातून मिळतात. पूर्वजांनी केलेल्या प्रगतीतून पूर्वजांविषयी स्वाभिमानाची भावना निर्माण होते आणि त्यांनी केलेल्या चुका टाळून भविष्यकाळातील प्रगती करणे इतिहासाच्या अभ्यासाद्वारे शक्य होते.

👍
उत्तर लिहिले · 23/5/2018
कर्म · 115390
19
इतिहास म्हणजे काय?

1) भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे ' इतिहास' होय
2) भूतकाळात जे काही घडले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय
3) इतिहासाचे प्राचीन , मध्ययुगीन , व आधुनिक असे तीन कालखंड पडतात.

इतिहासाची आवश्यकता

1) लाखो वर्षात मानव कसा राहिला.
2) त्याचे अन्न कोणते होते.,
3) त्याची वस्त्रे कशा प्रकारची होती, या प्रश्नांची उत्तरे इतिहासात अभ्यासातून मिळतात,
4) पूर्वजांनी केलेल्या प्रगतीतून पूर्वजांविषयी स्वाभिमानाची भावना निर्माण होते. आणि
5) त्यांनी केलेल्या चुका टाळून भविष्यकाळातील प्रगती करणे इतिहासाच्या अभ्यासाद्वारे शक्य होते...

इतिहासाची कालगणना
1) भूतकाळात घडलेल्या घटनांचा परस्परसंबंध असतो.
2) या घटनांचा कालक्रम ठरवण्यासाठी काळ मोजण्याच्या   पद्धतीला 'कालगणना'  म्हणतात.
उत्तर लिहिले · 17/10/2017
कर्म · 77165
0

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा अभ्यास. हा अभ्यास मानवी कृती, समाज, संस्कृती आणि काळानुसार झालेल्या बदलांचा मागोवा घेतो.

इतिहासाच्या अभ्यासाचे काही महत्वाचे पैलू:

  • घटनाक्रम: भूतकाळातील घटनांची क्रमवार मांडणी करणे.
  • कारण आणि परिणाम: घटनांमागील कारणे शोधणे आणि त्यांचे परिणाम समजून घेणे.
  • विश्लेषण: ऐतिहासिक कागदपत्रे, अवशेष आणि इतर साधनांचा वापर करून माहितीचे विश्लेषण करणे.
  • अर्थ लावणे: इतिहासाच्या आधारे निष्कर्ष काढणे आणि भूतकाळातील घटनांचा अर्थ लावणे.

इतिहास आपल्याला भूतकाळातील चुकांपासून शिकण्यास मदत करतो आणि वर्तमान आणि भविष्यातील निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
फ्रेंच राज्यक्रांतीचे स्वरूप स्पष्ट करा?
इ. स. १७५०-१८५० या काळातील इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीची वाटचाल लिहा.
युरोपियन राष्ट्रांचे अमेरिकेतील वसाहतीकरण?
औद्योगिक क्रांती प्रथम कुठे झाली?