शिवाजी महाराज राजवंश इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज वंशावळ सविस्तर माहिती मिळेल का ?

हे घराणे दॊलताबाद वेरुळच्या बाजुने  अहमदनगरच्या दक्षिणेला दॊंड जवळ पांडे-वडगाव या ठिकाणी आले.हे गाव अदिलशहा व निजामशहा यांच्या सरहद्दीवर असल्याने तेथील जहागिरी संभाळण्याचे काम थोडे जोखमीचे होते.त्याच्या पराक्रमाला जोड मिळाली ती फ़लटणच्या निंबाळ्काराचे चालुन आलेले स्थळ.
मालोजीचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते.मालोजीस लवकर संतान होइना म्हणुन मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते.त्यांनी नगरचा पिरशहा शरीफ़ यांस नवस केला.व त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला १५९४ व १५९७ ला दोन मुले झाली.त्यांची नावे शहाजी व शरीफ़जी ठेवण्यात आले.पुढे शहाजीना संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.
मालोजीचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवाची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळ्त असत.पण घरातील विरोधामुळे त्यांनी संबंध नाकारले. मालोजीला कमी लेखले गेले.मालोजी पुन्हा वेरुळला येऊन शेती करु लागले.तेथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापड्ला.त्या पॆशांच्या उपयोग करुन मालोजीनी हजारो घोडे घेतले व आपली फ़ॊज तयार करुन सरदार बनले.निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले.व लखुजी जाधवाने आपली मुलगी शहाजीना देऊन सोयरीक जमवली.

भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदीराचा जीर्णोध्दार करुन मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते अभिषेक करण्यात आले मंदीरच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी सातारातील श्रीशिखरशिंगणापुरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधुन त्याने तलाव तयार केला ,यात्रेकरुचा दुवा मिळवला.निजामशाहीने ऒरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’असे भोसले घराण्याच्या नावे दोन पेठा वसवल्या.मालोजीचा पराक्रम वाढतच गेला.
आपल्या उपयुक्त कामगिरीने मालोजीनी बुह्राणपुरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहदवरील इंदापुरच्या बाजुच्या शत्रुचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवले.या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवुन रणक्षेत्रावर मरण पावले.भोसले घराण्यातील वीरतेचे ’पहिले स्मारक’ मालोजीची छ्त्रीरुपाने इंदापुरभुमीवर स्थापन झाले.जरी मालोजीचा अंत झाला तरी भोसले घराण्याच्या पराक्र्माची सुरवात केले.व शिवाजींना स्वराज्य स्थापण्यासाठी मोठी प्रेरणा दिली.


संदर्भ

2 उत्तरे
2 answers

छत्रपती शिवाजी महाराज वंशावळ सविस्तर माहिती मिळेल का ?

15
.छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय l
उत्तर लिहिले · 30/9/2017
कर्म · 310
2
छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ खाली दिलेल्या चौकटीत आहे
उत्तर लिहिले · 30/9/2017
कर्म · 440

Related Questions

सातारा येथील तांबवे येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
मगध नालंदा विद्यापीठ काय आहे?
गुप्त कालखंडात त्यांची राजधानी कोणती होती?
नालंदा हे बौद्ध विहार कोणत्या कालखंडातील आहे?
सरदार पटेलांना कोणत्या कामामुळे सरदार ही पदवी देण्यात आली?
सातारा तांबवे येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?
पंढरपूरनजिक वाखरी उपरी गावांमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरांत कधी अफजलखान किंवा मुघलांनी कोणते मंदिर जमिनीत गाडले होते का? तसेच, ते मंदिर काही जाधव मंडळींनी जमिनीतून उकरून बाहेर काढले होते आणि म्हणून त्या जाधव मंडळींना उकर्डे/उकेडे असे उपनाव पडले, अशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे का?