3 उत्तरे
3
answers
मृत व्यक्तीचे फोटो घरात लावणे योग्य कि अयोग्य?
4
Answer link
मृत व्यक्तींचे फोटो लावू नये व लावले पाहिजेत याबद्धल समाजात मतभेद आहेत लावावे तर का लावावे आपल्या काही शास्त्र कारांनी वास्तु व आपली समृद्धीसाठी काही महत्वाच्या सूचना मांडल्या आहेत त्या तुमच्यासाठी देत आहे 1) वास्तूमध्ये मोठ्यांचा आदर सन्मान होणे आवश्यक 2)कोणत्याही वास्तूच्या संरक्षणासाठी काही मोठ्या व्यक्तींचा सहवास आवश्यक 3) मृत व्यक्तींचे फोटो वास्तुत आवश्यक लावावेत (अपवाद जे अपघाती मृत व लहान व्यक्ती मृत यांचे फोटो लावू नयेत) 4) त्या फोटोंसमोर कधीही दुःख ,शोक, संताप ,क्रोध ,व्यक्त करु नये.5)मृत व्यक्तींची रोज पुजा करू नये .फक्त त्यांच्या वर्ष तिथीला व पितृ पंधरवाड्यातील त्यांच्या तिथीला पूजा करणे.6)फ़ोटो लावून त्याकडे दुर्लक्ष करणे फोटोवर धूळ जाळी जलमत साफ न करणे.7) फोटोसमोर केवळ आशिर्वाद घेण्यासाठी नतमस्तक होणे एवढे पुरेसे8) मृत व्यक्तींचे फोटो आपल्या पूर्ण वास्तूच्या नैऋत्य कोपऱ्यात उत्तरमुखी नाहीतर दुसरा पर्याय दक्षिणेच्या भिंतीला उत्तरमुखी लावणे 9) फक्त आपल्या बेडरूम मद्ये मृत व्यक्तींचे फोटो लावणे टाळावे10) घरात येणाऱ्या नकारात्मक उर्जेला प्रभावाला मृत व्यक्ती अटकाव आणतात.11) आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या मार्गदर्शक व्यक्तीचा फोटो मुख्य खुर्चीच्या मागे वर लावणे. 12) आपण माझ्या घराच्या मागे असेच आशीर्वाद रुपी उभे राहा अशी प्रार्थना जरूर करा त्या एकाद्या व्यक्तीची कुटुंबाची भरभराट होण्यासाठी त्या संपूर्ण घराला पितरांचा आशीर्वाद लाभणे आवश्यक असते .ज्याप्रमाणे मृत आईवडिलांचे फोटो मुलांना प्रगतीपथावर आणतात तसेच श्राद्ध या विधीमुळे मृतात्म्याना सदगती लाभते व त्यांचा कृपाशीर्वाद संपूर्ण घराला लाभतो.संपर्क : prashant astro vastu 9867622327
4
Answer link
मृत व्यक्तीचा फोटो किंवा पुतळा घरात ठेऊ नये. सर्वसामान्य व्यक्ती मृत झाल्यावर त्याच्या लिंगदेहाकडून फक्त नकारात्मक उर्जाच बाहेर पडते. काही काळाने लिंगदेहातील मनोदेह, कारणदेह व महाकारणदेहातील वासना, अहं ( मी अमुक देह आहे याची जाणीव ) इच्छा इत्यादी बरेच काही असते , ते कमी होत जाते व तो जीव पुढच्या गतीला जातो. काहीजणांचा लगेच जातो तर काहींचा हजारो वर्षांनी. मेलेल्याला आपला फोटो किंवा मूर्ती समोर दिसत असल्याने त्याच्या पुढच्या गतीस जाण्यास अडथळा येतो. माझा देह असा होता वगैरे जाणीव पुसली जाण्यास अडथळा येतो. म्हणून फोटो किंवा मूर्ती वापरू नये. जिवंत असलेल्या नातेवाईकांच्या भावनेपेक्षा मेलेल्याचा मरणानंतरचा पुढचा प्रवास व्यवस्थित होणे महत्वाचे असते.
संत जिवंतपणीच मोक्षाला गेलेले असतात त्यामुळे त्यांचा फोटो ठेवला किंवा पुजला तर त्यातून चैतन्यच मिळते. पण सामान्य व्यक्तीकडून नकारात्मक उर्जेशिवाय काहीही मिळत नाही.
दहावा, बारावा, वर्षश्राद्ध व पक्ष, म्हाळ इत्यादी विधीत पूर्वीही फोटो मूर्ती असे काही वापरत नव्हते व त्या विधींमध्ये असे काही करण्याची तरतूदही नाही. यजमान विचारतो की, "गुरुजी, फोटो कुठे ठेऊ ?" म्हणून गुरुजी म्हणतात की, " खुर्चीवर ठेवून हार घाला." त्यांना विचारले की, "या विधीत फोटोबाबत किंवा मूर्ती बाबत काय सांगितले आहे ?" तर ते सांगतील की 'काहीच सांगितले नाहीये.'
source of info ... अनेक वर्षांचे या विषयावरील वाचन, काही चांगल्या साधकांकडून मिळालेली माहिती इत्यादी
0
Answer link
मृत व्यक्तीचे फोटो घरात लावावे की नाही, याबद्दल लोकांचे वेगवेगळे मत आहे. या संदर्भात काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे:
या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही धार्मिक आणि वास्तुशास्त्र तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
घरात फोटो लावण्याचे फायदे:
- आठवण: मृत व्यक्तीच्या फोटोंमुळे त्यांची आठवण कायम राहते आणि त्यांच्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करता येतो.
- प्रेरणा: काही लोकांसाठी, मृत व्यक्तीचे फोटो प्रेरणास्त्रोत असू शकतात, ज्यामुळे त्यांना चांगले काम करण्याची आणि जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.
- कुटुंब: कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी हे फोटो मदत करू शकतात.
घरात फोटो लावण्याचे तोटे:
- दुःख: काही लोकांसाठी, मृत व्यक्तीचे फोटो सतत पाहिल्याने दुःख आणि निराशा वाढू शकते.
- वास्तुशास्त्र: वास्तुशास्त्रानुसार, मृत व्यक्तींचे फोटो घरात लावणे अशुभ मानले जाते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- मानसिक प्रभाव: काही लोकांना मृत व्यक्तीचे फोटो पाहून भीती किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
काय करावे?
- जर तुम्हाला फोटो लावल्याने सकारात्मकता वाटत असेल आणि दुःख कमी होत असेल, तर तुम्ही ते लावू शकता.
- जर फोटो लावल्याने नकारात्मकता वाढत असेल, तर ते न लावणे चांगले.
- तुम्ही फोटो लावण्यासाठी घराच्या उत्तर दिशेचा वापर करू शकता, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.
- मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करणे आणि त्यांची आठवण करणे अधिक महत्त्वाचे आहे.