2 उत्तरे
2
answers
गोचीड साठी काही रामबाण औषध आहे का?
7
Answer link
1) गोचीडामध्ये प्रजनन फार वेगाने होते. एक नर मादीचा जोडीपासून दर तीन आठवड्यास 3000 अंडी जातात तर त्यातून 200 पिल्ले जमतात.
2) जनावरांच्या अंगावर एकुण गोचीडापैकी फार तर 10-15 टक्के गोचीड असतात. 80-90 टक्के गोचीड गोठ्यामध्ये व आसपासच्या परीसरामध्ये विशेषता खाच खळग्यात, लाकडाचा फटीमध्ये, भिंतीच्या भेगामध्ये, गव्हाणीच्या खाली असतात. म्हणून फक्त जनावरांच्या अंगावरील गोचिडांचे निर्मुलन करुन उपाय होत नाही. एकाचवेळी जनावरांच्या अंगावर व परीसरात, गोठ्यात गोचीडाकरीता औषध फवारणे गरजेचे आहे.
3) गोचीड निर्मुलनासाठी अनेक औषधे उपयोगी पडतात. परंतू एकाच औषधाचा वापराने गोचिडांना त्या औषधाची सवय होऊन त्याची परीणामकारकता नाहीशी होते म्हणून दर दोन तीन महिन्यात औषधात बदल करणे चांगले.
4) जनावरांचा अंगावर व परीसरात किंवा गोठयात गोचीड निर्मुलनासाठी फवारण्याचा औषधाच्या प्रमाणात फरक असतो अंगावर मारण्याचा औषधापेक्षा – गोठयासाठी औषधाचे हे प्रमाण दुप्पट करावे लागते. औषधांच्या वापर करतांना औषध जनावरांच्या तोंडात नाकात जाणार नाही व जनावर चाटणार नाही याची काळजी घ्यावी.
5) गोचीडनाशके फक्त पुर्ण वाढ झालेल्या गोचिडावरच परिणाम करतात. अंड्यावर किंवा लहान अवस्थेतील गोचीडावर औषध काम करीत नाही. याकरीता गोचिड निर्मुलनाचा कार्यक्रम वारंवार करावा लागतो
6) गोठ्यामध्ये औषध मारण्यापेक्षा फ्लेमगनने जाळणे जास्त परिणामकारक ठरते.
7) गोचिड अन्नाशिवाय जास्त दिवस (उपाशी) जीवंत राहू शकतात.
8) निसर्गामध्ये त्यांचे शत्रू कमी आहेत.
जैविक नियंत्रण- ज्या ठिकाणी गोठ्याच्या जवळ चराऊ कुरण असेल त्याठीकाणी गोचीड कुरणामध्ये असतात. असे चराऊ कुरणांची नांगरणी करुन गोचिडांच्या नाश करता येतो. सुर्यकिरणामुळे गोचिडाची अंडी व लहान पिल्लं नष्ट होतात.
गोचिड निर्मुलनासाठी उपलब्ध औषधे व त्यांचे प्रमाण –
1) मॅलेथिऑन - 5मीली.प्रती लीटर (विषबाधा झाल्यास द्यावयाचे इंजेक्शन–
अँट्रोपिन सल्फेट)
2) असुनटॉल - 1मीली.प्रती लीटर (विषबाधा झाल्यास द्यावयाचे इंजेक्शन–
अँट्रोपिन सल्फेट)
3) लिंडेन - 0.03% (विषबाधा झाल्यास बारब्युच्युरटे)
4) ब्युटॉक्स - 2-3मीली प्रती लीटर (विषबाधा झाल्यास बारब्युच्युरटे)
मॅलेथिऑन सोबत निमार्क 5 मीली प्रती लीटर पाणी या प्रमाणात जनावरांच्या अंगावर व गोठ्यात फवारणे जास्त परीणामकारक आहे.
0
Answer link
गोचीड (Ticks) ह्या परोपजीवी किटका आहेत ज्या जनावरांच्या आणि माणसांच्या शरीरावर चिकटून रक्त शोषतात. गोचीडांपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
घरगुती उपाय:
- तेल (Oil): गोचीडांवर तेल लावल्यास त्यांचा श्वास कोंडतो आणि त्या मरून जातात. यासाठी तुम्ही खोबरेल तेल, मोहरीचे तेल किंवा पेट्रोलियम जेली वापरू शकता.
- साबण आणि पाणी (Soap and Water): गोचीडांना साबण आणि पाण्याच्या मदतीने मारता येते.
- ऍपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar): ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये असणारे ऍसिडिक गुणधर्म गोचीडांना दूर ठेवण्यास मदत करतात.
रासायनिक उपाय:
- गोचीडनाशक स्प्रे (Tick Sprays): बाजारात अनेक प्रकारचे गोचीडनाशक स्प्रे उपलब्ध आहेत.permethrin असलेले स्प्रे प्रभावी असतात.
- गोचीडनाशक पावडर (Tick Powders): गोचीडनाशक पावडर जनावरांच्या शरीरावर तसेच त्यांच्या आजूबाजूला टाकावी.
इतर उपाय:
- लवंग तेल (Clove Oil): लवंग तेल diluted स्वरूपात जनावरांच्या अंगावर लावावे.
- लिंबू (Lemon): लिंबाचा रस गोचीडांवर टाकल्यास ते मरून जातात.
प्रतिबंधात्मक उपाय:
- जनावरांना नियमितपणे गोचीडनाशक औषधे लावावीत.
- जनावरांच्या गोठ्याची नियमित स्वच्छता करावी.
- बागेतील गवत नियमितपणे काढावे.
महत्वाचे:
लक्षात ठेवा, कोणताही उपाय करण्यापूर्वी पशुवैद्यकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.