
परजीवी
6
Answer link
पॅरासिटॉइड्स म्हणजे परोपजीवी किंवा परजीवी.
म्हणजे अशा वनस्पती किंवा असे प्राणी की जे दुसऱ्या वनस्पती किंवा प्राण्यांवर अवलंबून असतात.
उदा. जंत, बुरशी, अमरवेल.
आणि भातावरील पाने गुंडाळणारी अळी इ.
ट्रायकोग्रामा जपोनिकम आणि टेलिनॉमस रोवाणी - भातावरील खोड कीड
टेलिनॉमस रीमस - तंबाखूची पाने खाणारी अळी
ट्रायकोग्रामा बॅक्टरी - कपाशीवरील गुलाबी बोंड अळी
7
Answer link
1) गोचीडामध्ये प्रजनन फार वेगाने होते. एक नर मादीचा जोडीपासून दर तीन आठवड्यास 3000 अंडी जातात तर त्यातून 200 पिल्ले जमतात.
2) जनावरांच्या अंगावर एकुण गोचीडापैकी फार तर 10-15 टक्के गोचीड असतात. 80-90 टक्के गोचीड गोठ्यामध्ये व आसपासच्या परीसरामध्ये विशेषता खाच खळग्यात, लाकडाचा फटीमध्ये, भिंतीच्या भेगामध्ये, गव्हाणीच्या खाली असतात. म्हणून फक्त जनावरांच्या अंगावरील गोचिडांचे निर्मुलन करुन उपाय होत नाही. एकाचवेळी जनावरांच्या अंगावर व परीसरात, गोठ्यात गोचीडाकरीता औषध फवारणे गरजेचे आहे.
3) गोचीड निर्मुलनासाठी अनेक औषधे उपयोगी पडतात. परंतू एकाच औषधाचा वापराने गोचिडांना त्या औषधाची सवय होऊन त्याची परीणामकारकता नाहीशी होते म्हणून दर दोन तीन महिन्यात औषधात बदल करणे चांगले.
4) जनावरांचा अंगावर व परीसरात किंवा गोठयात गोचीड निर्मुलनासाठी फवारण्याचा औषधाच्या प्रमाणात फरक असतो अंगावर मारण्याचा औषधापेक्षा – गोठयासाठी औषधाचे हे प्रमाण दुप्पट करावे लागते. औषधांच्या वापर करतांना औषध जनावरांच्या तोंडात नाकात जाणार नाही व जनावर चाटणार नाही याची काळजी घ्यावी.
5) गोचीडनाशके फक्त पुर्ण वाढ झालेल्या गोचिडावरच परिणाम करतात. अंड्यावर किंवा लहान अवस्थेतील गोचीडावर औषध काम करीत नाही. याकरीता गोचिड निर्मुलनाचा कार्यक्रम वारंवार करावा लागतो
6) गोठ्यामध्ये औषध मारण्यापेक्षा फ्लेमगनने जाळणे जास्त परिणामकारक ठरते.
7) गोचिड अन्नाशिवाय जास्त दिवस (उपाशी) जीवंत राहू शकतात.
8) निसर्गामध्ये त्यांचे शत्रू कमी आहेत.
जैविक नियंत्रण- ज्या ठिकाणी गोठ्याच्या जवळ चराऊ कुरण असेल त्याठीकाणी गोचीड कुरणामध्ये असतात. असे चराऊ कुरणांची नांगरणी करुन गोचिडांच्या नाश करता येतो. सुर्यकिरणामुळे गोचिडाची अंडी व लहान पिल्लं नष्ट होतात.
गोचिड निर्मुलनासाठी उपलब्ध औषधे व त्यांचे प्रमाण –
1) मॅलेथिऑन - 5मीली.प्रती लीटर (विषबाधा झाल्यास द्यावयाचे इंजेक्शन–
अँट्रोपिन सल्फेट)
2) असुनटॉल - 1मीली.प्रती लीटर (विषबाधा झाल्यास द्यावयाचे इंजेक्शन–
अँट्रोपिन सल्फेट)
3) लिंडेन - 0.03% (विषबाधा झाल्यास बारब्युच्युरटे)
4) ब्युटॉक्स - 2-3मीली प्रती लीटर (विषबाधा झाल्यास बारब्युच्युरटे)
मॅलेथिऑन सोबत निमार्क 5 मीली प्रती लीटर पाणी या प्रमाणात जनावरांच्या अंगावर व गोठ्यात फवारणे जास्त परीणामकारक आहे.