मला UPSC करायची आहे, काय आणि कशापासून सुरुवात करावी?
मला UPSC करायची आहे, काय आणि कशापासून सुरुवात करावी?
UPSC पूर्व परीक्षेसाठी अभ्यासक्रम
दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. तसेच दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या आहेत.
* सामान्य अध्ययन पेपर 1 - एकूण- 7 घटक, वेळ -2 तास, प्रश्न - 100, गुण- 200
* सामान्य अध्ययन पेपर 2 - एकूण- 7 घटक, वेळ -2 तास, प्रश्न-80 , गुण-200
* निगेटिव्ह मार्किंग UPSC-MPSC दोन्हीसाठी 3:1 आहे.
अ) सामान्य अध्ययन पेपर - 1 : पेपर-1 हा 100 प्रश्नांचा व 200 गुणांचा असतो. त्यातील घटकनिहाय प्रश्न व गुण वितरण पुढीलप्रमाणे असते -
1) चालू घडामोडी - 10 प्रश्न 20 गुण
2) इतिहास - 15 प्रश्न 30 गुण
3) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल - 15 प्रश्न 30 गुण
4) भारतीय राज्यपद्धती व प्रशासन -15 प्रश्न 30 गुण
5) आर्थिक व सामाजिक विकास - 15 प्रश्न 30 गुण
6) पर्यावरणासंबंधी सर्वसाधारण मुद्दे - 15 प्रश्न 30 गुण
7) सामान्य विज्ञान -15 प्रश्न 30 गुण
या संख्येत दरवर्षी बदल होतो.
ब) सामान्य अध्ययन पेपर-2 : पेपर-2 हा 80 प्रश्नांचा व 200 गुणांचा असतो. त्यातील घटकनिहाय प्रश्न व गुण वितरण पुढीलप्रमाणे असते -
1) आकलन - 10 उतार्यावरील 40 प्रश्न (100 गुण)
2) संवादकौशल्यासहित आंतरव्यक्तिगत कौशल्य - 0
3) तर्कसंगत विश्लेषण व विश्लेषण - 8 प्रश्न, 20 गुण
4) निर्णयक्षमता व समस्या निराकरण - 8 प्रश्न, 20 गुण
5) साधारण बुद्धिमापन चाचणी - 8 प्रश्न, 20 गुण
6) अंकज्ञान व माहिती विश्लेषण - 8 प्रश्न, 20 गुण
7) मराठी व इंग्रजी भाषा आकलन - 8 प्रश्न, 20 गुण
UPSC मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम
UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप
या परीक्षेत एकूण 9 पेपर्स 2350 गुणांसाठी आहेत. त्यातील पात्रता पेपर्समधील 600 गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जात नाहीत. पात्रता पेपर्समध्ये उमेदवारास आयोगाने निश्चित केलेल्या किमान मानकापेक्षा जास्त गुण मिळविणे आवश्यक असते. सदर मानक हे 25% आहे.
अ) पात्रता पेपर -
पेपर ’अ’ - भारतीय भाषा - 300 गुण
पेपर ’ब’ - अनिवार्य इंग्रजी - 300 गुण
ब) गुणानुक्रमासाठी ग्राह्य धरले जाणारे विषय -
अनिवार्य विषय - प्रत्येक पेपरचा कालावधी 3 तास.
पेपर 1-निबंध (250 गुण), 2500 शब्द
पेपर 2 -भारतीय वारसा, संस्कृती इतिहास व भारत व जगाचा भूगोल (250 गुण), 5000 शब्द
पेपर 3-शासन, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध (250 गुण),5000 शब्द
पेपर 4- अर्थव्यवस्था, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान (250 गुण), 5000 शब्द
पेपर 5- नैतिकता, निष्ठा व कल/दृष्टिकोन (250 गुण), 3700 शब्द
वैकल्पिक विषय -
पेपर 6 - वैकल्पिक विषय (पेपर-1) (250 गुण)
पेपर 7- वैकल्पिक विषय (पेपर-2) (250 गुण)
24) UPSC मुख्य परीक्षांची तयारी करताना कशावर भर द्यावा?
परीक्षातील यशामध्ये अभ्यासाइतकाच नमुना पेपर्स सोडविण्याचा सराव खूपच महत्त्वाचा आहे. गेल्या परीक्षांतील यशाचे गुणमानक लक्षात घेऊन आपले उद्दिष्ट निश्चित करून तितके किमान गुण मिळविण्यासाठी सराव करावा. UPSC साठी हे मानक 40 ते 45% चे असते, तर MPSC ने पर्सेंटाईल पद्धत स्वीकारल्याने ते विविध संवर्गासाठी पुढील प्रकारचे आहे : खुला -35%, आरक्षित-30% ,खेळाडू व अपंग -20%.
युपीएससीची मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असल्याने लिखाणाचा सराव महत्त्वाचा आहे. सर्वसाधारणपणे 20 शब्द लिहिल्यास ते 1 गुणांसाठी पुरेसे असतात. प्रत्येक पेपरचा कालावधी हा साधारणपणे 3 तासांचा असतो.
1) निबंध
3 तास
2) सा. अध्ययन पेपर-1
3 तास
3) सा. अध्ययन पेपर-2
3 तास
4) सा. अध्ययन पेपर-3
3 तास
5) सा. अध्ययन पेपर-4
3 तास
6) वैकल्पिक विषय पेपर-1
3 तास
7) वैकल्पिक विषय पेपर-2
3 तास
2013 च्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3 मध्ये प्रत्येकी 25 प्रश्न विचारण्यात आले होते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 200 शब्दात लिहावयाचे होते आणि प्रत्येक प्रश्नास 10 गुण होते. काही प्रश्नांमध्ये प्रत्येकी 5 मार्काचे उपप्रश्न विचारण्यात आले होते. मात्र 2014 च्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये 25 प्रश्न विचारले गेले असले तरी सामान्य अध्ययन पेपर 2 आणि 3 मध्ये मात्र प्रत्येकी 20 प्रश्न विचारण्यात आले होते. या 20 पैकी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 200 शब्दात 12.50 गुणांसाठी लिहिण्यास सांगितले होते. 2013 आणि 2014 या दोन्ही परीक्षांमध्ये सामान्य अध्ययन पेपर 4 मध्ये प्रत्येकी 14 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी 6 प्रश्न केस स्टडीजवर विचारले होते. 5 केस स्टडीजना प्रत्येकी 20 गुण होते, तर एका केस स्टडीजला 25 गुण होते. या सर्वांची उत्तरे 250 ते 300 शब्दात लिहिणे अपेक्षित होते. उर्वरित 8 प्रश्न हे 125 गुणांसाठी विचारण्यात आले होते. त्यातही उपप्रश्न होते. 10 गुणांच्या प्रश्नांचे उत्तर फक्त 150 शब्दांत लिहिण्यास सांगितले होते.
निबंध पेपरमध्ये दोन घटकावर प्रत्येकी 1250 शब्दात दोन निबंध 3 तासांमध्ये लिहावयाचे होते. एकूण 26 वैकल्पिक विषयापैकी प्रत्येक वैकल्पिक विषयाचे 2 पेपर होते. प्रत्येक पेपरमध्ये दोन भागात प्रत्येकी 4 याप्रमाणे एकूण 8 प्रश्न होते. त्यापैकी प्रश्न 1 आणि प्रश्न 5 यामध्ये प्रत्येकी 5 उपप्रश्न होते. तसेच उर्वरित प्रश्नांमध्ये प्रत्येकी 2 ते 3 उपप्रश्न विचारण्यात आले होते. येथेही 10 गुणांच्या प्रश्नाचे उत्तर 150 शब्दात लिहिणे अपेक्षित असते.
UPSC मुख्य परीक्षेची तयारी
2013 पासून मुख्य परीक्षा ही सुधारीत स्वरूपात होत आहे. उमेदवारांनी 50 टक्केपर्यंत गुण मिळविण्याचे लक्ष्य ठेवल्यास त्यांना देशात पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण होणे अवघड जाणार नाही. सुधारित मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची असून मुलाखतीचे 275 गुण धरून अंतिम निकालासाठी 2025 गुण विचारात घेतले जातात. यापैकी 1000 पेक्षा जास्त गुण मिळविल्यास तो उमेदवार निश्चितच देशात सर्वोच्च क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकतो.
पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नेहमी डोळ्यासमोर ठेवावा आणि प्रयत्न करावेत. त्यामुळे अभ्यास जास्त सविस्तर आणि परिपूर्ण होण्यास मदत होते. शिवाय मुख्य परीक्षेच्या वेळेस अभ्यासाचे दडपण कमी होते. 🤗🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍

जून-जुल महिन्यात लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असतो. यशस्वी झालेल्या मराठी तरुणांचा सत्कार समारंभ, त्यांच्या मुलाखती यांनी पालकवर्ग भारावलेला असतो. बारावीचा निकालही जाहीर झालेला असतो. आपला पाल्यही आय.ए.एस., आय.पी.एस. व्हावा या स्वप्नांना उराशी बाळगत त्यासाठी पालक धावपळ करू लागतात. मग सुरू होतात चर्चेच्या फे ऱ्या. ज्यांना या परीक्षेची माहिती आहे किंवा ज्यांनी या परीक्षा दिल्या आहेत अथवा जे यशस्वी झाले आहेत, त्यांना गाठून पाल्याच्या भविष्याबाबत पालकांचे विचारमंथन सुरू होते.
स्पर्धापरीक्षेसंदर्भात महाराष्ट्रात परिस्थिती बदलायला लागली, डॉक्टर, इंजिनीअर, व्यतिरिक्तही स्पर्धापरीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत प्रवेश करणे हा एक पर्याय असू शकतो, हा विचार महाराष्ट्रात रुजायला लागला, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेत काही सावधानता बाळगणेही आवश्यक ठरते.
पालकांची भूमिका
ज्यांच्या पाल्यांना स्पर्धापरीक्षेची तयारी करावयाची आहे किंवा ज्या पालकांची इच्छा आहे की डॉक्टर, इंजिनीअर किंवा सीए होण्यापेक्षा आपल्या मुला-मुलींनी स्पर्धापरीक्षेची तयारी करावी, त्यांना काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत-
१) जर आपण नक्की ठरवले असेल की, आपल्या पाल्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होऊन आय.ए.एस. किंवा आय.पी.एस. व्हावे किंवा आपल्याला आपल्या पाल्याला तसे वाटत असेल तर पदवीसाठी प्रवेश घेताना एवढेच लक्षात घ्या की, या परीक्षेसाठी पात्रता फक्त पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे एवढीच आहे. पदवी कोणत्या शाखेतून घेतली, हे महत्त्वाचे नाही.
२) जर आपल्या पाल्याने डॉक्टर, इंजिनीअर यासारख्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन नंतर ही परीक्षा द्यावी, असे आपल्याला वाटत असेल तरी हे लक्षात ठेवा की, कोणतीही पदवी घेताना पहिल्या वर्षांपासून या परीक्षेच्या तयारीस सुरुवात करणे योग्य ठरते.
३) ज्या पाल्यांना काही कारणांमुळे बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले असतील तर पालकांनी निराश होण्याचे कारण नाही. डॉक्टर, इंजिनीअर यासारखेच स्पर्धापरीक्षा हे देखील एक करिअर आहे. त्यादृष्टीने बी.ए., बी.कॉम. किंवा बी.एस्सी.ला प्रवेश घेतल्यापासूनच या स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यास आपल्या पाल्याला प्रेरणा द्या. पदवीच्या या तीन वर्षांचे उत्तम नियोजन केल्यास आपला पाल्य कमीत कमी वयात आय.ए.एस. किंवा आय.पी.एस. होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्याच्या बरोबरीचे मित्र काय करीत आहेत, ते वैद्यक, अभियांत्रिकी किंवा इतर क्षेत्रांत किती यशस्वी झाले, याची आठवण आपल्या पाल्याला पुन:पुन्हा करून देत त्याचे मानसिक खच्चीकरण करू नका. त्याउलट बी.ए., बी.कॉम. किंवा बी.एस्सी. करताना या परीक्षेसाठी योग्य नियोजन केल्यास या परीक्षेत आपला पाल्य नक्की यशस्वी होऊ शकतो, याची खात्री बाळगा.
४) महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपला पाल्य या परीक्षेची व्यवस्थित तयारी करतो का, यावर बारकाईने लक्ष ठेवा. या परीक्षेसाठी जर तो तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत असल्यास वेळ मिळाल्यास महिन्या-दोन महिन्यातून त्यांची भेट घेत त्यांच्याकडे मुलाच्या अभ्यासाबद्दल अवश्य चौकशी करा. तयारीच्या या कालावधीत आपल्या पाल्याला निराशा येणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.
या वयात इतर अनेक गोष्टी युवावर्गाला आकर्षति करत असतात, अशा गोष्टींच्या आहारी जात आपला पाल्य ध्येयापासून भरकटणार नाही, यासाठी पालकांनी सजग राहायला हवे. तसेच आपल्या पाल्यावर अवास्तव अपेक्षेचे ओझेही ठेवू नये. त्याला मनापासून या परीक्षेसाठी तयारी करू द्या.
काही गोष्टी आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात विद्याथ्यार्र्ना कळत नसतात. त्यांना आपल्या ध्येयापासून भरकटू न देणे, नैराश्येचा कालावधीत त्यांच्यासोबत पालकांनी ठामपणे उभे राहायला हवे. स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करताना- विशेषत: यूपीएससी परीक्षेची तयारी करताना कधी कधी खूप अभ्यास करूनही यश लवकर मिळत नाही. कधी कधी दोन-तीन प्रयत्नांनंतरही यश मिळत नाही, अशा वेळी या परीक्षेचा नाद सोडून देत आपल्या पाल्याने एखादी छोटी-मोठी नोकरी करावी, असे बहुतांशी पालकांना वाटते. त्यांचा विचार पूर्णपणे चुकीचा आहे, असे नाही, मात्र पहिल्या प्रयत्नात विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केलेला असतो, त्याचा उपयोग पुढच्या प्रयत्नात होणारच असतो. यश विद्यार्थ्यांच्या अगदी निकट असते आणि अशा वेळी पालकवर्ग आपल्या पाल्यांना हा अभ्यास सोडून देत त्याने नोकरी करावी, यासाठी दबाव टाकीत असतो. सरतेशेवटी कंटाळून तो विद्यार्थी येईल त्या परीक्षेचा फॉर्म भरत सुटतो. ज्याला आय.ए.एस. व्हावयाचे होते व ते होण्याची ज्याची क्षमता होती तो बँॅकेतील कारकुनाची एखादी परीक्षा पास होतो, अनिच्छेने घरच्यांच्या दबावापोटी व वाढणाऱ्या वयाकडे पाहून तो ती नोकरी स्वीकारतो. आयुष्यभर जे करावयाचे नव्हते ते करत बसतो आणि दु:खी होतो. म्हणून पालकांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, कधी कधी या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वेळ लागतो, तयारी करताना तो निराश होऊ शकतो, त्या वेळी त्याच्या पंखांना बळ देण्याचे काम पालकांचेच असते.
स्पर्धापरीक्षेची तयारी आणि महाविद्यालयाची भूमिका
बारावीनंतर जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येतात, तेव्हा कॉलेजच्या मुक्त वातावरणात त्यांच्या सुप्त गुणांचा विकास होण्याच्या या काळात बऱ्याचदा मुलांचा रस्ता चुकण्याची शक्यता अधिक असते. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर लेक्चर्स बंक करणे हा अलिखित नियम झालेला असतो. जेव्हा कॉलेज संपत येते, तेव्हा लक्षात येते की, आपण चांगल्या भविष्यासाठी स्पर्धापरीक्षेची तयारी करावयास हवी, त्यात एखाद्या यशस्वी उमेदवाराची मुलाखत वाचून आपण जास्तच प्रभावित होतो, पुस्तकांच्या दुकानात जातो, पुस्तक घेऊन येतो आणि अभ्यासाला सुरुवात करतो, अभ्यासासाठी सवय कधीच सुटलेली असते, अर्धा तासात पाठ दुखायला लागते. सर्व शक्ती एकवटून अभ्यासाला सुरुवात करतो. स्पर्धापरीक्षा समजून घ्यायला पुढची दोन वर्षे निघून जातात. अगदी गणिताच्या भाषेत बोलावयाचे झाल्यास पुढचे पाच वर्षे निघून जातात. वाढलेले वय, आपण काही करावे यासाठी पालकांकडून वाढणारा दबाव, यात भरकटलेला विद्यार्थी अजून भरकटत जातो, ही कहाणी काही एका विद्यार्थ्यांची नाही, ही महाराष्ट्रातल्या खूप विद्यार्थ्यांची आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर इ. शहरांचा विचार बाजूला ठेवला तर उर्वरित महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची वाट अधिकच बिकट बनली आहे.
स्पर्धा परीक्षेत विशेषत: संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी म्हणजे आयएएस, आयपीएस होण्याची क्षमता मराठी तरुणांमध्ये पुरेपूर आहे आणि एम.पी.एस.सी. किंवा यू.पी.एस.सी. या परीक्षेचा अभ्यासक्रम सारखा झाल्यानंतर तर परिस्थिती अधिकच अनुकूल झाली आहे.
मात्र खेदाची गोष्ट ही आहे की, कॉलेजच्या तीन-चार वर्षांच्या दरम्यान जी तयारी व्हायला हवी ती होत नाही. यू.पी.एस.सी किंवा एम.पी.एस.सी परीक्षेच्या तयारीसाठी ही तीन वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात आणि त्यांचा योग्य प्रकारे वापर व्हावा.
या परीक्षेसाठी लागणारा अभ्यास म्हणजे इतिहास, भूगोल, भारतीय संविधान, विज्ञान, अर्थशास्त्र यांचा अभ्यास अत्यंत सविस्तरपणे महाविद्यालयांमध्ये होऊ शकतो. महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग वेगवेगळ्या विषयांत पारंगत असतात, आपण त्यांची मदत घ्यायला हवी. महाविद्यालयामधील अभ्यासिकेत पुस्तकांचा वापर आपण करायला हवा. या परीक्षेसाठी लागणारी मदत कॉलेजमध्ये उपलब्ध होऊ शकते. विद्यार्थी ती मदत लक्षात घेत नाहीत.
महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात-
१) कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून म्हणजे पदवीच्या प्रथम वर्षांपासूनच अभ्यासाला सुरुवात करावी म्हणजे आगामी तीन – चार वर्षांत यूपीएससीची तयारी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते.
२) यूपीएससी व एमपीएससी परीक्षेच्या पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित अभ्यासून समजला नाही तर तज्ज्ञांकडून समजून घेऊन या अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक संबंधित विषयांच्या प्राध्यापकांकडून समजून घ्यावा, ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमासंबंधीच्या पूरक पुस्तकांचे वाचन करावे.
३) या कालावधीत इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करावा. संपूर्ण यूपीएससी परीक्षा जरी मराठीत देता येत असली तरी इंग्रजीचे महत्त्व कमी होत नाही. निवड झाल्यानंतर प्रशासकीय कामात अनेकदा इंग्रजीचा संबंध येणारच असतो, याशिवाय यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत काही उतारे फक्त इंग्रजीमध्ये असतात व मुख्य परीक्षेत ३०० गुणांचा एक इंग्रजीचा पेपर लिहावाच लागतो, जरी त्या गुणांचा वापर अंतिम यादीसाठी केला जात नसला तरी त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. उत्तीर्ण झालो नाही तर इतर पेपर तपासले जात नाहीत म्हणजे आपण परीक्षेत अपयशी ठरतो. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षांपासून जर आपण इंग्रजीच्या तयारीला प्राधान्य दिले, तर तीन वर्षांत इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकतो. ही गोष्ट विशेषत: ग्रामीण भागांतून या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी.
४) संघ लोकसेवा आयोगाच्या तसेच इतर स्पर्धापरीक्षेसाठी गणित हा घटक महत्त्वाचा आहे. यूपीएससीच्या प्रारंभिक परीक्षेसाठी सी सॅटचा जो दुसरा पेपर आहे, त्यात गणिताचा हा घटक येतो, जरी हा पेपर फक्त गणितावरच आधारित नसला तरी ज्या विद्यार्थ्यांची गणितावर पकड घट्ट असते, त्यांना हा पेपर सोडवताना अडचण होत नाही व त्यांना या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळून, मुख्य परीक्षेसाठीचा मार्ग सोपा होतो. कॉलेजच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षांपासूनच या घटकाच्या तयारीला सुरुवात करावी, म्हणजे या घटकाच्या तयारीला जास्त वेळ देता येतो, शिवाय महाविद्यालयामधील प्राध्यापकांचीही यासाठी मदत होऊ शकते. एवढय़ा दोन-तीन वर्षांच्या काळात तयारी अशा प्रकारे होऊन जाईल की, कोणताही प्रश्न कसाही आणि कितीही अवघड आला तरी आपण आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो.
५) यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वसामान्य प्रश्न असतो की, अभ्यासाला कुठपासून सुरुवात करावी? याचे उत्तर म्हणजे- ‘एनसीइआरटी’ची इ. पाचवी ते दहावीपर्यंतची सर्व विषयांची पुस्तके सविस्तर वाचावीत. विद्यार्थी पदवी घेऊन आलेला असतो, मात्र या परीक्षेसाठी लागणारा त्याचा पाया कमकुवत असतो, म्हणून या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक असते. पदवी घेतल्यानंतर या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा पदवीचे शिक्षण घेत असतानाच ही पुस्तके वाचली असतील, त्यातील मुलभूत संकल्पना समजून घेतल्या असतील तर पुढचा अभ्यास करणे जास्त सोपे होते.
कॉलेजमध्ये असतानाच इतिहास, भूगोल, भारतीय संविधान, अर्थशास्त्राच्या मुलभूत संकल्पना यांचा अभ्यास करावा. जमल्यास त्यांच्या नोट्स तयार करून ठेवाव्यात.
शाळा-कॉलेजपासूनच स्पर्धापरीक्षेची तयारी करावी याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटू लागले आहे. महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये शिकविणारा प्राध्यापकवर्ग तज्ज्ञ आहे, मात्र या परीक्षेबाबत थोडी माहिती कमी असल्याने अभ्यासक्रम व स्पर्धापरीक्षेची तयारी याचा मेळ घालताना काही त्रुटी दिसून येतात. योग्य नियोजनाने त्या टाळता येऊ शकतात. महाराष्ट्रातील काही विद्यापीठांनीदेखील प्रत्येक महाविद्यालयात स्पर्धापरीक्षेची तयारी करून घेण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. त्या विभागावर आणखी चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन व गरज पडल्यास त्यासाठी या परीक्षेची माहिती असणाऱ्या तज्ज्ञांकडून मदत घेतल्यास हा विभाग प्रभावीपणे कामगिरी करू शकतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी कॉलेजमध्ये असताना पूर्ण होते आणि अशा विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक जगात यश मिळवणे अधिक सोपे जाऊ शकते.
या सर्व प्रक्रियेत प्राध्यापकवर्गाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. आगामी काळात हा सकारात्मक बदल झाल्यास कमी वयात या परीक्षेत यश मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच वाढेल.
- NCERT पुस्तके (NCERT Books):
इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतची NCERTची पुस्तके वाचा. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थव्यवस्था आणि विज्ञान या विषयांवर लक्ष केंद्रित करा.
- Current Affairs (चालू घडामोडी):
रोज वर्तमानपत्रे (The Hindu, Loksatta) आणि मासिके (Yojana, Kurukshetra) वाचा. NewsOnAir ॲप वापरा.
NewsOnAir - Syllabus (अभ्यासक्रम):
UPSC चा अभ्यासक्रम (Syllabus) व्यवस्थित समजून घ्या.
UPSC Official Website
- आवडीचा विषय:
तुमच्या आवडीचा आणि ज्यात तुम्हाला जास्त गुण मिळवण्याची शक्यता आहे असा विषय निवडा.
- मार्गदर्शक:
विषय निवडताना तुमच्या शिक्षकांशी किंवा मार्गदर्शकांशी चर्चा करा.
- वेळापत्रक (Time Table):
अभ्यासासाठी एक निश्चित वेळापत्रक तयार करा आणि त्याचे पालन करा.
- नोट्स (Notes):
प्रत्येक विषयाची स्वतःच्या भाषेत नोट्स तयार करा.
- उजळणी (Revision):
नियमितपणे उजळणी करा, जेणेकरून माहिती लक्षात राहील.
- मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका (Previous Year Question Papers):
मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा, ज्यामुळे परीक्षेच्या स्वरूपाची कल्पना येईल.
UPSC Previous Year Question Papers - टेस्ट सिरीज (Test Series):
टेस्ट सिरीज जॉईन करा आणि नियमितपणे परीक्षा द्या, ज्यामुळे वेळेचे व्यवस्थापन शिकता येईल.
- संदर्भ साहित्य (Reference Material):
मराठीमध्ये उपलब्ध असलेली संदर्भ पुस्तके आणि साहित्य वापरा.
- भाषांतर (Translation):
इंग्रजीतील महत्वाचे लेख आणि माहिती मराठीमध्ये भाषांतरित करा.
- ऑनलाईन संसाधने (Online Resources):
मराठीतील ऑनलाईन संसाधने आणि शैक्षणिक वेबसाईटचा वापर करा.
- सकारात्मक दृष्टिकोन (Positive Attitude):
सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि नियमितपणे अभ्यास करा.
- मार्गदर्शन (Guidance):
मार्गदर्शकांशी आणि यशस्वी लोकांबरोबर संपर्क ठेवा.
- विश्रांती (Rest):
पुरेशी विश्रांती घ्या आणि शारीरिक व मानसिक आरोग्य जपा.
- गट चर्चा (Group Discussion):
मित्रांसोबत किंवा अभ्यास गटांसोबत विषयांवर चर्चा करा.
- मॉक इंटरव्ह्यू (Mock Interview):
मुलाखतीची तयारी करण्यासाठी मॉक इंटरव्ह्यू द्या.
- लेखन सराव (Writing Practice):
नियमितपणे लेखन सराव करा, ज्यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळवता येतील.