हिंदु धर्म व्यवस्थापन हिंदू धर्म धर्म

हिंदू धर्माची स्थापना कोणी केली?

2 उत्तरे
2 answers

हिंदू धर्माची स्थापना कोणी केली?

19

हिंदू धर्माची स्थापना नेमकी किती वर्षांपूर्वी झाली, हे समजणे अवघड आहे. पण जगातील सर्वात जुना धर्म म्हणून हिंदू धर्माची महती सर्वत्र गायली जाते. या धर्माची स्थापना आणि उभारणी अतिशय विचारपूर्वक आणि सर्व बाबी ध्यानात घेऊन केली आहे, हे निश्चित. या धर्माच्या रचनेत मानसिक, वैचारिक, आध्यात्मिक भव्यता आणि विशालता सामावली आहे, ऐहिक जीवन सुखकर व्हावे आणि ते तसे होत असतानाच पारलौकिक कल्याण साधले जावे, असा दोन्ही बाजूंचा विचार हिंदू धर्माच्या रचनेत आणि योजनेत एकत्रितपणे गुंफला गेला आहे. या धर्माच्या उज्वल पार्श्वभूमीचा आणि त्यातील वैचारिक आध्यात्मिक उत्तुंगतेचा मागोवा ज्योतिर्भस्कर जयंत साळगावकर यांनी 'धर्मबोध'मध्ये घेतला आहे.
काही प्रथा परंपरांना अंधश्रद्घा म्हणवून त्या पाळणाऱ्यांना अनेकदा मूर्खात काढले जाते, मात्र त्यांच्यामागे कोणती कारणं आहेत आणि पूर्वजांनी त्या प्रथा रुढ करण्यामागे कोणता विचार केला होता, याचे विश्लेषण साळगावकर यांनी येथे केले आहे. समाजातील एका विशिष्ट वर्गाच्या विचारसरणीने हिंदू धर्माची कशा प्रकारे हानी केली, हे साळगावकर यांनी मांडले आहे. धर्माचा उगम आणि विकास, संस्कृतीची निमिर्ती, हिंदू धर्माचे वैशिष्ट्य काय, सुधारणांची कशा प्रकारे गरज आहे, जुन्या आचारांमागेही वैज्ञानिक दृष्टिकोन कशा प्रकारे होते, धर्माचा पुनविर्चार होणे ही कशी काळाची गरज आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

हिंदू धर्माने 'वसुधैव कुटुंबकम्' अशी इच्छा बाळगली आणि 'कृण्वन्तो विश्वमार्यम्' हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवले, त्यामुळेच इतर धर्मांमध्ये आढळणारा कडवटपणा हिंदू धर्मात आढळत नाही असे साळगावकर म्हणतात. हिंदू धर्मातील १६ संस्कारांची माहितीही त्यांनी दिली आहे. बारा मराठी महिने, या महिन्यांचे वैशिष्ट्य, त्या महिन्यात येणारे उत्सव आणि मासव्रते यांची सखोल माहितीही त्यांनी दिली आहे. हिंदू धर्माची सखोल माहिती करून घ्यायची असेल आणि त्याचे अंधानुकरण टाळायचे असेल, तर हा ग्रंथ वाचणे नक्कीच उपयुक्त ठरेल.
                                   धन्यवाद सर,







उत्तर लिहिले · 17/9/2017
कर्म · 44255
0

हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे.

या धर्माची स्थापना कोणी केली हे निश्चितपणे सांगता येत नाही, कारण हा धर्म कोणत्याही एका व्यक्तीने किंवा घटनेने स्थापन झालेला नाही.

हिंदू धर्म हा हजारो वर्षांच्या काळात हळूहळू विकसित झाला आहे.

वेद, उपनिषदे, पुराणे आणि इतर धार्मिक ग्रंथांमधून या धर्माची शिकवण आणि विचार पुढे आले आहेत.

त्यामुळे, हिंदू धर्माचा कोणताही एक संस्थापक नाही.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5140

Related Questions

आई दिनांक 25/11/25 मंगळवार संधयाकाळी 8.45 रोजी मयत झाली तो दिवस हिंदू धर्म शास्त्रानुसार मृतात्म्यासाठी व कुटुंबासाठी कसा होता त्याची माहिती मिळेल का?
शिव व शंकर?
हिंदु म्हणजे काय❓?
गणपतीच्या कुटुंबाची माहिती?
ब्रह्म लोक काय आहे?
कलियुगाची किती वर्षे शिल्लक आहेत?
तुमच्या प्रक्रियेमुळे हिंदूला काय करावे लागते?