अध्यात्म हिंदू धर्म धर्म

कलियुगाची किती वर्षे शिल्लक आहेत?

2 उत्तरे
2 answers

कलियुगाची किती वर्षे शिल्लक आहेत?

0
कलियुगाची किती वर्षे सरली? विष्णुपुराण सांगते...

भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे हिंदू नववर्षाला आरंभ झाला आहे. शालिवाहन शके १९४२ सुरू झाले असून, यंदाचे संवत्सरनाम शार्वरी आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. भारत हा देश पौराणिक कथा, ऐतिहासिक वास्तू, चैतन्यमय परंपरा, प्राचीन संस्कृती, पुरोगामी विचार यांसह विविधतेत एकता असलेला देश आहे. हिंदू धर्म आणि संस्कृती यांना भारतात खूप महत्त्व आहे. आपल्याकडे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी चार युगे मानली गेली आहेत. आपल्याकडे चार वेद, अठरा पुराणे सर्वश्रेष्ठ मानली गेली आहेत. सध्या कलियुग सुरू आहे. कलियुग नेमके किती वर्षाचे आहे? त्याची किती वर्षे सरली आहेत? विष्णुपुराणात याबाबत काय उल्लेख आढळतो? जाणून घेऊया.

कलियुगाची 'इतकी' वर्षे सरली


महाभारतानंतर श्रीकृष्णाने काही काळ द्वारकेत व्यतित केला. श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर कलियुगाला प्रारंभ झाला, असे सांगितले जाते. कलियुगाच्या एकूण वर्षे ४ लक्ष ३२ हजार मानली गेली आहेत. यापैकी ५ हजार १२१ वर्षे संपली असून, ४ लक्ष २६ हजार ८७९ वर्षे शिल्लक आहेत, असा उल्लेख यावर्षीच्या पंचांगात आढळतो. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुगात माणसे शेकडो वर्षे जगत असत. मात्र, कलियुगात माणसाचे सरासरी आयुर्मान ७० ते ८० वर्षे झाले आहे. कलियुगाची वर्षे सरतील, तसे माणसाचे आयुषमान घटत जाईल, असे विष्णुपुराण सांगते. कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात माणसाचे आयुर्मान २० वर्षांचे असेल, असे सांगितले जाते.
उत्तर लिहिले · 31/1/2023
कर्म · 9415
0

कलियुगाची एकूण लांबी ४,३२,००० वर्षे आहे.

आतापर्यंत ५,१२५ वर्षे पूर्ण झाली आहेत (२०२४ पर्यंत).

म्हणून, कलियुगाची अजून ४,२६,८७५ वर्षे शिल्लक आहेत.

टीप: ही माहिती विविध धार्मिक ग्रंथांवर आधारित आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1820

Related Questions

शिव व शंकर?
हिंदु म्हणजे काय❓?
गणपतीच्या कुटुंबाची माहिती?
ब्रह्म लोक काय आहे?
तुमच्या प्रक्रियेमुळे हिंदूला काय करावे लागते?
प्रतमनाथ हे कोणत्या देवाचे नाव आहे?
रामचंद्र प्रभु या देवाचे आडनाव काय आहे?