2 उत्तरे
2
answers
यकृताचा आजार म्हणजे काय?
3
Answer link
यकृत आजार अनेक प्रकारचे आहेत हे आपण मागील लेखात पाहिलं. यातील दोन महत्त्वाचे आजार म्हणजे यकृत विद्रधी अर्थात Liver Cirrhosis आणि यकृताचा कर्करोग अर्थात Liver Cancer. यकृत विद्रधी (Liver Cirrhosis) म्हणजे यकृतामध्ये वारंवार होणाऱ्या ईजांमुळे रचनात्मक बदल होऊन ते घट्ट आणि लहान होणं. यकृतातील या बदलांचा त्याच्या कार्यावर परिणाम होतो तसंच ते लहान झाल्याने त्याच्याकडे रक्त होऊन येणाऱ्या Portal Vein या नीलेतील दाब वाढतो. एकदा अशा प्रकारे यकृत लहान झालं की ते पूर्ववत होऊ शकत नाही म्हणूनच या स्थितीस ‘अंत्यस्थिती यकृत आजार’ (End Stage Liver Disease) असं मानलं जातं. हिपेटायटीस 'बी' आणि 'सी' विषाणूच्या लागणीमुळे, दारूमुळे तसंच लठ्ठपणा यकृत विद्रधी होते हे आपण मागील लेखात बघितलं. या व्यतिरिक्त यकृतातील तांब्याचे प्रमाण वाढून होणारा Willson's disease, लोहाचं प्रमाण वाढून होणारा Hemosiderosis किंवा पिक्त साठून होणारे Biliary Cirrhosis अशा अनेक कारणाने यकृत विद्रधी होते. भारतामध्ये विशिष्ट कारणांमुळे Indian Childhood Cirrhosis नावाचा आजार लहान वयात होतो. कधी-कधी शरीरातील प्रतिकार संस्था यकृताविरुद्ध कार्य करते त्यातून 'Autoimmune Hepatitis' नावाचा आजार होतो व कालांतराने यकृत खराब होते. कधी-कधी तपासण्याअंती कुठलंच कारण सापडत नाही. यकृत मात्र खराब होतं. त्यास cryptogenic cirrhosis असं मानलं जातं. सर्वसाधारणपणे सुदृढ व्यक्ती यकृताचा २० ते २५ टक्के वापर करतो म्हणूनच यकृतास होणारे आजार लवकर लक्षात येत नाहीत. यकृत विद्रधी होण्यास खूप मोठा कालावधी लागतो. सुरुवातीच्या काळात कुठलीच लक्षणं दिसत नाहीत. काहीजणांमध्ये अशक्तपणा येणं, नेहमीच्या कामांमध्ये लवकर थकवा येणं ही लक्ंणे दिसू लागतात. सुरुवातीच्या काळात पोटाची तपासणी केल्यास यकृतावर सूज आल्याचं निष्पन्न होतं. नंतर मात्र यकृत छोटं होऊन ते तपासल्यावर हाताला लागेनासं होतं. कावीळ हे यकृत आजाराचं मुख्य लक्षण असतं. पिक्तामध्ये असणाऱ्या बिलीरुबीन नावाच्या घटकामुळे शरीराचे विविध भाग पिवळे दिसायला लागतात, त्यालाच आपण ‘कावीळ’ असं म्हणतो. डोळ्यातील बुबूळ तपासून कावीळ आहे की नाही हे बघितलं जातं. बिलीरुबीनचं प्रमाण जसं वाढतं तसं डोळे, त्वचा, जीभ, तोंडाचं आतलं आवरण (mucosa) पिवळा पडायला लागतात. बिलीरुबीनमुळे अंगाला खाज सुटते त्यामुळे शरीरावर खाजवल्याचे व्रण दिसायला लागतात. विद्रधीमध्ये Portal Vein या नसेतील दाब वाढतो त्यामुळे शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी जसे अन्ननलिकेचा छातीतील भाग, नाभीच्या आजुबाजूचा भाग, गुद्दवारातील रक्तवाहिन्या इ. फुगायला लागतात. त्यातूनच पुढे रक्ताची उलटी होणं तसंच संडासवाटे रक्तस्राव होणं ही लक्षणं दिसायला लागतात. यकृत खराब झाल्याने प्रथिन उत्पादनाचं काम बंद होतं. Albumineचे शरीरातील प्रमाण कमी व्हायला लागतं. त्यामुळे शरीरावर सूज येणं, पोटामध्ये व छातीमध्ये पाणी जमणं इ. लक्षणं दिसायला लागतात. पोटातील पाण्यामध्ये जंतूचा प्रादुर्भाव होऊन पोट दुखायला लागतं. प्रथिन पदार्थाच्या चयापचयाच्या क्रियेत बिघाड होते व शरीरातील अमोनियाचं प्रमाण वाढतं. त्यातून बेशुद्ध होण्याचं प्रमाण वाढतं. पुरुषांमध्ये शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्याने स्तनाची वाढ होण्यास सुरुवात होते. यकृत लहान होत असताना प्लीहा (Spleen) वाढायला लागते व त्यामध्ये रक्त जमा होऊन रक्तातील पेशी नष्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे रुग्णास Anemia, Thrombocytopenia इ. समस्या निर्माण होतात. यकृत विद्रधीच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये किडनीवर परिणाम व्हायला लागतो, फुफ्फुसे खराब होऊ लागतात, प्रतिकार शक्ती कमी व्हायला लागते व कुठल्याही कारणाने रुग्णाची तब्येत ढासळून त्याचा मृत्यू होतो.
यकृत विद्रधीचे योग्य वेळी निदान करणं अत्यंत गरजेचं असतं. निदानासाठी बऱ्याच वेळी यकृताचा तुकडा काढून तपासावा लागतो. या व्यतिरिक्त बऱ्याचशा तपासण्या कराव्या लागतात व यकृत विद्रधी नेमक्या कोणत्या स्थितीत आहे यासाठी काही पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत त्यावरून रुग्णास औषधोपचार किंवा यकृत प्रत्यारोपण करायचं हे ठरवता येतं.
योग्य वेळी निदान करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास यकृत विद्रधीवर नियंत्रण ठेवता येते. परंतु काही कालावधीनंतर रुग्णास यकृत प्रत्यारोपणाची गरज पडते.
यकृत विद्रधीचे योग्य वेळी निदान करणं अत्यंत गरजेचं असतं. निदानासाठी बऱ्याच वेळी यकृताचा तुकडा काढून तपासावा लागतो. या व्यतिरिक्त बऱ्याचशा तपासण्या कराव्या लागतात व यकृत विद्रधी नेमक्या कोणत्या स्थितीत आहे यासाठी काही पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत त्यावरून रुग्णास औषधोपचार किंवा यकृत प्रत्यारोपण करायचं हे ठरवता येतं.
योग्य वेळी निदान करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास यकृत विद्रधीवर नियंत्रण ठेवता येते. परंतु काही कालावधीनंतर रुग्णास यकृत प्रत्यारोपणाची गरज पडते.
0
Answer link
यकृताचा आजार म्हणजे काय?
यकृत (Liver) हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे अन्न पचनास मदत करणे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे आणि ऊर्जा साठवणे. जेव्हा यकृताला काही इजा होते किंवा ते नीट काम करत नाही, तेव्हा त्याला यकृताचा आजार म्हणतात.
यकृताच्या आजाराची कारणे:
- संसर्ग (Infection): हिपॅटायटीस (Hepatitis) ए, बी, आणि सी सारख्या विषाणूंच्या संसर्गामुळे यकृताला सूज येऊ शकते. अधिक माहितीसाठी पहा
- जास्त मद्यपान: जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने यकृतावर चरबी जमा होते आणि ते खराब होऊ शकते.
- औषधे आणि विषारी पदार्थ: काही औषधे आणि विषारी पदार्थांमुळे यकृताला इजा होऊ शकते.
- आनुवंशिक रोग: काही आनुवंशिक रोगांमुळे यकृताचे कार्य बिघडू शकते.
- चरबीयुक्त यकृत (Fatty Liver): ज्या लोकांच्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असते, त्यांच्या यकृतावर चरबी जमा होते आणि ते खराब होऊ शकते. अधिक माहितीसाठी पहा
यकृताच्या आजाराची लक्षणे:
- थकवा येणे
- भूक न लागणे
- वजन कमी होणे
- पोटात दुखणे
- त्वचा आणि डोळे पिवळे होणे (jaundice)
- पायांवर सूज येणे
- गडद रंगाचे मूत्र येणे
- त्वचेला खाज येणे
यकृताच्या आजारांवर उपचार:
- आहार बदलणे: डॉक्टर तुम्हाला योग्य आहार घेण्यास सांगू शकतात, ज्यामुळे यकृतावरचा ताण कमी होतो.
- औषधोपचार: काही विशिष्ट यकृत रोगांवर औषधे उपलब्ध आहेत, ज्यामुळे संसर्ग कमी होतो आणि यकृताचे कार्य सुधारते.
- जीवनशैलीत बदल: मद्यपान टाळणे आणि नियमित व्यायाम करणे यकृतासाठी फायदेशीर असते.
- यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant): यकृत पूर्णपणे निकामी झाल्यास, डॉक्टरांना यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देऊ शकतात.
प्रतिबंध:
- मद्यपान टाळा.
- संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
- नियमित व्यायाम करा.
- हिपॅटायटीस (Hepatitis) ए आणि बी साठी लसीकरण करा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
यकृताच्या आजाराचे निदान आणि उपचार लवकर झाल्यास, गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. त्यामुळे, लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.