Topic icon

यकृत रोग

0

जवा (Barley) लिव्हरच्या आजारांवर काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो, कारण त्यात अनेक गुणधर्म आहेत:

  • पोषक तत्वे: जवमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे लिव्हरच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
  • अँटिऑक्सिडंट्स: जवमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे लिव्हरला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.
  • फायबर: जवमधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि लिव्हरवरील ताण कमी होतो.
  • कोलेस्ट्रॉल: जव बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे लिव्हरच्या कार्याला आधार मिळतो.

उपयोग कसा करावा:

  • जवाचे पाणी नियमित प्यावे.
  • जवाचा आहारात समावेश करावा (उदा. भाकरी, लापशी).

इतर फायदे:

  • वजन कमी करण्यास मदत करते.
  • रक्त शर्करा नियंत्रित ठेवते.

खबरदारी:

  • जवा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • ज्या लोकांना ग्लूटेनची एलर्जी आहे, त्यांनी जव टाळावे.

टीप: जव हे लिव्हरच्या आजारावर पूर्ण उपचार नाही, परंतु ते उपचारांना सहाय्यक ठरू शकते. डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

MyUpchar - Benefits of Barley Water Netmeds - Jav (Barley): Nutrition, Benefits, Uses And Recipes
उत्तर लिहिले · 8/4/2025
कर्म · 980
4
शासनाच्या महात्मा फुले योजनेतून ५ लाखापर्यंत मदत मिळते. जास्त खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत मदत मिळते. साईबाबा संस्थान, सिद्धिविनायक मंदिर, शनिशिंगणापूर देवस्थान इत्यादी संस्था आर्थिक मदत करते.
उत्तर लिहिले · 19/9/2022
कर्म · 11785
3

लिव्हर खराब होण्याचे कारण

लिव्हर बर्‍याच कारणांनी खराब होऊ शकत जसे हेरिडिटी (परिवारातील एखाद्या सदस्याकडून), विषाक्तता (एखादा केमिकल किंवा व्हायरसमुळे) किंवा जुन्या आराजामुळे जे तुमच्या लिव्हरला संपूर्ण आयुष्यभर प्रभावित करू शकतो. पोटात असलेल्या या अवयवाशिवाय तुम्ही जगू शकत नाही

लिव्हर बर्‍याच कारणांनी खराब होऊ शकत जसे हेरिडिटी (परिवारातील एखाद्या सदस्याकडून), विषाक्तता (एखादा केमिकल किंवा व्हायरसमुळे) किंवा जुन्या आराजामुळे जे तुमच्या लिव्हरला संपूर्ण आयुष्यभर प्रभावित करू शकतो. पोटात असलेल्या या अवयवाशिवाय तुम्ही जगू शकत नाही.

1. पोटावर सूज येणे

सिरोसिस लिव्हरचा एक गंभीर आजार आहे ज्यात पोटात एक द्रव्य तयार होतो (या स्थितीला अस्सिटेस म्हटले जाते) व रक्त आणि द्रव्यात प्रोटीन आणि एल्बुमिनचा स्तर राहतो. यामुळे असे वाटते की रोगी गर्भवती आहे.

2. कावीळ

जेव्हा त्वचा रंगरहित व डोळे पिवळी दिसते तेव्हा असे आढळून येते की लिव्हर खराब झाले आहे. त्वचा आणि डोळ्यांचे या प्रकारे पांढरे आणि पिवळे होणे असे दर्शवतात की रक्तात बिलीरूबिन (एक पित्त वर्णक)चा स्तर वाढला आणि याच्यामुळे शरीरातील व्यर्थ पदार्थ बाहेर निघू शकत नाही.

3. पोटात दुखणे

पोटात दुखणे, खास करून पोटाच्या उजव्या भागात बरगड्यांच्या खाली उजव्या भागात दुखणे म्हणजे लिव्हरचे खराब होण्याचे संकेत आहे.

4. मूत्रात परिवर्तन

शरीरात वाहणार्‍या रक्तात बिलीरूबिनचा स्तर वाढल्यामुळे मूत्राचा रंग पिवळा होतो, ज्याला खराब लिव्हर किडनीद्वारे बाहेर काढण्यास असमर्थ असतो.

5. त्वचेत जळजळ

त्वचेवर खाज सुटणे किंवा रेषेस (लालिमा) येणे लिव्हर खराब होण्याचे एक सामान्य लक्षण आहे कारण त्वचेत असणार्‍या द्रव्यात कमतरता येते ज्यामुळे त्वचा जाड होते आणि त्यावर खाज सुटू लागते.

6. शोचमध्ये परिवर्तन

लिव्हर खराब असल्याने शौच उत्सर्जनात फारच बदल होतो जसे कब्ज़, इरिटेबल बाऊल सिंड्रोम किंवा शौचच्या रंगात बदल, काळ्या रंगाचा शौच किंवा शोच्यामध्ये रक्त येणे.

7. जीव घाबरणे

पचनाशी निगडित समस्या जसे अपचन आणि ऍसिडिटीमुळे लिव्हर खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे उलट्या देखील होतात.

8. भूक कमी लागणे

लिव्हर खराब झाल्याने लिव्हर फेल देखील होऊ शकतो व त्यावर उपचार न केल्यास भूक कमी लागते ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागत. अशा प्रकरणात जेथे रोगी फारच अशक्त होतो आणि रक्तवाहिनीच्या माध्यमाने पोषक तत्त्व देण्यात येतात.

9. द्रव प्रतिधारण

सामान्यत: तरळ पदार्थ पाय, टाचा आणि तळव्यावर जमा होऊ लागतात. या स्थितीला ऑएडेम म्हणतात ज्यामुळे लिव्हर गंभीर रूपेण खराब होऊ शकतो. जेव्हा तुम्ही त्वचेच्या सुजलेल्या भागावर दाब देता तेव्हा तुम्ही बघाल की बोट काढल्यानंतर देखील बर्‍याच वेळेपर्यंत तो भाग दबलेला असतो.

10. थकवा

लिव्हर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा चक्कर येणे, थकवा, स्मरणशक्ती कमी होणे तथा संभ्रम (कन्फ्यूज़न) झाल्यासारखे व शेवटी कोम्यात जाणे इत्यादी समस्या होऊ शकतात.लिव्हर खराब होण्याचे कारण

लिव्हर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा चक्कर येणे, थकवा, स्मरणशक्ती कमी होणे तथा संभ्रम (कन्फ्यूज़न) झाल्यासारखे व शेवटी कोम्यात जाणे इत्यादी समस्या होऊ शकतात.
उत्तर लिहिले · 5/1/2022
कर्म · 121765
0

वसीय यकृत रोग (Fatty Liver Disease) होण्याची कारणे:

  • अल्कोहोल (दारू): जास्त प्रमाणात अल्कोहल घेतल्याने लिव्हरमध्ये चरबी जमा होते.
  • लठ्ठपणा (Obesity): जास्त वजन असल्यास फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
  • मधुमेह (Diabetes): ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरची शक्यता जास्त असते.
  • उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol): रक्तातील चरबीचे प्रमाण वाढल्यास फॅटी लिव्हर होऊ शकते.
  • उच्च रक्तदाब (High Blood Pressure): उच्च रक्तदाबामुळे देखील फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
  • अनुवंशिकता (Genetics): काही वेळा आनुवंशिकतेमुळे फॅटी लिव्हर होऊ शकते.
  • औषधे (Medications): काही औषधांच्या साइड इफेक्टमुळे फॅटी लिव्हर होऊ शकते.

अधिक माहितीसाठी:

हे सर्वसाधारण माहिती आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980
0

कावीळ 'ब' (Hepatitis B) बरी होऊ शकते, पण ते तिच्या तीव्रतेवर आणि प्रकारावर अवलंबून असते.

तीव्र कावीळ 'ब' (Acute Hepatitis B):

  • तीव्र कावीळ 'ब' मध्ये, बहुतेक प्रौढ व्यक्ती (90% पेक्षा जास्त) कोणत्याही उपचारांशिवाय पूर्णपणे बरे होतात.
  • यामध्ये, यकृत स्वतःच व्हायरस साफ करते आणि व्यक्ती पूर्णपणे ठीक होते.

जुनाट कावीळ 'ब' (Chronic Hepatitis B):

  • ज्या व्यक्तींना जुनाट कावीळ 'ब' आहे, त्यांच्या शरीरातून व्हायरस पूर्णपणे काढणे अधिक कठीण असते.
  • परंतु, औषधोपचारांनी व्हायरसची वाढ नियंत्रित करता येते आणि यकृताचे नुकसान कमी करता येते. काही प्रकरणांमध्ये, दीर्घकाळ उपचार घेतल्यास, कावीळ 'ब' पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण हे शक्यता कमी असते.

उपचार: कावीळ 'ब' च्या उपचारांसाठी अँटीव्हायरल औषधे उपलब्ध आहेत, जी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी लागतात.

अधिक माहितीसाठी: तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नियमित तपासणी करून घ्या.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980
3
यकृत आजार अनेक प्रकारचे आहेत हे आपण मागील लेखात पाहिलं. यातील दोन महत्त्वाचे आजार म्हणजे यकृत विद्रधी अर्थात Liver Cirrhosis आणि यकृताचा कर्करोग अर्थात Liver Cancer. यकृत विद्रधी (Liver Cirrhosis) म्हणजे यकृतामध्ये वारंवार होणाऱ्या ईजांमुळे रचनात्मक बदल होऊन ते घट्ट आणि लहान होणं. यकृतातील या बदलांचा त्याच्या कार्यावर परिणाम होतो तसंच ते लहान झाल्याने त्याच्याकडे रक्त होऊन येणाऱ्या Portal Vein या नीलेतील दाब वाढतो. एकदा अशा प्रकारे यकृत लहान झालं की ते पूर्ववत होऊ शकत नाही म्हणूनच या स्थितीस ‘अंत्यस्थिती यकृत आजार’ (End Stage Liver Disease) असं मानलं जातं. हिपेटायटीस 'बी' आणि 'सी' विषाणूच्या लागणीमुळे, दारूमुळे तसंच लठ्ठपणा यकृत विद्रधी होते हे आपण मागील लेखात बघितलं. या व्यतिरिक्त यकृतातील तांब्याचे प्रमाण वाढून होणारा Willson's disease, लोहाचं प्रमाण वाढून होणारा Hemosiderosis किंवा पिक्त साठून होणारे Biliary Cirrhosis अशा अनेक कारणाने यकृत विद्रधी होते. भारतामध्ये विशिष्ट कारणांमुळे Indian Childhood Cirrhosis नावाचा आजार लहान वयात होतो. कधी-कधी शरीरातील प्रतिकार संस्था यकृताविरुद्ध कार्य करते त्यातून 'Autoimmune Hepatitis' नावाचा आजार होतो व कालांतराने यकृत खराब होते. कधी-कधी तपासण्याअंती कुठलंच कारण सापडत नाही. यकृत मात्र खराब होतं. त्यास cryptogenic cirrhosis असं मानलं जातं. सर्वसाधारणपणे सुदृढ व्यक्ती यकृताचा २० ते २५ टक्के वापर करतो म्हणूनच यकृतास होणारे आजार लवकर लक्षात येत नाहीत. यकृत विद्रधी होण्यास खूप मोठा कालावधी लागतो. सुरुवातीच्या काळात कुठलीच लक्षणं दिसत नाहीत. काहीजणांमध्ये अशक्तपणा येणं, नेहमीच्या कामांमध्ये लवकर थकवा येणं ही लक्ंणे दिसू लागतात. सुरुवातीच्या काळात पोटाची तपासणी केल्यास यकृतावर सूज आल्याचं निष्पन्न होतं. नंतर मात्र यकृत छोटं होऊन ते तपासल्यावर हाताला लागेनासं होतं. कावीळ हे यकृत आजाराचं मुख्य लक्षण असतं. पिक्तामध्ये असणाऱ्या बिलीरुबीन नावाच्या घटकामुळे शरीराचे विविध भाग पिवळे दिसायला लागतात, त्यालाच आपण ‘कावीळ’ असं म्हणतो. डोळ्यातील बुबूळ तपासून कावीळ आहे की नाही हे बघितलं जातं. बिलीरुबीनचं प्रमाण जसं वाढतं तसं डोळे, त्वचा, जीभ, तोंडाचं आतलं आवरण (mucosa) पिवळा पडायला लागतात. बिलीरुबीनमुळे अंगाला खाज सुटते त्यामुळे शरीरावर खाजवल्याचे व्रण दिसायला लागतात. विद्रधीमध्ये Portal Vein या नसेतील दाब वाढतो त्यामुळे शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी जसे अन्ननलिकेचा छातीतील भाग, नाभीच्या आजुबाजूचा भाग, गुद्दवारातील रक्तवाहिन्या इ. फुगायला लागतात. त्यातूनच पुढे रक्ताची उलटी होणं तसंच संडासवाटे रक्तस्राव होणं ही लक्षणं दिसायला लागतात. यकृत खराब झाल्याने प्रथिन उत्पादनाचं काम बंद होतं. Albumineचे शरीरातील प्रमाण कमी व्हायला लागतं. त्यामुळे शरीरावर सूज येणं, पोटामध्ये व छातीमध्ये पाणी जमणं इ. लक्षणं दिसायला लागतात. पोटातील पाण्यामध्ये जंतूचा प्रादुर्भाव होऊन पोट दुखायला लागतं. प्रथिन पदार्थाच्या चयापचयाच्या क्रियेत बिघाड होते व शरीरातील अमोनियाचं प्रमाण वाढतं. त्यातून बेशुद्ध होण्याचं प्रमाण वाढतं. पुरुषांमध्ये शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्याने स्तनाची वाढ होण्यास सुरुवात होते. यकृत लहान होत असताना प्लीहा (Spleen) वाढायला लागते व त्यामध्ये रक्त जमा होऊन रक्तातील पेशी नष्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे रुग्णास Anemia, Thrombocytopenia इ. समस्या निर्माण होतात. यकृत विद्रधीच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये किडनीवर परिणाम व्हायला लागतो, फुफ्फुसे खराब होऊ लागतात, प्रतिकार शक्ती कमी व्हायला लागते व कुठल्याही कारणाने रुग्णाची तब्येत ढासळून त्याचा मृत्यू होतो.
यकृत विद्रधीचे योग्य वेळी निदान करणं अत्यंत गरजेचं असतं. निदानासाठी बऱ्याच वेळी यकृताचा तुकडा काढून तपासावा लागतो. या व्यतिरिक्त बऱ्याचशा तपासण्या कराव्या लागतात व यकृत विद्रधी नेमक्या कोणत्या स्थितीत आहे यासाठी काही पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत त्यावरून रुग्णास औषधोपचार किंवा यकृत प्रत्यारोपण करायचं हे ठरवता येतं.

योग्य वेळी निदान करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास यकृत विद्रधीवर नियंत्रण ठेवता येते. परंतु काही कालावधीनंतर रुग्णास यकृत प्रत्यारोपणाची गरज पडते.
उत्तर लिहिले · 13/9/2017
कर्म · 22090
2
कावीळ झाल्याचे समजल्यावर घरगुती औषधे घेऊन ती बरी करण्याकडे अनेकांचा कल असतो. वास्तविक असे करणे धोक्याचे असते. कारण काविळीचे वेगवेगळे प्रकार असतात. तेनीट समजून घेऊन औषधोपचार होणे गरजेचे असते.
   रुग्णांनी विश्रांती घ्यावी. आराम करावा. साधा आहार घ्यावा. यामध्ये कमी तेलाचे व पचायला सोपे असे जेवावे. शाकाहारी जेवण जेवावे. यामध्ये मऊ भात, खिचडी, फुलके, कमी तेलाच्या भाज्यांचे सेवन करावे. सोबत बी कॉम्प्लेक्स, यकृताची टॉनिक्स (Tonics) ही घ्यावीत. या आजारात यकृतातील ग्लुकोज कमी होते म्हणून ग्लुकोज पावडर घ्यावी. ऊस खावा.
हिपेटायटिस बी/सी – यामध्ये रक्ततपासणी व डीएनए याची तपासणी करून जर त्यामध्ये हिपेटायटिस अॅक्टिव्ह असेल तर अॅण्टी व्हायरल ड्रग्ज देणे आवश्यक असते. ही उपचारपद्धती खर्चीक व बराच काळ चालणारी असते म्हणून सर्वसाधारण व्यक्तीला घेणे परवडत नाही. म्हणूनचहा आजार टाळावा.
आयुर्वेदामध्ये असलेली आरोग्यवर्धिनी गुटिका ही देखील गुणकारी ठरू शकते. आयुर्वेद डॉक्टरला विचारून सल्ला घ्यावा.
   कावीळ झाली असता मद्यपान करू नये.
अवरोधक कावीळ असल्यास दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार करावा लागतो. त्यासाठी योग्य डॉक्टरकडे सल्ला घ्यावा.काविळीचे योग्य निदान व त्यावर त्वरित उपचार केल्याने बहुतांशी रुग्ण बरे होतात, पण हे सारे डॉक्टरच्या देखरेखीखाली करावे.
उत्तर लिहिले · 24/7/2017
कर्म · 210095