ब्रम्हांड खरेदी अंतराळवीर खगोलशास्त्र दुर्बीण अवकाश उपकरणे

दूरबीन टेलिस्कोप खरेदी करण्याकरिता आकाश निरीक्षणासाठी काय निकष असावेत?

2 उत्तरे
2 answers

दूरबीन टेलिस्कोप खरेदी करण्याकरिता आकाश निरीक्षणासाठी काय निकष असावेत?

4
#दुर्बीण_अर्थात_टेलिस्कोप....
   आपणांस साध्या डोळ्यानी फक्त चंन्द्र काळसर डाग असलेला गोळा दिसतो.तसेच बुध शनी शुक्र हे ग्रह कधीतरीच द्रुष्टीस पडतात.
वर्तमानपत्रात ग्रहतार्याची छान छान चित्रे पाहील्यानंतर आपणाकडेही अशी दुर्बीण हवी अशी साहजिकच इच्छा होते.जेणेकरून आपणही हवी ती वस्तू केव्हाही पाहू शकतो.परंतू दुर्बीण खरेदी करताना त्याबद्दलची पुर्ण माहीती आपणास समजेल की नाही शंका येते.दुर्बीणी साघारण अडीज हजारापासून ते लाखो रूपयापर्यत मिळतात .त्यातिल भिंगाचा आकार ,आरशाच्या व्यासावर कींमत ठरली जाते.चला तर दुर्बीणीविषयी जाणून घेउया .
     आपण पिकनिकला सोबत दुरदर्शी (बायनाकुलर)वापरतो.लांबची वस्तू जवळ दिसते.पण जशी असते तशीच दिसते.कारण त्यात प्रिझम वापरलेला असतो.त्यामुळे उलट पडणारी कीरणे सुलट केली जातात .पण आकारामुळे व भिंगामुळेही त्यावरही काही मर्यादा पडतात.त्यामुळे खुप दुरचे आॅब्जेक्ट पहाता येत नाहीत .दुर्बीणीमुळे खुप दुरच्या वस्तू पहाता येतात.कारण त्यातिल आरशे खुप मोठे असतात.साहजिकच आकार व लांबी वाढत जाते.जशी कींमत वाढते तशी तीची योग्यता ही वाढते.साधारण चार इंची दुर्बीणीतून शनिची कडी ,चंन्द्रावरील विवरे व्यवस्थितल पहाता येतात.लहान दुर्बीणीतून 3इंची थोडे लहान आकारात दिसते.आंतरवक्र आरसा जेवढा मोठा तेवढी प्रकाशकीरण जास्त प्रमाणात एकवटतात व प्रतिमा स्पष्ट दिसते.खालिल चित्रातून स्पष्ठ करण्याचा प्रयत्न करतोय.त्यामुळे दुर्बीण घेण्यापुर्वी या गोष्ठीचा विचार करणे गरजेच आहे.
      दुर्बीण घेताना पुढे त्याचा वापर कीती होईल ते पहावे लागते.कारण सुरवातिचा उत्साह ओसरुन मग ती अडगळीत पडते.जशी मोठी दुर्बीण तसतसा आकार मोठा मग निरिक्षणासाठी स्वताच्या घराची गच्ची असेल तर ठीक पण दुसर्या जागी वाहुन न्यायची असेल तर वजन दहा कीलो पासुन ते विस पंचविस कीलो पर्यत वाढते.फायदा मोठा हवा असेल तर त्रास पण सोसावा लागतो. शिवाय ठेवण्यासाठी जागा ही जास्त त्यामुळे असते.यांची बाबी लक्षात घेणे गरजेच आहे.
आता दुर्बिणी चे प्रकार या बद्दल माहीती घेउया..
#रिफ्राक्टर टाइप....या प्रकारात एक नळी ला बहीर्वर्क्र भिंग असते व दुसर्या बाजुस नेत्रिका असते .सरळ प्रकाश पडुन आपणास प्रतिमा उलटी दिसत असते.यांची कींमत इतर प्रकारा पेक्षा जास्त असते .तशी गुणवत्ता ही कमालची असते.बायनाकुलर मधिल प्रीझम काढला तर जशी प्रतिमा मिळते तशी या प्रकारात प्रतिमा मिळते.लाबीला जरा जास्त असते.
    #रिप्लेक्टर.....या प्रकारात थोडीशी रचना वेगळी असते.खालच्या बाजुस आंतरवक्र आरसा लाउन प्रकाश कीरण वरच्या बाजुस ४५अंशावर लावलेल्या आरश्यातून परावर्तित करून नेत्रीकेला पाठवले जातात.या प्रकारातिल दुर्बीणी स्वस्त असतात.नळीचा व्यास मोठा असतो.
#कॅटाडीओपट्रीक_टाईप .....या दुर्बिणी लहान असतात
.नेण्यासाठी सुटसुटीत असतात.तसेच त्याला कॅमेरा अॅटेच करू शकतो.ईतरही दुर्बिणीत ती सोय होत आहे.दिशा सेट करण्यासाठी लेझर पाईन्ट असतो.मोटर बेस माउंट असतो जेणे करून रिमोटच्या साह्याने खाली वर करू शकतो.
या शिवाय अनेक बदल केलेल्या दुर्बीणी मिळतात.भिंगाचा आकार मोठा तसेच कमी अधिक फोगल लेन्थ (नाभिय अंतर )प्रकाश कीरण जिथे एकवटात तिथपर्यतचे अंतर ,तसेच झुमिंग पाॅवर या सर्व बाबीवरून आकार व कींमत ठरते.
आपण निरभ्र आकाशात अनेक गोष्टी पाहू शकतो.प्रोफेशनल महागड्या दुर्बीणीतून पाहीलेले तारे घरी कमी कीमतीच्या दुर्बीणीतून पाहीललेे तारे खुप फरक जाणवतो .
मुंबईत तेजराज आणि कंपनी ,विल्सन काॅलेज समोर घाटकोपर येथे गॅलिलिओ अशी एक दोन ठीकाणी दुकाने आहेत .तेजराज कंपनीचे मालक राजू पटेल हे पंचविस तिस पुरस्कारानी सन्मानित आहेत.खुप चांगल्या प्रकारची माहीती देतात .हवी तशी दुर्बीण पण बनवुन देतात.नविन शिकण्यासाठी आलेल्याना योग्य मार्गदर्शन करतात.ठाणे बदलापुरला स्कायवाचर कंपनी दुर्बीणी बनवते .ओरीयन ,ब्रेझर,स्कायवाॅचर,नॅशनल जिवोग्राफीक,क्लिस्टरन,इत्यादी कंपन्या दुर्बीणी बनवतात. आॅनलाईन दुर्बीण घेणे यात फसगत होण्याची शक्यता असते.सायन येथिल खगोल मंडळ ही संस्था प्रशिक्षण वर्ग व आकाश निरिक्षन वर्ग दर महीन्याला नेरळ व बदलापुर येथे महीन्यातून एकदा शनिवार व रविवार मधली रात्र यामधे भरवतात .आॅन लाईन बुकींग होते.
   शेवटी दुर्बीण म्हणजे पैशाची अन वेळेची मोठी गुतवणूक आहे .छंद म्हणून जोपासायला हरकत नसावी......
उत्तर लिहिले · 9/10/2017
कर्म · 20545
0

दूरबीन टेलिस्कोप खरेदी करताना आकाश निरीक्षणासाठी खालील निकष असावेत:

1. प्रकार (Type):
  • अपवर्तक (Refractor): हे टेलिस्कोप लेन्स वापरून प्रतिमा तयार करतात. ते अधिक टिकाऊ असतात आणि कमी देखभालीची आवश्यकता असते.
  • परावर्तक (Reflector): हे टेलिस्कोप आरसा वापरून प्रतिमा तयार करतात. ते मोठ्या छिद्रांसाठी (Aperture) अधिक परवडणारे असतात.
  • कॅटाडियोप्ट्रिक (Catadioptric): हे लेन्स आणि आरसे दोन्ही वापरतात, ज्यामुळे ते कॉम्पॅक्ट आणि बहुमुखी ठरतात.
2. छिद्र (Aperture):

छिद्र म्हणजे टेलिस्कोपच्या लेन्स किंवा आरशाचा व्यास. छिद्र जितके मोठे तितकी जास्त प्रकाश गोळा करण्याची क्षमता आणि प्रतिमा अधिक स्पष्ट दिसण्याची शक्यता असते.

3. फोकल लेंथ (Focal Length):

फोकल लेंथ म्हणजे लेन्स किंवा आरसा किती अंतरावर प्रकाश केंद्रित करतो. जास्त फोकल लेंथ असलेले टेलिस्कोप उच्चMagnification देतात.

4. माउंट (Mount):
  • Alt-Azimuth Mount: हे mount वर-खाली (altitude) आणि डावी-उजवीकडे (azimuth) फिरू शकते. हे वापरण्यास सोपे आहे, पण खगोलीय वस्तूंचा मागोवा घेण्यासाठी योग्य नाही.
  • Equatorial Mount: हे पृथ्वीच्या ঘূর্ণनानुसार adjust होते, ज्यामुळे खगोलीय वस्तूंचा मागोवा घेणे सोपे होते.
5. मैग्निफिकेशन (Magnification):

मैग्निफिकेशन म्हणजे वस्तू किती मोठी दिसते. हे टेलिस्कोपच्या फोकल लेंथला आयपीसच्या फोकल लेंथने भागून काढले जाते. खूप जास्त मैग्निफिकेशन वापरल्यास प्रतिमा अस्पष्ट दिसू शकते.

6. पोर्टेबिलिटी (Portability):

जर तुम्हाला टेलिस्कोप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा असेल, तर तो हलका आणि कॉम्पॅक्ट असावा.

7. इतर ॲक्सेसरीज (Accessories):

Bag, Barlow lenses (magnification वाढवण्यासाठी), filters (contrast सुधारण्यासाठी) आणि star charts.

8. बजेट (Budget):

तुमचे बजेट निश्चित करा आणि त्यानुसार चांगले टेलिस्कोप शोधा.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1820

Related Questions

मध्यरात्र कशाला म्हणतात?
भारतातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कोठे आहे?
आपल्याकडे रात्री आकाशात दिसणारा ध्रुव तारा दक्षिण गोलार्धातही दिसतो का?
नैसर्गिक क्रिस्टल म्हणजे काय?
धूमकेतू ला इंग्रजीत काय म्हणतात?
नेपच्यून ग्रह आहे का?
प्लुटो ग्रह आहे का?