संस्कृती मंदिर देव रूढी परंपरा गणेशोत्सव

पुण्यातील मानाचे गणपती म्हणजे काय?

4 उत्तरे
4 answers

पुण्यातील मानाचे गणपती म्हणजे काय?

11
पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहा साजरा केला जातो कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते. तेच हे मानाचे गणपती आहेत. पुण्यातील भव्यदिव्य विसर्जन मिरवणूकीत या पाच मानाच्या गणपतींचा आधी मान असतो. म्हणजे हे मानाचे गणपती पुढे गेल्यावरच मग बाकीची मंडळे त्यांचे गणपती लाईनमध्ये आणतात. 
मानाचा पहिला गणपती - श्री कसबा गणपती
मानाचा दुसरा गणपती - श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
मानाचा तिसरा गणपती - श्री गुरुजी तालीम गणपती
मानाचा चौथा गणपती - श्री तुळशीबाग गणपती
मानाचा पाचवा गणपती - श्री केसरी गणपती
सविस्तर माहिती वाचा.
मानाचे गणपती पुणे
उत्तर लिहिले · 6/9/2017
कर्म · 20855
3
📣 *जाणून घ्या पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि त्यांचं महत्त्व*


🕹 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. टिळकांनी पुण्यातूनच या सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाचे अतिशय महत्त्व आहे. यामध्ये मानाचे पाच गणपती, दगडूशेठ, मंडई, बाबूगेनू असे नवसाला पावणारे गणपती यांना विशेष मानले जाते. गणपतीच्या १० दिवसांच्या काळात लोक बाहेरगावहून या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी येतात. काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरुप बदलले असले तरीही पुण्यातील मानाच्या गणपतीचे महत्त्व आजही तितकेच आहे. जाणून घेऊया याच गणपतींविषयी…

*1)* *कसबा गणपती –*
👉 कसबा गणपती हा पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. कसबा पेठेत असणारा हा गणपती पेशवेकालीन असून त्याचे मंदिर शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती साडेतीन फूट उंचीची आहे. आधी ती खूप लहान होती मात्र शेंदूर लेपून ती मोठी करण्यात आली आहे. हे मंदिर शिवाजीच्या काळातील आहे असे म्हटले जाते. १६३६ मध्ये शहाजी राजांनी लालमहाल बांधला त्यावेळी त्याच्याच बाजूला जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. पारंपारिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल-ताशांच्या गजरात लक्ष्मी रोडवरुन या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

*2)* *तांबडी जोगेश्वरी -*
👉 बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. मानाच्या गणपतींचे आणि पुण्यातील इतरही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही. मात्र या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि त्यानंतर दरवर्षी नव्या मूर्तीची स्थापना होते.

*3)* *गुरुजी तालिम गणपती –*
👉 या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली अशी आहे. याठिकाणी असलेल्या एका तालमीमध्ये हा गणपती बसविण्यास सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. आता तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला १८८७ मध्ये म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होण्याच्या आधीच सुरुवात झाली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.

*4)* *तुळशीबाग गणपती –*
👉 तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. तुळशीबाग या खरेदीच्या ठिकाणी मध्यभागी याची स्थापना होते. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करायचे आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हे काम करतो.

*5)* *केसरी वाडा गणपती –*
👉 पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती म्हणून याची ओळख आहे. केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रोडवरुन जाते. मात्र केसरी वाड्याचा गणपती केळकर रोडवरुन जाऊन विसर्जित होतो.
उत्तर लिहिले · 26/8/2019
कर्म · 569245
0

पुण्यातील मानाचे गणपती म्हणजे पुण्यातील गणेशोत्सवात ज्या गणपती मंडळांना विशेष महत्त्व आहे आणि ज्यांच्या मूर्तींची स्थापना परंपरेनुसार विशिष्ट क्रमाने केली जाते, असे गणपती.

पुण्यातील मानाच्या गणपतींची क्रमवार नावे:

  1. कसबा गणपती:

    हे पुण्यातील ग्रामदैवत आहे. शिवाजी महाराजांनी या गणपतीची स्थापना केली, असा समज आहे.

  2. तांबडी जोगेश्वरी गणपती:

    ही पुण्यातील दुसरी मानाची मूर्ती आहे. तांबडी जोगेश्वरी ही पुण्यातील एक प्रमुख देवी आहे आणि या गणपतीची स्थापना मंडळाने केली आहे.

  3. गुरुजी तालीम गणपती:

    हा गणपती तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे. या मंडळाची स्थापना 1887 मध्ये झाली. शारीरिक शिक्षणाचे महत्त्व त्या वेळी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली.

  4. तुळशीबाग गणपती:

    हा गणपती चौथ्या क्रमांकाचा मानकरी आहे. या गणपतीची मूर्ती फायबरच्या साहाय्याने बनवलेली आहे आणि ती खूप आकर्षक आहे.

  5. केसरी वाडा गणपती:

    हा गणपती पाचव्या क्रमांकाचा मानकरी आहे. लोकमान्य टिळकांनी या गणपतीची स्थापना केली.

हे गणपती पुण्यातील गणेशोत्सवाचे महत्त्वाचे भाग आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2540

Related Questions

परदेशातील गणपती बद्दल माहिती द्या?
पुण्यातील ९ पैकी ५ गणपती कोणते?
काही ठिकाणी गणपती दीड दिवस, काही ठिकाणी सात, तर कुठे अकरा दिवस बसतो. असं का, आणि कशावरून हे ठरतं की एवढे एवढे दिवस बसवायचा?
गणेशमूर्ती विसर्जनाबद्दल शास्त्रात काय लिहिले आहे? मला घरचे स्वतःच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास विरोध करतात.
प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती पाण्यात विसर्जित करायचा नसेल तर काय करावे? मला गणपती सण आणि पर्यावरण दोन्ही हवे आहेत.
मला गणपतीची संपूर्ण माहिती पाहिजे, म्हणजे गणपती कसा आणावा, कोणत्या पद्धतीने आणावा, कपडे कसे घालावे, आणि या संदर्भात बऱ्याच गोष्टींची पूर्ण माहिती पाहिजे?