Topic icon

गणेशोत्सव

2
जपानमध्ये कांगीतेन, शोदेन आणि विनायक या नावाने गणेशाचा उल्लेख केला जातो. 'कांगीतेन' म्हणजे भाग्याची देवता आणि 'शोदेन' म्हणजे प्रथम देव! हिजोकीत सामान्यत: 'विनायक' शब्दाचा उपयोग केला जातो. जपानी गृह तंत्र धातु योगात वज्रधातु मंडळाचे स्थान ‍अतिशय महत्त्वाचे आहे. या मंडलाच्या रचनेत गणपतीची पाच रूप चित्रित केली आहेत. जपानमध्ये प्रदक्षिणा इशान्य अर्थात पूर्वोत्तर कोनात सुरू केली जाते. 1) पूर्वेला- कोंगो-जाई-तेन (छत्र-विनायक) चे छत्र श्वेत रंगाचे आहे. 2) दक्षिणेला- कोंगो-जिकी-तेन (माल्य-विनायक) यांच्या गळ्यात पुष्पमाळा आहे. 3) पश्चिमेला- कोंगो-एतेनच्या (धनुर्विनायक) हातात धनुष्यबाण आहे. 4) उत्तरेला- जोबुकुतेनच्या (खडग विनायक) हातात खडग असून त्याचा वर्ण लाल रंगाचा आहे. 5) पाचवे कांगीतेनच्या (भाग्य-देवता) एका हातात लाडू आणि दुसर्या हातात मुळी आहे.
भारतीयांप्रमाणे जपानमध्ये पूजा करण्यासाठी 'मुद्रा' हे विधान आहे. 'शिंगो-मिक्कयो-झु-इन-शु' नावाचे मंत्रयान-मुद्रा ग्रंथात विनायक मुद्राचा स्पष्ट उल्लेख्ा केला आहे. सम्मय-ग्यो-होरिन-इन बोनमध्ये पाच गणेशाचे प्रतीक रूप चित्रित आहे. चार भुजा आणि सहा भुजा असणार्या गणेशाचे चित्र एंतजुसी विहारात असून त्याच्या हातात पाश, गदा, लाडू आणि परशू आहे. जिगोंजी विहारात (ताकओ) गणपतीचे एक विशेष मंदिर आहे. येथे प्रत्येक वर्षी विशेष पूजा केली
  ▪️चीन:- तनुह-आंग येथे भारतातील अजिंठ्याप्रमाणे येथील गुहेप्रमाणे भिंतीवर गणपतीच्या मूर्ती आहेत. त्याच्या डोक्यावर पगडी आणि सलवार असे वस्त्र परिधान केलेले आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=198905110507420&id=100011637976439
अशा प्रकारे अन्य कुंग-हिसएनकेत गणेशाची गुहा-मंदिरे आहेत. या गुहा दीड हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. याशिवाय चीनमधील संग्रहालयात गणपतीचे चित्रे सुरक्षित आहेत. चिनी आणि जपानी बौद्ध लोक विनायक उपासनेत त्रिमूर्ती गणेशाची विशिष्ट रूपात उपासना करतात. या उपासनेला जपानमध्ये 'फो' असे म्हटले जाते.
▪️कंबोडिया:- येथील अंकुर वटाला अंगोरवार या नावाने ओळखले जाते. हे स्थापत्य कला क्षेत्र जगप्रसिद्ध आहे. येथे सुद्धा गणपतीची स्थापना केली जाते. येथील गणपतीचे रूप आणि आकार वेगळा आहे. कंबोडियात गणपतीची कांस्यमूर्ती मिळते.
▪️थायलंड:- येथे गणपतीच्या अनेक आकर्षक आणि कलात्मक मूर्ती आहेत.
▪️बाली:- जमबरन या ठिकाणी गणपती सिंहासनावर बसलेला आहे. त्याच्या हातात मशाल आणि सिंहासनाच्या चारही बाजूने अग्निशिखा आहेत. इतर ठिकाणी गणपतीची उभी मूर्ती दिसून येते. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे जसे भारतीय पुराणात जानवाच्या जागी साप गुंडाळल्याचा उल्लेख मिळतो तसाच उल्लेख येथे मिळतो.
▪️मलया:- धातू आणि दगडाने तयार केलेल्या गणेशाच्या प्रतिमा सापडतात. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशाची सोंड खाली एकदम सरळ जाऊन डोक्याकडे वळते.
▪️जावा:- येथील चंडी-बनोन नावाच्या शिवमंदिरात गणपतीची मूर्ती आहे. नदीकिनारी असलेल्या घाटावर गणपतीच्या अनेक मूर्ती दिसून येतात. जावामध्ये गणपतीच्या स्वतंत्र मंदिराशिवाय शिवाच्या मंदिरातच त्याची पूजा केली जाते. येथील अनेक मूर्ती आपल्याला ब्रिटीश संग्रहालयात दिसून येतात.
▪️म्यानमार:- येथे गणपतीला 'महापिएन' या नावाने ओळखले जाते. गणपती येथील लोकांचे आराध्य दैवत आहे. गणपतीच्या विविध आकार आणि प्रकारच्या अनेक मूर्ती आहेत.
▪️अमेरिका:- बलदेव उपाध्याय यांच्या 'पुराण-विमर्श' नावाच्या पुस्तकात अमेरिकेत श्री गणेश मूर्ती सापडल्याचा उल्लेख केलेला आहे.
▪️

:- नेपाळ हे हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाते. येथील अनेक ठिकाणच्या बौद्ध मंदिरात गणपतीची मूर्ती दिसून येते. सम्राट अशोकाच्या मुलीने नेपाळमध्ये अनेक बौद्ध मंदिरे निर्माण केलेली आहेत. या मंदिरांमध्ये त्यांनी स्वत: गणपतीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. येथे गणपतीचे विनायक हे नाव अधिक प्रचलित आहे. नेपाळमध्ये गणपती मंदिर तयार करताना भारताप्रमाणे पाच देवांची स्थापना करण्याची परंपरा आहे. परंतु, भारतात वेगवेगळ्या पाच देवाच्या प्रतिमा स्थापन केल्या जातात. नेपाळमध्ये गणेश प्रतिमेच्या चारही बाजूने गणपतीचीच प्रतिमा स्थापन केली जाते. त्या सर्वांची विनायक या नावाने पूजा केली जाते. या पाच विनायक नावांमध्ये एक नाव सिद्धी विनायकाचे असते. आपण सखोल अभ्यास केल्यास असे दिसून येते की, ज्या देशांत बौद्ध धर्माचा विस्तार आहे तेथे गणपती पूजेची परंपरा आहे.♍
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________
3
मोरेश्वर - मोरगाव, पुणे
चिंतामणी - थेऊर, पुणे
गिरीजात्मज - लेण्याद्री, पुणे
विघ्नेश्वर - ओझर, पुणे
महागणपती - रांजणगाव, पुणे
उत्तर लिहिले · 10/4/2019
कर्म · 283280
0

गणपती किती दिवस बसवायचा, हे त्या कुटुंबाच्या परंपरेवर अवलंबून असतं. काही ठिकाणी दीड दिवस, काही ठिकाणी पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस किंवा अकरा दिवस गणपतीची स्थापना करतात. यामागे काही विशिष्ट नियम किंवा शास्त्र नाही, तर ती केवळ श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहे.

गणपती किती दिवस बसवायचा हे कशावरून ठरतं:

  • कुटुंब परंपरा: अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार गणपती बसवले जातात.
  • श्रद्धा आणि इच्छा: काही लोक आपल्या श्रद्धेनुसार आणि इच्छेनुसार ठराविक दिवस गणपतीची स्थापना करतात.
  • घरातील सदस्यांची उपलब्धता: घरातील सदस्यांना किती दिवस पूजा करता येणे शक्य आहे, यावरही ते अवलंबून असतं.

गणपतीची स्थापना आणि विसर्जन हे पूर्णपणे व्यक्तिfocused आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार आणि परंपरेनुसार तुम्ही ते ठरवू शकता.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2540
0
गणेशमूर्ती विसर्जनाबद्दल शास्त्रात निश्चित आणि स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत, परंतु काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:

गणेश मूर्ती विसर्जनाचा अर्थ:

  • गणेश मूर्ती विसर्जन म्हणजे मूर्तीतील देवत्त्व पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात विलीन करणे.
  • शास्त्रानुसार, मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून तिची पूजा केल्यानंतर, विसर्जनाने ती ऊर्जा परत पाठवली जाते.

विसर्जनाचे महत्त्व:

  • विसर्जन हे केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो एक प्रतीकात्मकprocess आहे. यातून आपण निसर्गाकडे परत जाण्याचा संदेश देतो.
  • गणेश मूर्ती ही मातीची बनलेली असते आणि ती पाण्यात विसर्जित केल्याने माती पुन्हा मातीमध्ये मिसळते.

घरच्या घरी विसर्जन:

  • जर तुमच्या घरी विसर्जनाला विरोध असेल, तर तुम्ही घरातच काही विधी करू शकता:
  • एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात मूर्ती विसर्जित करा.
  • नंतर ते पाणी झाडांना टाका आणि माती कुंडीत टाका.
  • यामुळे मूर्तीचा आदर राखला जाईल आणि निसर्गालाही हानी पोहोचणार नाही.

पर्यावरणाचे रक्षण:

  • प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) च्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत आणि त्यामुळे जल प्रदूषण होते. त्यामुळे शक्यतो मातीच्या मूर्तीचा वापर करावा.
  • पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.

तुमच्या समस्येचे समाधान:

  • घरातील सदस्यांना समजावून सांगा की विसर्जन करणे हे धार्मिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
  • त्यांना घरच्या घरी विसर्जन करण्याचे फायदे सांगा.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2540
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीचे पाण्यात विसर्जन करायचे नसेल, तर काही पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे गणेशोत्सव आणि पर्यावरणाचे संतुलन राखता येते:
  • विसर्जन कुंड (Visarjan Kund):

    शहरांमध्ये महानगरपालिका किंवा काही सामाजिक संस्था विसर्जन कुंड तयार करतात. या कुंडामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत दूषित होत नाहीत.

  • दान (Donation):

    काही संस्था प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दान म्हणून स्वीकारतात आणि त्या मूर्तींचा योग्य पुनर्वापर (Recycle) करतात.

  • कृत्रिम तलाव (Artificial Pond):

    आपण आपल्या सोसायटीमध्ये किंवा परिसरात कृत्रिम तलाव तयार करू शकता. त्यात मूर्ती विसर्जित करा.

  • मूर्ती पुनर्वापर (Idol Recycling):

    प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या मूर्तीचा वापर करा, जी पाण्यात विरघळते.

  • प्लास्टर ऑफ पॅरिस पुनर्वापर (POP Recycling):

    प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन टाळून, ती पुन्हा वापरण्यासाठी जतन करा.

  • गणेश मूर्ती पाण्यात विरघळवणे:

    एका मोठ्या टबमध्ये किंवा हौदात पाणी घेऊन त्यात गणेश मूर्ती विसर्जित करा. मूर्ती पूर्णपणे विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना टाका आणि मूर्तीवरील रंग ecological (पर्यावरणास अनुकूल) असावा.

या उपायांमुळे पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करता येतो आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा करता येतो.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (https://mpcb.gov.in/)
  2. Times of India (https://timesofindia.indiatimes.com/)

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2540
11
पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहा साजरा केला जातो कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते. तेच हे मानाचे गणपती आहेत. पुण्यातील भव्यदिव्य विसर्जन मिरवणूकीत या पाच मानाच्या गणपतींचा आधी मान असतो. म्हणजे हे मानाचे गणपती पुढे गेल्यावरच मग बाकीची मंडळे त्यांचे गणपती लाईनमध्ये आणतात. 
मानाचा पहिला गणपती - श्री कसबा गणपती
मानाचा दुसरा गणपती - श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
मानाचा तिसरा गणपती - श्री गुरुजी तालीम गणपती
मानाचा चौथा गणपती - श्री तुळशीबाग गणपती
मानाचा पाचवा गणपती - श्री केसरी गणपती
सविस्तर माहिती वाचा.
मानाचे गणपती पुणे
उत्तर लिहिले · 6/9/2017
कर्म · 20855