3 उत्तरे
3
answers
गतीविषयक नियम कुणी मांडले?
2
Answer link
न्यूटनचे गतीचे नियम
भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे नियम हे तीन नियम अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत. हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात. हे नियम खालीलप्रमाणे आहेत.
पहिला नियम: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहाते.दुसरा नियम: बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.तिसरा नियम: जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.
न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत अणि या नियमांच्या सहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सिद्ध केले. यामुळे न्यूटनचे नियम फक्त पृथ्वी पुरते मर्यादीत नसुन सार्वत्रीक आहेत हे स्पष्ट झाले. तत्वतः न्यूटनचे नियम हे फक्त जडत्वीय संदर्भचौकटीतच वैध आहेत. तसेच ज्या वस्तुवर हे नियम वापरले जातात ती वस्तू बिंदुस्वरूप आहे असे गृहीत धरले जाते. पृथ्वीचे स्वतः भोवती व सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचे परिणाम सुक्ष्म असल्याने पृथ्वीला जडत्वीय संदर्भचौकट मानून हे नियम रोजच्या जीवनात वापरता येतात.

0
Answer link
👍 *न्यूटनचे गतीविषयक नियम*
✍ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपण शाळेत / कॉलेजमध्ये शिकलेल्या सगळ्या विषयांचे ज्ञान जवळ असणे खूप महत्वाचे असते. न्यूटनचे गतीविषयक नियम आपण शिकलेलो आहोत, आता पुन्हा एकदा त्यावर नजर टाकूया.
▪ *पहिला नियम :* ‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’. यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात. उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
▪ *दूसरा नियम :* ‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’. उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.
▪ *तिसरा नियम :* ‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’. उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.

गतीविषयक नियम सर आयझॅक न्यूटन यांनी मांडले.
न्यूटनने १६८७ मध्ये 'प्रिन्सिपियाMathematica' (Philosophiæ Naturalis Principia Mathematica) या आपल्या पुस्तकात हे नियम प्रकाशित केले.
हे नियम खालीलप्रमाणे आहेत:
- पहिला नियम: जर कोणती वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहील आणि जर ती गतिमान असेल तर त्याच गतीने त्याच दिशेने गतिमान राहील, जोपर्यंत तिच्यावर बाह्य बल (external force) लावले जात नाही. याला जडत्वाचा नियम (Law of Inertia) देखील म्हणतात.
- दुसरा नियम: वस्तूच्या संवेगातील (momentum) बदलाचा दर हा त्यावर लावलेल्या बलाच्या समानुपाती असतो आणि तोच दिशेने असतो ज्या दिशेने बल लावले जाते. F = ma (बल = वस्तुमान * त्वरण).
- तिसरा नियम: प्रत्येक क्रियेला (action) समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया (reaction) असते.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: