दूध व्यवसाय
पशुपालन
आजार
प्राणी
रोग आणि उपचार
शेळीपालन व्यवसायात शेळ्यांना कोणकोणते आजार होतात, त्यासाठी काय करावे लागते?
2 उत्तरे
2
answers
शेळीपालन व्यवसायात शेळ्यांना कोणकोणते आजार होतात, त्यासाठी काय करावे लागते?
3
Answer link
गरिबाची गाय म्हणून व स्वयंरोजगाराचे एक साधन म्हणून शेळी फार उपयुक्त प्राणी आहे. शेळी इतर प्राण्यांच्या मानाने फार काटक आहे. तिला रोगराई कमी होते. गोठे उंचावर बांधणे आवश्यक असते. गोठ्याची दिशा ठरवताना दक्षिण - उत्तर अथवा पूर्व - पश्चिम बाजूने ठेवल्यास सकाळी व सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो. तसेच उपलब्धअसलेल्या वैशिष्ठ्यपुर्ण सुर्यकिरणामुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते. प्रत्येक शेळीला १० ते १२ चौ. फुट जागा मिळाली पाहिजे. गोठ्यांच्या आजूबाजूला मोकळीजागा असावी व ह्या जागेत शक्यतो सुबाभूळसारखी झाडे लावावीत. ह्या झाडाचा उपयोग सावली, शुद्ध हवेव्यतिरिक्त पाल्याचा वापर शेळीचे खाद्य म्हणून करता येतो. रोग होऊ नये म्हणून उपाययोजना करणाची गरज आहे. बऱ्याचशा आजाराचे मुख्य कारण म्हणजे जीवाणू, विषाणू व जंत यांचा प्रादुर्भाव होय. यात प्रामुख्याने घटसर्प, आत्रविशार काळपुळी, बुळकांड्या, फुफ्फुसाचा दाह, लाळ, खुरकत, रत्त्की हगवण, फऱ्या, यकृतकृमी बरोबरच उवा, लिखा व गोचीड या कीटकांचा उपद्रव होऊ शकतो.
घटसर्प– हा अतिशय वेगाने पसरणारा साथीचा रोग आहे. सांसर्गिक प्राण्याची विष्ठा, लाळ, चारा, पाणी यांच्याशी संपर्कात आल्याने या रोगाची लागण होते. या रोगात जनावराचे तापमान अचानक खूप वाढते. शेळी चारा खाणे बंद करते. रवंथ न करता नाक व तोंडातून स्राव बाहेर पडतो.संसर्गजन्य फुफ्फुसदाह –हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचे लक्षणम्हणजे कोरडा खोकला, नाकातून पाण्यासारखा द्रव येतो.फऱ्या –हा रोग तीव्रपणे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगामध्ये खूप ताप येतो, पाय व सांधे यांना सूज येते, या सुजेवर दाबले असता दुखते व गरम लागते. या रोगामुळे जनावरास नीट चालवतही नाही, त्यामुळे ते लंगडते, म्हणूनच या रोगास “एकटांग्या’ असेही म्हणतात.लाळ्या खुरकूत –हा एक झपाट्याने वाढणारा संसर्गजन्य रोग आहे. याचा प्रसार हवा, पाणी व रोगी प्राण्याच्या संपर्कात आलेला चारा यामुळे होतो. यामध्ये शेळ्यांची भूक मंदावून त्या अशक्त बनतात. दुभत्या शेळ्यांचे दूध कमी होते, खूप ताप येतो व तोंडातून स्राव वाहतो. तोंडात पांढऱ्या रंगाचे फोड येतात, खुरांतही फोड येऊन जखमा होतात, त्यामुळे खाणे आणिचालणे अशक्यय होते. शेळ्या दगावण्याचीही शक्यशता असते.धनुर्वात –या रोगामुळे शेळ्यांचे स्नायू ताठरतात, सर्वांगाला कंप सुटतो, शेळ्यांना चालताना त्रास होतो. त्यासाठी वेळेवर लसीकरण, वैद्यकीय सल्ला व निदान करून घ्यावे.
कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची झळ शेळ्या- मेंढ्यांनाही बसत आहे. या परिस्थितीत उद्भवणाऱ्या आरोग्याच्या प्रमुख समस्या खालीलप्रमाणे आहेत.उष्माघात –शेळ्या जर जास्त काळापर्यंत तीव्र उन्हात राहिल्या किंवा बाहेर सोडल्या, तर ही समस्या उद्भवण्याची शक्य्ता अधिक असते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्या मलूल दिसतात. चारा- पाणी घेण्याचे थांबते अथवा शरीराचे तापमान सामान्य तापमानाच्याही वर साधारणतः 105-106 फॅ.पर्यंत पोचते. कधीकधी शेळ्या मूर्च्छित होऊन पडतात. उपचाराला प्रतिसाद देण्याच्या आधी दगावतात.उन्हाळी हगवण –एकंदरीत अशा हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसे उष्माघात, गरम व दूषित पाणी, साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतबाधा, जिवाणूबाधा किंवा अपचन अशा अनेक घटकांचा समावेश करता येईल. हगवणीची बाधा झाल्यास जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व इलेक्ट्रो लाइटचे प्रमाण फार कमी होते, त्यामुळे शेळ्या अगदी अशक्त होतात व जमिनीवर पडून राहतात. जंतबाधेची हगवण असल्यास शेणाला विशिष्ट वास येतो.आम्लीय अपचन –उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती मंदावलेली असते. बाह्य तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी शेळ्या पाणी जास्त पितात. शेळ्यांच्या खाद्यामध्ये जर कोरडा चारा जास्त प्रमाणात असला, तर पचनशक्तीवर परिणाम होतो. उन्हाच्या तीव्रतेने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन रक्तामध्ये आम्ल वाढते व आम्लीय अपचन होते. कधीकधी समारंभातील उरलेले तेलकट, पिष्टमय, दूषित अन्न खाल्ल्यामुळेसुद्धा असे अपचन होते.जंतबाधेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम –खरे तर उन्हाळ्यामध्ये जंतांची वाढीचीअवस्था म्हणजे अंडी, अंड्यांपासून विषारी अवस्था व वयस्क अवस्था ही थांबलेली असते; परंतु शरीराच्या आत असलेले जंत जसे यकृत, आतडी व पोटाचे कप्पे यांतील जंत क्रियाशील असतात. सामान्यतः यकृतातील जंत जास्त क्रियाशील असतात. अशा जंतांची शरीरातील संख्या वाढली, की शेळ्यांमध्ये रक्ताल्पता वाढते व शेळ्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. शेळ्यांची हाडे व बरगड्या दिसायला लागतात. केस राठ झालेले व चकाकीनसलेले, तसेच कातडी निस्तेज झालेली दिसते. डोळ्यांची श्ले ष्मा निस्तेज, फिकट दिसते आणि यकृतावर व पचनक्रियेवर परिणाम झालेले दिसतात. काही प्रसंगी शेवटी शेळ्यांना हगवणीचा तीव्र त्रास होऊन शेळ्या अगदी अशक्त होतात व उपचाराला प्रतिसाद न देता दगावतात.उपचार व प्रतिबंध –उष्माघाताचा त्रास होऊ नये, म्हणून शेळ्यांना दिवसातील थंड काळ जसे सकाळी लवकर (सहा ते दहा वाजेपर्यंत) आणि संध्याकाळी उशिरा (तीन ते सात वाजेपर्यंत) या काळातच चरावयास सोडावे.स्वच्छ, ताजे व थंड पाणी शेळ्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.हगवणीला कारणीभूत घटकांचा योग्य तो उपचार अथवा प्रतिबंध करावा. जसे की हगवणथांबविणाऱ्या औषधांचा उपयोग, प्रतिजैविक गोळ्या (पेसुलिन, फॅजाल, पॅबाडीन इ.) सोबत इलेक्ट्रो लाइटची पावडर हे सर्व एकत्र करून स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा पाजावे.तीव्र हगवणीच्या प्रकारात शिरेतून इलेक्ट्रो लाइट व ऊर्जेचे द्रावण द्यावे.जास्त पिष्टमय खाल्ल्याने आम्लीय अपचनहोऊन तीव्र हगवण लागते. शेळ्या दूषित, टाकलेले, उरलेले अन्न खाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अचानक अशी समस्या आली तर पाण्यातून खाण्याचा सोडा पाजावा अथवा तीव्रता जास्त असल्यास शिरेद्वारे सोडाबायाकार्बचेद्रावण द्यावे, सोबत जीवनसत्त्वे व कोणतेही एक प्रतिजैविक द्यावे.जंतबाधा ही शेळ्यांमधील प्रमुख समस्याआहे. उन्हाळ्यात जंतांची अंडी सुप्तावस्थेत असतात, अशा काळात गोठ्यातील जंतयुक्ती माती काढून घ्यावी व त्याठिकाणी जंतरहित माती टाकावी. या मातीमध्ये चुना व कॉस्टिक सोडा मिसळल्यास जमीन निर्जंतुक होण्यास मदत होईल, याशिवाय शरीरातील क्रियाशील जंत मारणे अति आवश्यनक असते, त्यासाठी सर्व प्रकारच्या जंतांवर प्रभावी असलेले जंतुनाशक जसे फेनबेन्डॅझाल, डिस्टोडीन, बॅनमिन्थसारखी जंतुनाशक औषधे वापरून जंतनिर्मूलन करून घ्यावे, जेणेकरून उत्पादनक्षम काळात शेळ्यांचे आरोग्य चांगले राहील व गर्भाची योग्य वाढ होईल.शरीरावर वाढणारे परोपजीवीसुद्धा या काळात सुप्तावस्थेत असतात. मात्र, त्याआधी योग्य ते औषध फवारणी करून शरीरावरील परोपजीवींचा बंदोबस्त करावा. अशाप्रकारे उन्हाळ्यात घेतलेली आरोग्याची काळजी पुढील काळात विशेषतः पावसाळ्यातील संक्रमण काळात प्रतिबंधक म्हणून आणि उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय ठरते.

0
Answer link
शेळीपालन व्यवसायात शेळ्यांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. काही सामान्य आजार आणि त्यांच्यासाठी उपाय खालीलप्रमाणे आहेत:
-
आंत्रविषार (Enterotoxemia):
हा आजार Clostridium perfringens नावाच्या जिवाणूमुळे होतो.
- लक्षणे: पोटदुखी, हगवण, अशक्तपणा आणि अचानक मृत्यू.
- उपाय:
- वेळेवर लसीकरण करणे.
- प्रतिजैविक औषधे (Antibiotics) डॉक्टरांच्या सल्ल्याने देणे.
-
निमोनिया (Pneumonia):
हा respiratory system चा आजार आहे.
- लक्षणे: श्वास घ्यायला त्रास होणे, नाक आणि डोळ्यातून पाणी येणे, ताप येणे.
- उपाय:
- प्रतिजैविक औषधे (Antibiotics) डॉक्टरांच्या सल्ल्याने देणे.
- शेळ्यांना थंड हवेपासून दूर ठेवा.
-
पीपीआर (Peste des Petits Ruminants):
हा विषाणूजन्य रोग आहे, जो अत्यंत संक्रामक आहे.
- लक्षणे: ताप, तोंडात आणि नाकात फोड येणे, हगवण.
- उपाय:
- लसीकरण करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
- बाधित शेळ्यांना इतर शेळ्यांपासून वेगळे ठेवा.
-
खुरकुज (Foot Rot):
हा जिवाणू संसर्गजन्य रोग आहे, जो विशेषतः पावसाळ्यात होतो.
- लक्षणे: पायाला सूज येणे, लंगडणे, खुरं सडणे.
- उपाय:
- Formalin किंवा Copper Sulphate च्या द्रावणात खूर बुडवून घ्या.
- खुरांची नियमित स्वच्छता ठेवा.
-
देवी (Goat Pox):
हा विषाणूजन्य रोग आहे.
- लक्षणे: त्वचेवर पुरळ येणे, ताप येणे.
- उपाय:
- लसीकरण करणे.
- पुरळलेल्या भागावर Anti-septic औषधे लावा.
इतर उपाय:
- शेळ्यांना नियमितपणे जंतनाशक औषधे द्यावीत.
- गोठ्याची स्वच्छता राखावी.
- शेळ्यांना संतुलित आहार द्यावा.
- वेळोवेळी पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
अधिक माहितीसाठी:
- महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ: goat farming