औषधे आणि आरोग्य वजन-उंची पोषण आरोग्य

हर्बल लाईफ प्रोडक्ट घेतल्याने काही साईड इफेक्ट्स होतात का? आणि वजन कमी करण्यास मदत होते का?

4 उत्तरे
4 answers

हर्बल लाईफ प्रोडक्ट घेतल्याने काही साईड इफेक्ट्स होतात का? आणि वजन कमी करण्यास मदत होते का?

8
सर, माझ्या मित्राने सुद्धा हर्बल लाईफ युज केले, त्याचे ३ महिन्यात फक्त २ किलो वजन कमी झाले आणि खर्च २२,५०० आला. म्हणजे एका महिन्याला ७,५०० रुपये. त्यात 'अ फ्रेश', प्रोटीन पावडर आणि एक पावडर, कशाला या फालतू प्रॉडक्ट्स मागे लागून पैसा आणि वेळ वाया घालवता? असले प्रॉडक्ट घेतल्यापेक्षा डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचा डाएट প্লॅन सुरू करा, तुम्हाला फरक दिसेल.
उत्तर लिहिले · 7/12/2019
कर्म · 285
1
हर्बल प्रोडक्ट हे काही ठराविक वनस्पतीनपासून बनवलेले असतात असे सांगितले जाते. परंतु हर्बल प्रोडक्टस हे मेडिसिन च्या कॅटेगरी मध्ये येत नाहीत. म्हणून त्या प्रोडक्टस ची औषधांसारखी कडक तपासणी होत नाही. भारतात तरी हर्बल प्रोडक्टस साठी अजून म्हणावे तेवढे रेगुलेशन्स नाहीत. आणि त्यांची तपासणी करण्यासाठी कडक नियम नाहीत. आणि भारतीय ग्राहक हा या प्रोडक्टस च्या मार्केटिंग ला भुलत चालला आहे. काही हर्बल प्रोडक्टस चे रिझल्ट्स जरी चांगले असले तरी त्यांचे काही साईड इफेक्ट्स नाहीत असे १००% आपण म्हणू शकत नाही. कारण बरीच हर्बल प्रोडक्टस मध्ये काही हानीकारण केमिकल्स आढळून येतात. 
या कंपन्या जरी हे प्रोडक्टस पूर्ण नॅचरल आहे असे सांगत असल्या तरी तसे नसते. पूर्ण नॅचरल हर्बल प्रोडक्ट तयार करण्याचा खर्च खूप जास्त असतो. काही हर्बल प्रोडक्टस मुले allergi सुद्धा होऊ शकते. 

वजन कमी करण्यासाठीचे हर्बल प्रोडक्टस वापरताना त्या कंपन्या बरेच पथ्य सांगतात जसे कि दुपारी किंवा रात्री जेवण करू नये , त्याऐवजी हर्बल प्रोडक्टस चा ज्यूस घ्यावा इत्यादई जे शरीरासाठी हानिकारक आहे. आणि वजन कमी करण्यासाठी व्यायाम , योग्य आहार हेच पर्याय आहेत. हर्बल प्रोडक्टस ने थोडे फार कमी होत असेलही परंत्तू तो योग्य पर्याय नाही. त्याने शरीराचे नुकसान हू शकते. जर हर्बल प्रोडक्टस ने वजन खरंच कमी होत असते तर त्या प्रोडक्टस खप खूप वाढला असता आंही त्या कंपन्या सर्वात मोठ्या कंपनाया झाल्या असत्या. 

तुमच्या माहितीसाठी खाली टाईम्स ऑफ इंडिया च्या एका आर्टिकल ची लिंक देत आहे. नक्की वाचा.

उत्तर लिहिले · 10/8/2017
कर्म · 48240
0
हर्बल लाईफ (Herbalife) उत्पादने घेतल्याने काही दुष्परिणाम (side effects) होऊ शकतात आणि त्याचे वजन कमी करण्यावर कितपत परिणाम करतात, याबद्दल माहिती खालीलप्रमाणे:

हर्बल लाईफ उत्पादनांचे दुष्परिणाम:

  • यकृतावर परिणाम: काही जणांना यकृतासंबंधी समस्या येऊ शकतात. PubMed Central नुसार, काही Herbalife उत्पादनांमुळे यकृताला गंभीर इजा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
  • पचनाच्या समस्या: काही लोकांना पोटदुखी, जुलाब, मळमळ किंवा उलटी असा त्रास होऊ शकतो.
  • ॲलर्जी: काही जणांना हर्बल लाईफमधील विशिष्ट घटकांमुळे ॲलर्जी होऊ शकते.
  • औषधांशी взаимодействие: हर्बल लाईफ उत्पादने इतर औषधांसोबत घेतल्यास त्याचे नकारात्मक परिणाम दिसू शकतात.

वजन कमी करण्यास मदत:

  • हर्बल लाईफ उत्पादने वजन कमी करण्यास मदत करतात, कारण त्यात कॅलरी कमी असतात आणि प्रोटीन जास्त असते. त्यामुळे भूक कमी लागते.
  • हे उत्पादने संतुलित आहाराचा आणि नियमित व्यायामाचा भाग म्हणून घेतल्यास वजन कमी होऊ शकते.

निष्कर्ष:

  • हर्बल लाईफ उत्पादने घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, विशेषतः जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील किंवा तुम्ही इतर औषधे घेत असाल तर.
  • वजन कमी करण्यासाठी, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे अधिक महत्त्वाचे आहे.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5220

Related Questions

पुढील ग्रंथ वर्गीकरण प्रात्यक्षिक साहाय्यकारी कोष्टके व ड्युई डेसिमल वर्गीकरण पद्धतीनुसार कसे सोडवावे.1. औषधे 3. लोकसाहित्य 4. जैन धर्म आणि तत्त्वज्ञान?
स्पुटम कलेक्शनची इंग्रजी माहिती?
Sputum collectionब्लड रिलेटेड?
पीपीई म्हणजे काय?
आरोग्य संप्रेषण टिपा लिहा?
आरोग्य आणि लोकसंख्या कार्यक्रमांमध्ये माध्यमांचा प्रभाव स्पष्ट करा.
"swaduras che prakar?