कपाशी पिकासाठी प्रभावी तणनाशक कोणते?
तण नियंत्रण व आंतर मशागत : कपाशीचे पिकात तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात ७० - ८० % घट होते असे प्रयोगाअंती आढळून आले आहे. कपाशीमध्ये तण स्पर्धेचा कालावधी पेरणीनंतर ६० दिवसांपर्यंत असतो. यामुळे पेरणीपासून दोन महिन्यापर्यंत पीक तणमुक्त ठेवावे.
तण नियंत्रण व जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी कपाशीचे पिकाच आंतर मशागत करणे अगत्याचे आहे. याकरीता पहिली खुरपणी पीक ३ आढवड्याचे असतांना करावी व लगेच कोळपणी करावी. यानंतर ६ आठवड्यानंतर दुसरी निंदणी व कोळपणी करावी. पिकास दोन खुरपणी / तणनाशकाची फवारणी करतान जमीन ओलसर असावी. फवारणीस वापरण्यात येणार्या नॅपसॅक पंपाला फ्लॅत फॅन नोझल किंवा फ्लडजेट नोझल लावून जमिनीवर समप्रमाणात फवारावे. फवारणी वार्याच्या दिशेने करावी. कपाशीमध्ये मूग, उडीद, सोयाबीन यापैकी आंतरपिकाचा समावेश असल्यास पेंडीमिथॅलीन हे तणनाशक वापरावे. तणनाशके फवारण्यापुर्वी पीक परिस्थिती, ताणांचा प्रकार, कालावधी, तणनाशकाचा प्रकार व प्रमाण यांचा याग्य वापर होण्यासाठी व अपेक्षित रिझल्ट मिळण्यासाठी तज्ज्ञांन सल्ल्या घ्यावा.
| अ. क्र. | तणनाशक | मात्रा/ हेक्टर | व्यवसायिक नाव व मात्रा / हेक्टर | पाण्याचे प्रमाण (लि.) | फवारणीची वेळ |
| १ | पेंडीमॅथॅलीन | ०.७५ | स्टॉंम्प (२.५ लिटर) | १००० | लावणीनंतर परंतु बियाणे उगवणीपूर्वी |
| २ | डायुरॉन | ०.५० | क्लास किंवा कारमेक्स (६२५ ग्रॅम) | १००० | लावणीनंतर परंतु बियाणे उगवणीपूर्वी |
| ३ | फप्युक्लोरॅलीन | ०.९० | बासालीन ( २ लिटर) | १००० | पेरणीपूर्वी ओलसर जमिनीवर फवारावे व वखराच्या पाळीने जमिनीमध्ये मिसळून |
| ४ | ऑक्झीफ्लोरोफेन | ०.१०० | गोल (४२५ मिली) | १००० | पेरणीनंतर परंतु बियाणे उगवणीपूर्वी |
वरीलप्रमाणे कोणत्याही एक तणनाशकाचा वापर केल्यास द्विदल वर्गीय तणांचे ४ आठवड्यापर्यंत उत्तम रीतीने नियंत्रण होते. तणनाशक वापरल्यास पेरणीनंतर ६ आठवड्यानंतर एकदल वर्गीय तणांचे नियंत्रण करण्यासाठी निंदणी व ३ - ४ कोळपण्या कराव्यात.
कपाशीची खुरपणी / निंदणीच्यावेळी मजुरांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता नसणे व मजुरीचे वाढलेले दर यामुळे निंदणीचे काम अत्यंत जिकिरीचे व आर्थिक दृष्ट्या खर्चिक होत आहे. शिवाय या काळात पावसाची रिमझिम चालू असल्यास वापसा नसल्यामुळे निंदणीचे काम लांबणीवर पडते. त्यामुळे तणनाशकांचा वापर केल्यास तण नियंत्रण परिणामकारक व किफायतशीर होते. याकरिता पुढीलपैकी कोणत्याही एका तणनाशकाचा वापर करावा. एक निंदणी व कोळपणी करावी, वरीलपैकी कोणत्याही एका तणनाशकाचा वापर करावा.
- पेंडीमेथॅलीन (Pendimethalin): हे उगवणपूर्व (pre-emergence) तणनाशक आहे. याचा वापर पेरणीनंतर लगेच आणि उगवण होण्यापूर्वी केला जातो.
- ग्लायफोसेट (Glyphosate): हे बिननिवडक (non-selective) तणनाशक आहे, जे उगवणानंतर (post-emergence) वापरले जाते. फक्त तणांवरच मारावे, अन्यथा कपाशीचे पीक देखील जळू शकते.
- क्विझालोफॉप-पी-इथाइल (Quizalofop-p-ethyl): हे केवळ गवतवर्गीय तणांसाठी उगवणानंतर वापरले जाते.
- पायरीथियोबॅक सोडियम (Pyrithiobac sodium): हे रुंद पानाच्या तणांसाठी उगवणानंतर वापरले जाते.