सौंदर्य केस घरगुती उपाय सौंदर्य आणि केसांची निगा आरोग्य

माझं वय 23 आहे आणि माझे केस जास्त प्रमाणात पांढरे झाले आहेत, नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी उपाय काय आहेत?

4 उत्तरे
4 answers

माझं वय 23 आहे आणि माझे केस जास्त प्रमाणात पांढरे झाले आहेत, नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी उपाय काय आहेत?

19
*अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येवर '6' रामबाण घरगुती उपाय*


मुंबई : पोषक आहाराच्या अभावामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या वाढते. काहिरा युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, अकाली केस पांढरे होण्याची समस्या हृद्याच्या आरोग्याशी निगडीत आहे. संशोधकाच्या दाव्यानुसार अकाली केस पांढरे होणे हे हृद्यविकाराचे संकेत देतात. 
पुरूषांमध्ये अकाली केस पांढरे होण्याची समस्या असल्यास त्यांना हृद्यरोगाचा धोका अधिक असतो. मग अकाली केस पांढरे होण्याची समस्या आटोक्यात ठेवायची असल्यास या घरगुती आणि सुरक्षित उपायांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.  

*आवळा* - केसांच्या आरोग्यासाठी आवळा हा अत्यंत उपयुक्त आहे. नियमित आवळ्याचा आहारात समावेश करणंही हितकारी आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिसळा. किंवा आवळ्याचा रस गरम नारळाच्या तेलात मिसळून डोक्याला लावणं हितकारी आहे. 

*काळामिरी* - काळामिरीचे दाणे किंवा काळामिरी पावडर पाण्यात उकळा. शाम्पूनंतर केस या पाण्याने धुवावेत. नियमित हा उपाय केल्याने केसांचे आरोग्य सुधारेल.  

*दूध पिणं* हाडांना बळकटी देते. सोबत केसांच्या आरोग्यासाठीदेखील हे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा गाईचं दूध केसांना लावा. यामुळे केस  काळे होण्यास मदत होते.  

*कढी पत्ता* आहाराचा स्वाद वाढवतो, त्यासोबतच केसांच्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. पाण्यात तास - दोन तास कढीपत्त्याची पानं मिसळा. या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. नारळाच्या तेलात कढीपत्त्याच्या पानांचा रस मिसळून लावल्याने फायदा होतो.  

*कोरफड* - त्वचेसोबतच केसांच्या आरोग्यासाठीदेखील कोरफड फायदेशीर आहे. नियमित कोरफडीचा वापर केल्याने केस काळे होण्यास मदत होते. केसगळतीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. कोरफडीच्या गरामध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्यास केसांचे आरोग्य सुधारते.  

*कांदा* देखील केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केस धुण्यापूर्वी काही वेळ कांद्याचा रस केसांना लावा. यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या आटोक्यात राहते. सोबतच केसगळतीचा त्रास कमी होतो. 
उत्तर लिहिले · 28/6/2018
कर्म · 115390
14
*सफेद दाढी आणि केस यांची समस्या मुळासह समाप्त करेल हा उपाय*

केस आणि दाढी सफेद होण्याची समस्या जवळपास 60-70% युवकांना आजच्या काळामध्ये त्रस्त करत आहेत. यावर उपाय म्हणून पुन्हा बाजारात मिळणारे केमिकल्स युक्त हेयर डाय आणि कलर वापरून केस काळे केले जातात. परंतु यामुळे समस्या कमी होण्याच्या एवजी वाढते. केस सफेद होण्याचे प्रमाण अधिक जास्त होत असल्याचे दिसते. तर काही लोकांना केस गळण्याचा त्रास सुरु होतो ज्यामुळे टक्कल पडण्याची भीती वाढते. परतू आज येथे एक घरगुती नैसर्गिक उपाय सांगितला आहे ज्यामुळे सफेद केसांची समस्या मुळासह समाप्त होईल.

सफेद केस आणि दाढी होण्याची 3 मुख्य कारणे

सफेद दाढी आणि केस होण्याचे हार्मोन आणि अनुवांशिक कारण देखील असू शकते, याचा अर्थ तुमचे वडील किंवा आजोबा यांना ही समस्या राहिली असेल.

एका संशोधना नुसार जे लोक जास्त तणावात आणि रागीट स्वभावाचे असतात, त्यांचे केस देखील तरुण वयात सफेद होतात.

जे लोक जास्त धुम्रपान आणि अल्कोहल सेवन करतात. त्यांचे शारीरिक वय वेगाने वाढते, यासाठी या गोष्टींना टाळावे.

सफेद दाढी आणि केस यांना नष्ट करण्याचा घरगुती उपाय

तुरटी आणि गुलाबजल

जेव्हा व्यक्तीच्या शरीरामध्ये मेलेनिनची कमी होते, तेव्हा सफेद दाढी आणि केस होतात. यासाठी थोडी तुरटी आणि त्यामध्ये गुलाबजल मिक्स करून दाढीचे केस काढताना म्हणजेच शेव्हिंग करताना किंवा तुम्हाला दाढी वाढवण्याची आवड असेल तर दाढीच्या मुळाला हे मिश्रण लावावे. यामुळे लवकरच सफेद केस काळे होतील.

पुदिना

हा सर्वात सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे. कारण पुदिना अशी वनस्पती आहे ज्यामध्ये सर्व उपयोगी तत्व शामिल आहेत. जे डोक्याच्या आणि दाढीच्या केसांना काळे करू शकतात. तुम्ही दररोज पुदिना चहा सकाळ-संध्याकाळ पिण्यास सुरुवात करा आणि काही आठवड्यातच तुम्हाला याचा परिणाम दिसण्यास सुरुवात होईल.

https://t.me/joinchat/AAAAAFFKQrq_VM1AdT1HXw
*प्रसारण:- राजयोग ग्रुपचे फड जि वरील लींक ला टच करा व चाँनल जाँईनला टच करावे*
उत्तर लिहिले · 9/9/2018
कर्म · 569225
0

केस अकाली पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे, खासकरून तरुण वयात. या समस्येवर काही नैसर्गिक उपाय खालीलप्रमाणे आहेत:

  1. आहार:

    व्हिटॅमिन बी 12: व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ शकतात. त्यामुळे आहारात दूध, दही, अंडी आणि मासे यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. WebMD

    तांबे (Copper): तांबे মেলॅनिन तयार करण्यासाठी आवश्यक आहे, जे केसांना रंगत देते. शेंगा, नट्स आणि बिया आहारात घ्या. Healthline

  2. आवळा:

    आवळा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.

    उपाय: आवळ्याचा रस नियमित प्या किंवा आवळ्याचे तेल केसांना लावा.

  3. मेहंदी (Henna):

    मेहंदी केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी चांगला पर्याय आहे.

    उपाय: मेहंदीमध्ये दही, लिंबू रस आणि कॉफी मिसळून केसांना लावा. यामुळे केसांना नैसर्गिक काळा रंग येईल.

  4. कांद्याचा रस:

    कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते, ज्यामुळे केसांतील मेलॅनिन वाढते आणि केस काळे होण्यास मदत होते.

    उपाय: कांद्याचा रस काढून केसांना लावा आणि 30 मिनिटांनंतर धुवा.

  5. नारळ तेल आणि लिंबू:

    नारळ तेल केसांना पोषण देते आणि लिंबू केसांतील रंगद्रव्य वाढवते.

    उपाय: नारळ तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावा आणि 1 तास ठेवल्यानंतर धुवा.

इतर महत्वाचे उपाय:

  • तणाव कमी करा: जास्त तणावामुळे केस पांढरे होऊ शकतात. त्यामुळे योग, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करा.
  • धूम्रपान टाळा: धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि यामुळे केस लवकर पांढरे होतात.

हे उपाय नियमित केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1040

Related Questions

केसासाठी कडीपत्तयाचा काय उपयोग होतो?
माझं वय २६ आहे, माझे केस पांढरे होत आहेत, तर त्यावर काही घरगुती उपाय आहेत का?
माझे केस लवकरच पांढरे होऊ लागले काही उपाय सांगाल का?
माझे केस खूप पातळ झाले आहेत आणि समोरचे केस खूप गळत आहेत, तर हेअर ग्रोथसाठी ऑनलाईन प्रॉडक्ट वापरू शकतो का? किंवा तुमचे काही केसांबद्दल मार्गदर्शन आहे का जेणेकरून माझे केस गळणे थांबेल?
माझे केस गळत चालले आहे ते केस गळणे थांबविण्यासाठी उपाय आहे काय व केस दाट करण्यासाठी उपाय कोणते आहे ?
केस परत उगवू शकतात का? त्यासाठी काय करावे लागेल?
माझ्या डोक्याचे केस पातळ झाले आहेत, ते दाट होण्यासाठी काही उपाय/औषधे आहेत का? पतंजलीचे कोणते औषध चांगले आहे?