केस सौंदर्य आणि केसांची निगा आरोग्य

माझे केस खूप पातळ झाले आहेत आणि समोरचे केस खूप गळत आहेत, तर हेअर ग्रोथसाठी ऑनलाईन प्रॉडक्ट वापरू शकतो का? किंवा तुमचे काही केसांबद्दल मार्गदर्शन आहे का जेणेकरून माझे केस गळणे थांबेल?

2 उत्तरे
2 answers

माझे केस खूप पातळ झाले आहेत आणि समोरचे केस खूप गळत आहेत, तर हेअर ग्रोथसाठी ऑनलाईन प्रॉडक्ट वापरू शकतो का? किंवा तुमचे काही केसांबद्दल मार्गदर्शन आहे का जेणेकरून माझे केस गळणे थांबेल?

6
⭕केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय :

🏷ऑलिव्ह ऑइल –
ऑलिव्ह ऑइल मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड सारखे अनेक पोषक घटक असतात. केस घनदाट आणि मजबूत करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप उपयुक्त ठरते. यासाठी थोडे ऑलिव्ह ऑइल कोमट करून केसांच्या मुळाशी लावावे आणि त्यानंतर भिजलेला टॉवेल 30 मिनिटे केसांना गुंडाळून ठेवावा. हा उपाय आठवड्यातून 3 वेळा केल्यास केस मजबूत आणि घनदाट होण्यास मदत होते.

❗खोबरेल तेल –
पातळ झालेल्या केसांना दाट आणि मजबूत बनवण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरते. यासाठी रोज झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांना कोमट केलेले खोबरेल तेल लावावे व सकाळी अंघोळ करताना केस नेहमीप्रमाणे धुवून घ्यावेत. यामुळे केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होते.
♦एरंडेल तेल –
एरंडेल तेल (कॅस्टर ऑईल) थोडे कोमट करून केसांच्या मुळाना लावावे आणि हलका मसाज करावा. त्यानंतर भिजलेला टॉवेल 20 मिनिटे केसांना गुंडाळून ठेवावा. यामुळे केस घनदाट आणि मजबूत होण्यास खूप मदत होते. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय आपण करू शकता.

🏷कांद्याचा रस –
केसांच्या मुळांना कांद्याचा रस लावून हलका मसाज करावा. 20 मिनिटांनी केस शाम्पू करून धुवावेत. केसांच्या वाढीसाठी हा उपाय उपयुक्त ठरतो. यामुळे केस गळणेही कमी होते. केस घनदाट आणि मजबूत बनतात. आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय आपण करू शकता.

⭕बदाम तेल –
रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल केसांच्या मुळांना लावून हलका मसाज करावा आणि उठल्यावर सकाळी नेहमीप्रमाणे केस धुवावेत. बदाममध्ये केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन-E मुबलक असते. त्यामुळे या उपायाने केसांची वाढ होण्यास तसेच केस मजबूत, चमकदार होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय आपण करू शकता.

🌱कोरफडीचा गर –
केसांच्या मुळांना कोरपडीचा गर लावून हलका मसाज करावा. 20 मिनिटांनी केस शाम्पू करून धुवावेत. कोरफडमध्ये केसांसाठी आवश्यक असे अनेक पोषकघटक असतात त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
0

तुमचे केस गळत आहेत आणि ते पातळ झाले आहेत, हे ऐकून मला वाईट वाटले. केस गळती अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे:

  • आनुवंशिकता
  • तणाव
  • आहार
  • जीवनशैलीतील बदल
  • केसांची निगा न राखणे
  • Skincare products (shampoo, conditioner)

केस गळती कमी करण्यासाठी आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी काही उपाय:

  1. आहार:

    प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असलेले अन्न खा.

    • प्रथिने: अंडी, मांस, मासे, बीन्स, डाळी.
    • लोह: पालक, खजूर, बीट.
    • व्हिटॅमिन: फळे आणि भाज्या.
  2. तणाव व्यवस्थापन:

    योगा आणि ध्यानाने तणाव कमी करा.

  3. केसांची काळजी:

    सौम्य شامبو (shampoo) वापरा आणि केसांना हळूवारपणे तेल लावा.

    • आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेल लावा.
    • केमिकल युक्त उत्पादने टाळा.
  4. डॉक्टरांचा सल्ला:

    त्वचा रोग तज्ञांकडून (Dermatologist) तपासणी करून घ्या.

    • ते तुमच्या केस गळतीचे कारण शोधू शकतील आणि योग्य उपचार देऊ शकतील.

ऑनलाईन उत्पादने:

ऑनलाईन उत्पादने वापरण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक उत्पादनाचा तुमच्या केसांवर कसा परिणाम होईल हे सांगणे कठीण आहे.

  • उत्पादनांमध्ये असलेले घटक तपासा.
  • उत्पादनाचे परीक्षण (Reviews) वाचा.

टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

केसासाठी कडीपत्तयाचा काय उपयोग होतो?
माझं वय २६ आहे, माझे केस पांढरे होत आहेत, तर त्यावर काही घरगुती उपाय आहेत का?
माझे केस लवकरच पांढरे होऊ लागले काही उपाय सांगाल का?
माझे केस गळत चालले आहे ते केस गळणे थांबविण्यासाठी उपाय आहे काय व केस दाट करण्यासाठी उपाय कोणते आहे ?
केस परत उगवू शकतात का? त्यासाठी काय करावे लागेल?
माझ्या डोक्याचे केस पातळ झाले आहेत, ते दाट होण्यासाठी काही उपाय/औषधे आहेत का? पतंजलीचे कोणते औषध चांगले आहे?
माझे डोक्यावरचे केस अकाली सफेद झाले आहेत, तर मी आता काय करू? डाय व यूट्युब वरील व्हिडिओ सोडून दुसरा कोणताही उपाय सांगा?